शहरातील धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय करणाऱ्या संगीतमय हनुमान चालीसा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. जय श्रीरामच्या गजरात भुसावळ शहर राममय झाले होते. कार्यक्रमात ३८ संघटनांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभु श्रीराम व बजरंगबलीच्या प्रतिमेचे माल्यार्पण व विधीवत पूजन करून झाली. भक्तिभावात न्हालेल्या वातावरणात संगीतमय हनुमान चालीसा सादर झाली आणि उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे राज्याचे संकटमोचन म्हणून ओळख असलेले मा. ना. गिरीश महाजन (जलसंधारण, कुंभमेळा आणि आपदा व्यवस्थापन मंत्री) यांची उपस्थिती.
तसेच वस्त्रउद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजय सावकारे यांनीही भक्तिभावाने हजेरी लावली.
कार्यक्रमात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. राहुल वाघ साहेब यांची उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषद, क्रीडा भारती, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.संगीतमय हनुमान चालीसेच्या माध्यमातून जनजागृती व एकात्मतेचा प्रसार करण्यात आला.

जाहिरात 👇



Leave a Reply