१ ऑगस्ट रोजी नेहरू विद्यामंदिर तळवेल येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर ७ व्या अंतराष्ट्रीय रोलर रिले चैम्पियनशिप थायलंड या अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष गटामध्ये भुसावळ व मुळ रहिवासी तळवेल येथिल तीर्थराज मंगेश पाटील विद्यार्थ्याने दोन सुवर्णपदक मिळविले व रिले मॅच मध्ये तिन रजत पदक मिळवून विजयी झाल्याबद्दल नेहरु विद्या मंदिर तळवेल च्या माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्था चेअरमन श्री ज्ञानदेव हरी झोपे यांच्या हस्ते चि तिर्थराज पाटील चा सत्कार करण्यात आला
तिर्थराज हा एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ चा इयत्ता २री चा विद्यार्थी आहे नेहरू विद्यामंदिर तळवेल चे मुख्याध्यापक एस एस अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्था सचिव बी टी इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी यासाठी संस्था सदैव आपल्या सोबत आहे व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा क्षेत्रात सदैव मदतीसाठी तत्पर राहील असे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव हरी झोपे संस्था सचिव बी टी इंगळे सह सचिव अविनाश पाटील नेहरू विद्यामंदिर मुख्याध्यापक एस एस अहिरे तिर्थराज मंगेश पाटीलमंगेश सुभाष पाटील रोहिणी मंगेश पाटील व इतर शिक्षक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि टी रोटे सर यांनी केले प्रास्ताविक श्री एस एस आहिरे सर मुख्याध्यापक यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री एस सी पाटील सर यांनी केले

Leave a Reply