
इटारसी, नर्मदापूरम: रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी संजीवनी ग्रुप (भुसावळ) तर्फे कार्यरत असलेले सागर विसपुते यांना ‘आंतरराष्ट्रीय रक्तवीर सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान मध्यप्रदेश रक्तदान सेवा ग्रुप, इटारसी यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खा. दर्शन सिंह चौधरी (नर्मदापूरम लोकसभा) आणि माननीय डॉ. सीतासरण शर्मा (माजी विधानसभा अध्यक्ष) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सागर विसपुते यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार संपूर्ण संजीवनी ग्रुप आणि त्यामधील सर्व रक्तदात्यांच्या सेवाभावाचे प्रतीक म्हणून समर्पित करण्यात आला. सागर विसपुते यांनी हा सन्मान स्वीकारत आपल्या कार्याचा आणि संजीवनी ग्रुपच्या तत्त्वांचा गौरव जागतिक स्तरावर पोहचवला.”हा पुरस्कार माझा नसून संजीवनी ग्रुपच्या प्रत्येक रक्तदात्याचा आहे,” असे भावनिक उद्गार सागर विसपुते यांनी यावेळी काढले. त्यांनी संपूर्ण ग्रुपकडून सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.संजीवनी ग्रुप हा अनेक वर्षांपासून रक्तदान, आरोग्य शिबिर आणि सामाजिक उपक्रमांत सक्रीय असून, त्यांच्या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे.
भुसावळ, जळगावसह संजीवनी ब्लड ग्रुपने केलेल्या प्रेरणादायक कार्यामुळे अनेक इतर रक्तदाते समूहांनीही त्याच पद्धतीने कार्य सुरू केले आहे. या माध्यमातून अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत असून, हे कार्य एक सामाजिक चळवळ बनत चालले आहे. संजीवनीच्या सेवाभावाची ही प्रेरणा इतर गटांसाठी मार्गदर्शक ठरते आहे.

जाहिरात 👇



Leave a Reply