भुसावळ – वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत महिला पतंजली योग समिती, हरिद्वार यांच्या राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील यांनी योग, आहार आणि आरोग्य यावर मार्गदर्शन करताना सांगितले की, योग साधना ही उत्तम आरोग्यासाठीची गुरुकिल्ली आहे.
रिंग रोडवरील ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील, तर सचिव सतीश जंगले आणि प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालिसा पठणाने झाली. “आजारी पडल्यावर फक्त औषधांवर अवलंबून राहू नये, योग साधना केल्यास बरे होण्याचा वेग वाढतो” असे प्रतिपादन करताना पाटील यांनी योग मुद्रा आणि त्यांचे फायदे समजावले.
कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांच्या विविध आरोग्य समस्यांवर चर्चा सत्र घेण्यात आले व सभासदांचे समाधान करण्यात आले.
कार्यक्रमात विकास राणे, संजीव चौधरी, परशुराम चौधरी, मंगला कोळी यांच्यासह मधुकर बेंडाळे आदींचा वाढदिवसाचा सत्कार करण्यात आला. तसेच धार्मिक यात्रेतील सहभाग आणि देणगीदार सभासदांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेपासून आभार प्रदर्शनापर्यंतची सूत्रे श्री. सतीश जंगले यांनी प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply