शांतीनगर परिसरातील उघड्या गटारी आणि सांडपाण्याच्या समस्यांबाबत २८ मार्च २०२५ रोजी भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे १०२ नागरिकांच्या स्वाक्षरींसह निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत प्रशासनाकडून एकही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही, यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
महिला कॉलेज पासून यावल रोड सरकारी गोडाऊन ते डॉ फिरके हॉस्पिटल पर्यत व तसेच डॉ शास्त्री पासून परिसर सध्या उघड्या गटारी, सांडपाण्याचा प्रवाह, दुर्गंधी आणि डासांच्या प्रकोपामुळे त्रस्त आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.
स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया*
“आम्ही मार्चमध्ये निवेदन दिलं, त्याला ३ महिने पूर्ण होत आहेत. पण प्रशासनाने अद्याप काहीच कार्यवाही केली नाही. ही गंभीर दुर्लक्षवृत्ती आहे.”
या भागात डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, व्यापारी , शिक्षक तसेच सरकारी व निमसरकारी सेवेत काम करणारे अनेक प्रतिष्ठित नागरिक राहतात, तरीसुद्धा या भागाकडे दूर्लक्ष केले जात असल्याने संताप वाढला आहे.
नागरिकांनी संकेत दिले आहेत की, जर लवकरच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर नगरपालिका व इतर प्रशासकीय कार्यालयावर आंदोलन असे पुढील टप्प्याचे कृती आराखडे आखले जातील.

Leave a Reply