एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये “परिवहन समितीची सहविचार सभा” दि. 22/07/2025 रोजी ठिक 11:00 वाजता घेण्यात आली.मा. जिल्हाधिकारी जळगांव याच्या निर्देशाप्रमाणे मा. गटशिक्षणाधिकारी भुसावळ यांच्या बैठकीनुसार विद्यार्थी वाहतुक सुरळीत होण्यासाठी सहविचार सभा घेण्यात आली.
सदरिल सभेच्या अध्यक्ष स्थानी भुसावळ वाहतुक समितीचे शहर सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश महाले, पालक प्रतिनिधी चेतन आमोदकर, संस्थेचे सेक्रटरी पी.व्ही. पाटील, ऑनररी जॉईंट सेकेटरी प्रमोद नेमाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे, रिक्षाचालक प्रतिनिधी राजेंद्र बोरोले, बस प्रतिनिधी योगेश कोळी सर्व रिक्षाचालक परिवहन समितीच्या सभेस उपस्थित होते.
सभेत सर्व रिक्षाचालकांनी विद्यार्थी परवाना काढुन घेणे, आपल्या रिक्षांना दोन्ही बाजुने जाळया लावून घेणे, प्रत्येक वाहनाचा रंग पिवळा असणे, रिक्षेमध्ये विद्यर्थ्यांना front seat वर बसवू नये, तसेच रिक्षेमध्ये वाहतुक नियमानुसार मर्यादित विद्यार्थी संख्या असावी. विद्यर्थ्यांच्या सर्वागिण सुरक्षितेसाठी वाहतुक नियमांचे कसे पालन करावे या वाहतुक नियमा बाबत चर्चा करण्यात आली.
तसेच पालकांची सुद्धा आपला पाल्य कोणत्या रिक्षाने जात आहे याबाबत वेळोवेळी चौकशी करत रहावी. शालेय वाहनासाठी परिवहन विभागाच्या सूचनांचे वाचन केले सदर कार्यक्रमालाइंग्लिश मिडीयम स्कुल मधील सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन मिस धनश्री महाजन यांनी केले.

Leave a Reply