भुसावळ – दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधनाच्या पावन दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) भुसावळ शाखेच्या वतीने शहरातील पोलिस बांधवांना राखी बांधून सण साजरा करण्यात आला.
हा उपक्रम भुसावळ पोलिस ठाण्यात पार पडला. समाजातील रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस दलाला सन्मान देण्यासाठी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी राखीचा पवित्र धागा बांधून त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अभाविप भुसावळ शहर मंत्री कु. वैष्णवी कोळी तसेच विद्यार्थिनी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सामाजिक आणि भावनिक संदेश अधिक दृढ झाला.

Leave a Reply