भारतीय सणांच्या परंपरेमध्ये रक्षाबंधन चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिण भावाच्या अतूट आणि विश्वासाच्या नात्याला बळकटी प्रदान करण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.. भाऊ जसा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतो अगदी त्याचप्रमाणे पोलीस बांधव देखील माता-भगिनींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात याच संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थिनींनी शहरातील पोलीस बांधवांना रक्षा सूत्र बांधण्यासाठी विद्यालयात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील साहेब दामिनी पथकाचे प्रमुख श्री राजेंद्र सांगळे साहेब, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उमेश महाले, शहर वाहतुक शाखेच Api रवींद्र सांळुके,Api रफिक तडवी Api शिवाजी पाटील Api जमिल शेख हवालदार अजय पाटील गुन्हा अन्वेषण विभागाचे नितिन सपकाळे रविंद्र भावसार दिलीप कोल्हे संदीप घ्यार आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन झाले तदनंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि इशस्तवन स्वागत सादर केले. यानंतर विद्यालय प्रशासनातर्फे सर्व उपस्थित पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात उपस्थित राहून उपस्थित सर्व पोलीस बांधवांना रक्षा सूत्र बांधले.
अतिशय भावनाप्रधान अशा या कार्यक्रमाला विद्यार्थिनींना संबोधित करताना. श्री दामिनी पथकाचे प्रमुख राजूभाऊ सांगळे यांनी विद्यार्थिनींना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थी दशेत तुम्ही कठोर परिश्रम केले तर पुढील काळामध्ये तुम्हाला उत्तम अशा प्रकारचे यश लाभेल त्यामुळे कष्ट करा, अभ्यास करा आणि जीवनात यशस्वी व्हा असा सल्ला दिला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील साहेबांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पोलीस प्रशासन सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे तुम्ही केव्हाही अडचणीत असाल तर 112 क्रमांक वर कॉल करा काही क्षणातच पोलीस आपल्याजवळ पोहोचतील आणि आपल्याला मदत करतील अशी माहिती दिली त्यानंतर शाळेतील नाना पाटील सर यांनी आपल्या संस्कृती चा रक्षाबंधन सणाचे महत्व बघता त्याचे संवर्धत संगोपन करा कारण पाश्चिमात्याच्या अनुकरणामुळे रक्षाबंधन सणाचे महत्त्वाची जाणिव ठेवूया .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी यांनी बोलताना पोलीस प्रशासनाचे आभार मानले सर्व मान्यवरांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सर्व पोलीस पदाधिकारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.. नाना पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरिता चौधरी यांनी तर आभार सौ योगिता पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply