भुसावळ रेल्वे विभागात 21 एप्रिल 2025 रोजी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने विशेष तपास मोहिम राबवण्यात आली. भुसावळ स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, ताप्ती गंगा एक्सप्रेस, काशी एक्सप्रेस, सूरत-अमरावती एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस या गाड्यांतील महिला राखीव डब्यांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान अनधिकृतपणे महिला कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना खाली उतरवून, रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत कारवाई करण्यात आली. एकूण 103 प्रकरणांमध्ये प्रत्येकाला ₹300 इतका दंड ठोठावण्यात आला. ही मोहिम RPF निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
महिला प्रवाशांना कोणतीही सुरक्षा अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक 139 वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply