भुसावळ बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर – ॲड. कैलास लोखंडे अध्यक्षपदी

दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळ यांची वार्षिक निवडणूक दिनांक 22 जुलै 2025 रोजी पार पडली. यामध्ये जुलै 2025 ते जुलै 2026 या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून ॲड. कैलास लोखंडे यांची, उपाध्यक्षपदी ॲड. गौतम साळुंखे यांची, सचिवपदी ॲड. दिलीप बोदडे यांची, सहसचिवपदी ॲड. अभिजीत मेने यांची, महिला सहसचिव म्हणून ॲड. जयश्री उदले यांची, कोषाध्यक्ष म्हणून ॲड. मुकेश चौधरी यांची, सहकोषाध्यक्ष म्हणून ॲड. जितेंद्र भतोडे यांची, ग्रंथपाल म्हणून ॲड. प्रीतम मेढे यांची, तर सदस्य म्हणून ॲड. सुशील मेढे, ॲड. कैलास शेळके आणि ॲड. विजयालक्ष्मी मोतियाल यांची निवड करण्यात आली.

सदरील कार्यकारणीचा कार्यकाळ हा जुलै 2025 ते जुलै 2026 पावेतो राहील, येणारे काळात वकील हित आणि संरक्षण कामी कार्य करू अशी माहिती ॲड. कैलास लोखंडे यांनी दिली.

भुसावळ कोर्टात प्रॅक्टीस करणारे, दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन भुसावळ चे सदस्य यांनी नवीन कार्यकारणी चा सत्कार बार रूम भुसावळ कोर्ट येथे केला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *