एकविसाव्या शतकात मार्गक्रमण करत असताना बऱ्याचदा आम्ही मेंढराच्या कळपाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो इतरांचं अंधानुकरण करण्यात आपण धन्यता मानतो मग ते परकीयांचं खाद्य असो वस्त्र असो किंवा अन्य गोष्टी असो त्या आम्ही पटकन स्वीकारतो आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला जे शिकवलंय ते आम्ही विसरतो आमची संस्कृती आमचा संस्कार महान आहे त्यामुळे त्या अनुषंगाने मार्गक्रमण करा असा मोलाचा सल्ला प्राध्यापिका अश्विनी टाव्हरे यांनी विद्यार्थ्यांना दिला निमित्त होते द्वारकाई व्याख्यानमाला कार्यक्रमाचे
जय गणेश फाउंडेशन द्वारे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प आज शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संपन्न झाले .
या व्याख्यानमालेमध्ये आजच्या प्रथम पुष्पाच्या वक्त्या प्राध्यापिका अश्विनीताई टाव्हरे या पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याता, कीर्तनकार, संत साहित्याच्या निष्णात अभ्यासक सुमारे 150 पेक्षा जास्त वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या वक्त्या आहेत.. त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने विद्यार्थिनी समोर सुमारे तासभर कळी उमलताना आवश्यक संस्कार या विषयावर प्रबोधन केले एकविसाव्या शतकात वावरताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत या आव्हानांना यशस्वीपणे पेलण्यासाठी संस्काराची शिदोरी जवळ असणे अत्यंत आवश्यक असल्याचे बहुमोल मार्गदर्शन अश्विनीताईंनी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी , जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश भाऊ नेमाडे , विद्यमान अध्यक्ष श्री राजेंद्र यावलकर, श्री गणेश फेगडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उमेश भाऊ नेमाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सोनाली राणे यांनी आभार प्रदर्शन श्री राजेंद्र यावलकर यांनी तर सूत्रसंचालन सौ आशा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply