“धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील यांचे प्रेरणादायी मनोगत

लोखंडाचा गंज हाच लोखंडाला मारत असतो तर चंदन जेवढं घासलं तेवढा तो सुहास प्रदान करतो,त्यामुळे लोखंडासारखं गंजत रहायचं की चंदनासारखं उजळायचं,हे तुम्हीच ठरवा.प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार शाररिक व्यायाम करायलाच हवा, असे प्रतिपादन डॉक्टर तुषार पाटील यांनी आज केले.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, सहसचिव संजीव चौधरी,उपाध्यक्ष भानुदास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.तुषार पाटील उपस्थित होते. जळगाव जिह्यातील एकमेव डॉ. ज्यांनी सलग 4 वेळा साऊथ आफ्रिका मधील सर्वात प्राचीन कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. ही शर्यत विक्रमी वेळात पूर्ण करत पदकांची हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान त्यांना मिळाला असल्याने संघातर्फे शाल,स्मृती चिन्ह देत सत्कार करण्यात आला.

डॉक्टर म्हणाले की मी खाजगी रुग्णसेवा भुसावळला सुरू केल्यावर जसजसा रुग्णांनाचा प्रतिसाद वाढत गेला तसे शरीराकडे दुर्लक्ष होत गेले . त्यामुळे मला उच्च रक्तदाब, स्थूलपणा,डोकेदुखी आदी विविध आजार वाढत गेले. नुसत्या चालण्याने अपेक्षित असे यश मिळत नव्हते. मग हळू हळू धावायला सुरुवात केली व बघता बघता १०, १५ ते अगदी २१ किलोमीटर धावण्यात यश मिळवले. तो आलेख वाढतच गेला.

यावेळी जेष्ट नागरिकांच्या विविध आरोग्य समस्या विषयी डॉक्टरांनी चर्चासत्र भरवत सर्व सभासदांचे समाधान केले.

यावेळी अशोक ढाके,धनराज पाटील, भानुदास पाटील, नरेंद्र महाजन,पंडित शिरतुरे,सोपान नेमाडे, सुनील सूर्यवंशी,दीपक चौधरी, प्रकाश पाटील, एन.डी माळी, दत्तात्रय चौधरी,एच.डी इंगळे, रजनी राणे,रजनी तळेले, प्रमिला धांडे, छबुबाई झांबरे भास्कर खाचणे आदींचे वाढदिवसानिमित्ताने डॉ. तुषार पाटील यांच्या हस्ते उपरणे आणि बुके देत सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री प्रकाश पाटील, प्रमुख पाहुणे परिचय डॉ.नितु पाटील आणि आभार प्रदर्शन सतीश जंगले यांनी मांडले.कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *