Blog

  • डोनाल्ड ट्रम्पच्या हट्टावर पडदा, नोबेल गेले मारिया मचाडो यांच्याकडे

    डोनाल्ड ट्रम्पच्या हट्टावर पडदा, नोबेल गेले मारिया मचाडो यांच्याकडे

    शांततेचे नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना मिळालं, या बातमीपेक्षाही ते डोनाल्ड ट्रम्प यांना नाही मिळालं, याची चर्चा अधिक आहे.

    नोबेल समितीने स्वतःची लाज राखली. शांततेचे नोबेल डोनाल्ड ट्रम्प यांना दिले गेले असते, तर नोबेलवरचा उरलासुरला विश्वासही उडून गेला असता. ट्रम्प यांच्यापेक्षा या मारिया बर्‍याच म्हणायच्या.

    बराक ओबामांना शांततेचे नोबेल मिळाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच नोबेल मिळाले, तेव्हा नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारताना ओबामा म्हणाले होते, “नोबेल मिळण्याइतकं फार काही काम मी करू शकलो आहे, असं मला वाटत नाही. पण यापुढे मात्र शांततेसाठी मी प्रयत्न करावे, यासाठी हा पुरस्कार दिला असावा.” तेव्हा गमतीने एक पत्रकार त्यांना म्हणाला होता, “अमेरिकेचे अध्यक्ष शांततेच्या रस्त्याने निघाले, तरी जगातली निम्मी युद्धं आपोआप संपतील.”

    मुळात, अमेरिकेच्या अध्यक्षाला शांततेचे नोबेल देणे अयोग्यच. अगदी ते ओबामा असले तरी. अर्थात, आहे त्या चौकटीत ओबामांनी शांतता आणि सलोखा या दिशेने काम केले हे निश्चित. ओबामा ही जगाची आशा होती. धाकट्या जॉर्ज बुश यांच्यानंतर ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बुश साहेबांनी जगाचे रूपांतर युद्धभूमीत करून टाकले होते. अशावेळी अवघ्या जगाचे प्राक्तन समान आहे, अशी भूमिका घेणारा कवी मनाचा एक काळासावळा तरुण व्हाइट हाऊसमध्ये आला. तेव्हा तर ती क्रांतीच होती. ओबामांना नोबेल मिळाले, म्हणून मलाही मिळायला हवे, असा हट्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. त्यासाठी, काहीही संबंध नसलेल्या ठिकाणीही, आपण युद्ध थांबवले, असा दावा ते करत होते.

    ज्या मारिया बाईंना नोबेल मिळाले आहे, त्या आहेत व्हेनेझुएलाच्या. ट्रम्प यांना हा आणखी त्रास. कारण, अमेरिकेच्या अगदी शेजारी व्हेनेझुएला आहे. मारिया हार्वर्डमध्येच शिकल्या आहेत. लॅटिन अमेरिकेच्या राजकारणातले हे एक महत्त्वाचे नाव. ह्युगो चावेझ नावाचा तगडा नेता दीर्घकाळ इथे अध्यक्ष होता. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांना चावेझ यांनी वठणीवर आणले. अमेरिका जगभर धुमाकूळ घालत असताना, या शेजारच्या चिमुकल्या देशाकडे मात्र अमेरिकेला बघताही येत नव्हते. चावेझ हे अनेक अर्थाने महत्त्वाचे. मात्र, अनेक डावे पक्ष पुढे हुकूमशाहीकडे वळतात. समाजवाद आणि साम्यवाद हे शब्द कागदावर कितीही गोड वाटले, तरी ज्यातून हुकूमशाही जन्माला येते, अशा समाजवादाचे करायचे काय? ही तुलना नाही. मात्र, तसेच सांगायचे झाले, तर हिटलरच्या पक्षाचे नावही ‘सोशालिस्ट पार्टी’ होते.

    चावेझ यांच्यासमोर बोलण्याची हिम्मत कोणाचीही नव्हती, त्यावेळी एक तरुण मुलगी थेटपणे त्यांना विरोध करत होती. तिचे नाव मारिया. ही मारिया शिकली अमेरिकेतच. तिचे व्यक्तिमत्त्वही काहीसे अमेरिकी वळणाचे. त्यामुळे अमेरिकेनेच चावेझ यांच्या विरोधात त्यांना चावी दिली आहे, अशी टीका चावेझ यांचे समर्थक तेव्हा करत असत. ते अशक्य नव्हतेही. अमेरिकेला लॅटिन अमेरिकेला नेहमीच धडा शिकवायचा असतो. ट्रम्प यांना तर लॅटिन अमेरिकेचा फार त्रास. आता मारियांना नोबेल मिळाल्याने ते अधोरेखितच झाले!

    चावेझ गेल्यानंतर मादुरो नावाचा नवा सत्ताधीश खुर्चीवर बसला. चावेझ यांच्याकडे काही उद्दिष्ट होते. दृष्टी होती. मादुरो ही त्या विचारांची अधोगती होती. हुकूमशहाचे अवगुण त्याच्यामध्ये ठासून भरलेले. मात्र, त्यालाही मारियाला संपवणे शक्य झाले नाही. विरोधकांचा चेहरा म्हणून मारिया पुढे आल्या. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्या उभा ठाकल्या असत्या, मात्र त्यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांचे राजकीय करियर संपवण्याचा प्रयत्न सरकारने केला. तरीही, बाई हिम्मत हरल्या नाहीत. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता. आहेही. मादुरो हे हुकूमशहा आहेतच, पण ट्रम्प यांनी त्यांना लोकशाही सांगावी, हे फारच झाले. असो.

    तर आपण मारियाविषयी बोलतोय.

    त्यांना मागे एकदा विचारलं होते- इतकी वर्षे तुम्ही लढत आहात. झुंजत आहात. तरी यश मिळत नाही. तुम्हाला नैराश्य येत नाही का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, “येतं तर. पण, अशावेळी मी महात्मा गांधींकडे बघते. सहा दशके या माणसाने संघर्ष केला, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. मात्र, गांधी हिंमत हरले नाहीत. सत्य आणि अहिंसा या मार्गानेच यश मिळते, यावर माझी श्रद्धा आहे.”

    आफ्रिकेतले नेल्सन मंडेला असोत की अमेरिकेतला बराक ओबामा किंवा लॅटिन अमेरिकेतील ही मारिया. मोहनदास करमचंद गांधी हाच या माणसांचा आदर्श असतो. किमान, त्यांचे नाव तरी घ्यावे लागते! त्यातही गंमत अशी की, खुद्द महात्मा गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नाही. त्यांचे नाव अनेक वेळा चर्चेत आले. नामांकनही मिळाले. प्रत्यक्षात मात्र गांधींना नोबेल कधीच मिळाले नाही. नोबेल समितीलाही त्याचा पश्चाताप होत असतो. गांधींच्या वाटेने चालणाऱ्या, त्यांचे नाव घेणार्‍या अनेकांना नोबेल मिळाले. गांधींवर काढलेल्या सिनेमाला ‘ऑस्कर’ मिळाले. गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नव्हते.

    अर्थात, नव्हते मिळाले ते बरेच झाले. जे नोबेल गांधींना मिळाले, त्यावर कोणी डोनाल्ड ट्रम्प हक्क सांगतोय, हे सहन करणेही कठीण गेले असते. एनी वे, मारिया मचाडो यांचे अभिनंदन. त्यांना नोबेल मिळणे हाही अमेरिकेचाच डाव असला तरीही!

     

    – संजय आवटे

  • भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे विजयादशमी निमित्त रेल्वे ग्राऊंडवर पार पडला साहित्य पूजन सोहळा

    भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे विजयादशमी निमित्त रेल्वे ग्राऊंडवर पार पडला साहित्य पूजन सोहळा

    आज दि. 02.10.2025 रोजी भुसावळ तालुका एँथेलेटिक्स असोसिएशन, भुसावळ च्या वतीने विजयादशमी निमित्ताने सकाळी 7.45 वाजेला. रेल्वे ग्राउंडवर साहित्य पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    कार्यक्रमाची प्रस्तावना असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी व सल्लागार श्री रमण भोळे सरांनी केले व क्रीडा साहित्याची पुजा हि त्यांच्या हातुनच करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी क्रीडा साहीत्याला पुष्प वाहून क्रीडा साहित्य पुजनाची सांगता करण्यात आली.

    या वेळी विशेष अतिथी म्हणून श्री जी. आर. ठाकूर उपस्थित होते. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत निकम, सचिव श्री रवींद्र चोपडे. उपाध्यक्ष श्री राहूल महाजन. सहसचिव श्रीमती ममता जांगीड सदस्य श्रीकिरण पाटील,श्री गिरीश जावळे, श्री दिग्विजय दभारे , श्री इरफान शेख आदी उपस्थित होते.

  • अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा। “संस्कृत भाषेचे अध्ययन काळाची गरज -डॉ. सौ गौरी खानापूरकर

    अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा। “संस्कृत भाषेचे अध्ययन काळाची गरज -डॉ. सौ गौरी खानापूरकर

    देवभाषा, ज्ञानभाषा किंवा सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा आत्मसात करणं काळाची गरज आहे कारण संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे, संस्कृत भाषेतील उच्चार, व्याकरण परिपूर्ण आहे .प्राचीन साहित्यातले ज्ञान आत्मसात करायचे असेल तर संस्कृत भाषा शिकणे क्रमप्राप्त आहे असे मत डॉ. सौ गौरी खानापूरकर यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले निमित्त होते अहिल्यादेवी कन्या विद्यालय तर्फे आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या विद्यालयातील संस्कृत मंडळातर्फे संस्कृत दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

     

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले तदनंतर संस्कृत दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून कथाकथन, एकांकिका, समूहगीत, वैयक्तिक गीत, नाटिका सादर केल्या.

     

    संस्कृत भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत श्लोकांचे उच्चारण करताना प्राणायाम होत असतो.. त्यामुळे आपले आरोग्य ही सुदृढ राहत असते असे मत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी उपस्थित होत्या.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक श्री अतुल जाधव सर यांनी आभार प्रदर्शन श्री आशिष निरखे यांनी तर सूत्रसंचालन प्राची चौधरी व कार्तिकी बोंडे या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  • अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा। “संस्कृत भाषेचे अध्ययन काळाची गरज -डॉ. सौ गौरी खानापूरकर

    अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा। “संस्कृत भाषेचे अध्ययन काळाची गरज -डॉ. सौ गौरी खानापूरकर

    देवभाषा, ज्ञानभाषा किंवा सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा आत्मसात करणं काळाची गरज आहे कारण संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे, संस्कृत भाषेतील उच्चार, व्याकरण परिपूर्ण आहे .प्राचीन साहित्यातले ज्ञान आत्मसात करायचे असेल तर संस्कृत भाषा शिकणे क्रमप्राप्त आहे असे मत डॉ. सौ गौरी खानापूरकर यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले निमित्त होते अहिल्यादेवी कन्या विद्यालय तर्फे आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या विद्यालयातील संस्कृत मंडळातर्फे संस्कृत दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले तदनंतर संस्कृत दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून कथाकथन, एकांकिका, समूहगीत, वैयक्तिक गीत, नाटिका सादर केल्या.

    संस्कृत भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत श्लोकांचे उच्चारण करताना प्राणायाम होत असतो.. त्यामुळे आपले आरोग्य ही सुदृढ राहत असते असे मत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी उपस्थित होत्या.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक श्री अतुल जाधव सर यांनी आभार प्रदर्शन श्री आशिष निरखे यांनी तर सूत्रसंचालन प्राची चौधरी व कार्तिकी बोंडे या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  • भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे मेजर ध्यानचंद जयंती साजरी

    भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे मेजर ध्यानचंद जयंती साजरी

    भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे हॉकीचे जादूगार व भारताचे स्फूर्तीस्थान मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

     

    या कार्यक्रमात तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सिनियर खेळाडू डॅनियल पवार , ममता जांगिड यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

     

    कार्यक्रमाला तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, उपाध्यक्ष राहुल महाजन, सचिव रविंद्र चोपडे सर, कोषाध्यक्ष उदय महाजन, तसेच डोंगरसिंग महाजन, गुड्डू गुप्ता, गोपीसिंह राजपूत व इतर सदस्य उपस्थित होते.

     

    या प्रसंगी खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा आदर्श ठेवून खेळाच्या माध्यमातून निरोगी व अनुशासित जीवन जगण्याचा संकल्प केला.

  • निरोगी आयुष्यासाठी खेळ आवश्यक, प्रदूषणमुक्त वातावरणही तितकेच गरजेचे – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    निरोगी आयुष्यासाठी खेळ आवश्यक, प्रदूषणमुक्त वातावरणही तितकेच गरजेचे – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    29 ऑगस्ट आपल्या देशातील सर्व मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचे स्फूर्ती स्थान मेजर ध्यानचंद यांची जयंती पूर्ण भारतभर सर्व मैदानी खेळ खेळणारे खेळाडू तसेच सर्व प्रकारच्या खेळांचे आयोजन करणाऱ्या विविध संघटना शासकीय शाळा ,कॉलेजेस, शासकीय क्रीडा विभाग आदरणीय पंतप्रधान यांनी खेलो इंडिया ला प्रोत्साहन देत त्यांच्यामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तास मैदानी खेळ आवश्यक आहे.त्या दृष्टीने विविध शाळां कॉलेजेस मध्ये खेळाला प्रोत्साहन देत खेळांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करत आवश्यक असलेले मैदाने तयार केले आहेत व जेथे नाहीत तेथे करणे सुरू आहे विविध ठिकाणी खेळांचे आयोजन करण्यात येत आहे.

    निरोगी आयुष्यासाठी नुसता खेळ खेळून उपयोग नाही त्यासाठी प्रदूषण मुक्त वातावरण असणे गरजेचे आहे आपल्या देशात काही कारणास्तव ऑक्सिजन युक्त झाडांची व इतरही सजीवांना लागणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे झाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा आदरणीय पंतप्रधानजी यांनी मागील वर्षी प्रत्येकाने एक पेड मॉ के लिये हे अभियानांतर्गत झाड लावावे असे आवाहन केले होते.

    आताही एक पेड मॉ के लिये अभियान2 अंतर्गत झाड लावावे असे आवाहन केले आहे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागरण प्रतिष्ठान तरी प्रत्येकाने निसर्गनिर्मित सजीवांना आवश्यक असलेले वातावरण शुद्ध राहण्याच्या दृष्टीने आवश्यक दीर्घकाळ टिकणारे वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे ऑक्सिजन युक्त झाडे लावावेत त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे विघटन होत नसल्यामुळे त्याचा कचरा जमा होत आहे. तरी प्लास्टिकचा वापर करू नये.

    सार्वजनिक वाहनाचा वापर करत वातावरणातील वायू प्रदूषण टाळूया सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कर्कश आवाज असतो तो कमी करून ध्वनी प्रदूषण टाळूया तसेच पाण्याचा वापर सुद्धा जपून करावा पाणी वाचवा सर्व प्रकारचे प्रदूषण होणाऱ्या वस्तूंचा वापर न करता प्रदूषण टाळूया पृथ्वी वाचवूया. असा संकल्प करूया

  • जळगाव जिल्हास्तरीय ज्युनियर व २३ वयोगट ॲथलेटिक्स स्पर्धेचे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजयजी सावकारे यांचे हस्ते शानदार उदघाटन

    जळगाव जिल्हास्तरीय ज्युनियर व २३ वयोगट ॲथलेटिक्स स्पर्धेचे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजयजी सावकारे यांचे हस्ते शानदार उदघाटन

    आज दि.22.08.2025 रोजी जळगाव जिल्हा एँथेलेटिक्स असोसिएशन जळगाव व भुसावल तालूका एथेलेटिक्स एसोसिएशन, भुसावळ द्वारे जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा भुसावळ येथे घेण्यात आली.

    कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माननीय, कापड उद्योग मंत्री श्री संजय भाऊ सावकारे व श्रीमती रजनीताई सावकारे, श्री संदिप सुरवाडे भुसावळ शहर अध्यक्ष भा.ज.पा.,डॉ श्री नारायण खडके महाराष्ट्र राज्य एँथेलेटिक्स असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते व श्री चित्रेश जोशी सर वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त (RPF) भुसावळ मंडळ हे होते.

    अतिथींचे स्वागत विविध पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात कुमार अश्वर्य वर्मा व कुमारी सिंड्रेला या राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते मशाल आणून मुख्य अतिथींच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलित करून व नारळ फोडून करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा एँथेलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री राजेश जाधव सर होते. माननीय कापड उद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात भुसावळ तालुक्यातील क्रिडा इतिहास सर्व खेळाडूंना सांगितला, व सर्व खेळाडूंना खेळा साठी शुभेच्छा दिल्या.विधीवत उध्दघाटन सोहळ्या नंतर सर्व गटातील विविध स्पर्धा मध्ये 500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला व राज्य स्पर्धे साठी निवड झाली.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रमण भोळे सरांनी केले. यावेळी भुसावळ तालुका एँथेलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री चन्द्रकांत निकम सर, सचिव श्री रविन्द्र चोपडे सर, श्री राहूल महाजन श्री गोपी सिंह राजपूत, कोषाध्यक्ष श्री उदय महाजन,श्री गुड्डू गुप्ता,श्री कैलाश तांती,श्री सतिश चौधरी, श्री किरण पाटिल, श्री डोंगरसिंग महाजन, श्री योगेन्द्र हरणे,श्री डेनियल पवार, श्री संजय सिरसाठ, मुकुल महाजन, इरफान शेख सर, हिरालाल गौर, कुमारी गौरी लोहार, कुमारी सुजल शुक्ल आदी भुसावल तालूका एथेलेटिक्स एसोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच जळगाव जिल्हा एँथेलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी पंचाचे कार्य संपन्न केले.

  • पोळा_श्रमदेवतेची पूजा करूया संकल्प करूया  आपल्या शेतातील निसर्गाकडून त्यांना मिळणाऱ्या  खाद्यपदार्थाचे जतन करून पर्यावरणाचा समतोल साधूया- डॉ.सुरेंद्रसिंग पाटील

    पोळा_श्रमदेवतेची पूजा करूया संकल्प करूया आपल्या शेतातील निसर्गाकडून त्यांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचे जतन करून पर्यावरणाचा समतोल साधूया- डॉ.सुरेंद्रसिंग पाटील

    आज आपणास अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या कायम कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करत श्रम करणाऱ्या श्रमदेवतेचा दिवस म्हणजेच बैलपोळा .

    शेतकरी त्यांना सर्जा राजा म्हणता बैलांचे म्हणजे सर्जा राजाचे शेतकऱ्यांवर अनंत उपकार असतात व तो आयुष्यभर ते फेडू शकत नाही. जसे आपण गाडीविना राहू शकत नाही तसेच आता मोबाईल विना राहू शकत नाही त्याचप्रमाणे बैलाविना शेतकरी शेती करू शकत नाही.

    शेतकऱ्यांबरोबर कायम कष्ट करणाऱ्या श्रमदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येतो. शेतकरी आपल्या या सर्जा राजासाठी या दिवशी सर्व कामे बंद ठेवतो. या सर्जा राजाची आंघोळ करून त्यांचे शिंग रंगवून तसेच संपूर्ण शरीर अलंकाराने सजवून मनोभावे या श्रमदेवतेची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.

    या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते . शेतामध्ये बैल जोडी शेतकरी कामानिमित्त घेऊन जातो तेव्हा त्यांचे दरवर्षी निसर्गाकडून निर्माण होणारे खाद्य म्हणजे बांधावरील गवत शेतामधील शेतकऱ्यांनी बांध कमी कमी करत क्षेत्र वाढवले त्याचप्रमाणे बांधावर असलेल्या गवतावर फवारणी करत त्यांचा नायनाट होत आहे.

    शेतांमध्ये विश्रामासाठी झाडांची संख्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी विकल्यामुळे कमी झाली डोंगर टेकड्यांवरही तशीच परिस्थिती आहे वनविभागाकडून टेकड्यांवर झाड लावण्यात येतात काही ठिकाणी गवताचा नायनाट करण्यात येतो. या सर्व गोष्टींचा पर्यावरण संतुलावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतातील गवत व झाडे बांध कायम ठेवण्याचे काम करत होते तसेच एकमेकांच्या शेतामध्ये पाणी इकडून तिकडे जात नव्हते टेकड्यांवरील गवत टेकड्यांचा अस्तित्व कायम ठेवून होते गवत जिवंत राहणे हा पर्यावरणाचा मुख्य घटक आहे पर्यावरण मित्र डॉ र सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान उन्हाळ्यामध्ये आपणास गवत दिसत नाही जेव्हा पावसाळा सुरू होतो त्याच्या पहिले जो पाऊस होतो त्या पावसात गवताची निर्मिती होते त्यामुळे गवतांच्या मुळा या पावसाळ्यात माती वाहू देत नाही तसेच गुरांना निसर्गाकडून खाद्य उपलब्ध होते जरी गुरे गवत खात असले तरी मुळे कायम राहतात व पुन्हा पुन्हा गवत त्यावर येत राहते त्यामुळे गवत जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे

    आज पोळ्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांनी श्रमदेवतेस साक्षी ठेवून बांध बंधारे टेकडे कायम ठेवून त्यावर कुठलीही फवारणी करणार नाही तसेच विविध प्रकारची फळझाडे शेतामध्ये लावण्याचा संकल्प करूया व निसर्गाने जो समतोल सर्व जीवसृष्टीसाठी ठेवलेला आहे तो कायम ठेऊया. व आपले श्रम कमी करत आपल्या या सर्जा राजाला जिवंतपणी कत्तलखान्यात देणार नाही हे वचन देऊया.

  • जिल्हास्तरीय शालेय मनपा मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न

    जिल्हास्तरीय शालेय मनपा मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न

    जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर मल्लखांब असोसिएशन, जळगाव शहर महानगरपालिका व एकलव्य क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मनपा स्तरीय शालेय मल्लखाब स्पर्धा आज एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाल्या.

    उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा प्रशासन अधिकारी श्री.खलील शेख साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम, राज्य क्रीडा मार्गदर्शक कु.चंचल माळी,जळगाव जिल्हा ॲम्युचर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजेश जाधव, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्री.प्रशांत कोल्हे, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सहसचिव श्री. विजय विसपुते यांची उपस्थिती होती

    प्रारंभी मान्यवरांनी मल्लखांब खेळाचे प्रणेते बाळभट्ट देवधर व मारुतीराया यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव श्री नरेंद्र भोई यांनी केले स्पर्धेसाठी विविध विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती.

    स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे……

    १४ वयोगट मुले

    प्रथम -जेरीमया जनाथांन (सेंट टेरेसा स्कूल)

    द्वितीय – ऋषिकेश अहिरे (बी यु एन रायसोनी)

    तृतीय -अजिंक्य भामरे( सेंट टेरेसा स्कूल)

    चतुर्थ -भार्गव लवंगे (बाल विश्व स्कूल)

    १७ वयोगट मुले

    प्रथम -अक्षय काळे (सेंट लॉरेन्स स्कूल)

    द्वितीय -लोहित चौधरी (सेंट टेरेसा स्कूल)

    तृतीय -जय जोशी (नूतन मराठा विद्यालय)

    चतुर्थ -अंकुश भोजने (ए.टी.झांबरे विद्यालय)

    १९ वयोगट मुले

    प्रथम -जय केशवानी (सेंट टेरेसा स्कूल)

    द्वितीय -देवेश मराठे (का.ऊ.कोल्हे विद्यालय)

    तृतीय -साहिश परिहार (बी यु एन.रायसोनी विद्यालय)

    चतुर्थ -सोहम पाटील(बी यु एन रायसोनी विद्यालय)

    १४वयोगट मुली

    प्रथम -किंजल सोनवणे (सेंट टेरेसा स्कूल)

    द्वितीय -केतकी गाडे (सेंट टेरेसा स्कूल)

    तृतीय -जीनल दीक्षित (सेंट लॉरेन्स स्कूल)

    चतुर्थ -भूमिका जगताप (सेंट टेरेसा स्कूल)

    १७ वयोगट मुली

    प्रथम -कुशल माळी ( उज्वल इंटरनॅशनल स्कूल )

    द्वितीय -सिया राका (सेंट टेरेसा स्कूल)

    तृतीय -माही झांबड (सेंट टेरेसा स्कूल)

    चतुर्थ – माही गौरव सिंग चंदेल (ओरियन सीबीएससी स्कूल)

    १९ वयोगट मुली

    प्रथम -डिंपल खंडेलवाल (सेंट टेरेसा स्कूल)

    द्वितीय -लावण्या सोनवणे (सेंट तेरेसा स्कूल)

    तृतीय -विभी भावसार (उज्वल इंटरनॅशनल स्कूल)

    चतुर्थ -मृण्मयी महाजन (सेंट टेरेसा स्कूल)

    स्पर्धेत पंच म्हणून श्री.नरेंद्र भोई , श्री. धनराज भोई, मनन छाजेड , इशिका लखवानी, श्री योगेश भोई, श्री निलेश अजनाडकर, श्री नरेश सोनवणे यांनी काम पाहिले.

  • भुसावळमध्ये जिल्हास्तरीय ज्युनिअर व 23 वयोगट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा

    भुसावळमध्ये जिल्हास्तरीय ज्युनिअर व 23 वयोगट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा

    जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन मान्यतेने आणि भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय ज्युनिअर (14, 16, 18, 20) व 23 वयोगट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

    या स्पर्धा २२ ऑगस्ट, शुक्रवार सकाळी ८.३० वा. भुसावळ रेल्वे ग्राऊंड येथे पार पडणार आहेत. जिल्ह्यातील विविध वयोगटातील मुलं-मुली या अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणार आहेत.

    स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.ना. संजयजी सावकारे (वस्त्रोद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सौ. रजनीताई संजय सावकारे (अध्यक्ष, प्रतिष्ठा महिला मंडळ) व श्री. संदीपभाऊ सुरवाडे (शहराध्यक्ष, भाजपा भुसावळ उत्तर) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

    या स्पर्धांमुळे जळगाव जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आपली क्रीडा क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, स्पर्धेच्या तयारीला अंतिम टप्पा आला आहे.