आपला पृथ्वीवरील खरा मित्र निसर्गमित्राचे रक्षण करूया पर्यावरणाच समतोल राखत पृथ्वीच संरक्षण करूया:- डॉक्टर सुरेंद्रसिंग पाटील

पृथ्वीजवळ पर्यावरणाचा समतोल राखत निसर्गनिर्मित सजीव सृष्टीसाठी आवश्यक ते पुरेस आहे मानवाने आपल्या कर्तव्यापोटी सर्व गोष्टीचे संरक्षण केले पाहिजे परंतु मानवाच्या लालसा /लालचेपोटी त्यांचे लाड पुरवण्यासाठी अतिरिक्त पृथ्वी जवळ काहीही नाही .

तरीसुद्धा निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान करणे सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून.आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे आपला पृथ्वीवर खरा मित्र निसर्ग आहे निसर्ग आहे तर आपण आहोत .

आज मैत्री दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या निसर्ग मित्रास त्रास देऊन विश्वासघात करणार नाही .आजपर्यंत मित्रास मैत्रीत विश्वासघात करून धोका देत ओरबाडण्याचा काम करत आलो . त्यामुळे आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे .आज मैत्री दिनाच्या निमित्ताने संकल्प करून आपल्या मित्रास आश्वासन देऊया आता मैत्रीत दगा करणार नाही .खऱ्या मित्रास दगा दिल्यास काय होते याचे फळ आज रोजी आपण सर्वजण भोगत आहोत डॉ .सुरेंद्र सिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान झालेल्या नुकसानीची परिपूर्ण भरपाई होऊ शकत नसली तरी जे जे शक्य असेल ते करेल .

सर्व सजीवांना लागणारी फळ फुल ऑक्सिजन युक्त विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संवर्धन संगोपन करेल .प्लास्टिकचा वापर करणार नाही .शक्य असेल तेथे सार्वजनिक वाहनांचा वापर करेल ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीवर कंट्रोल करेल तसेच करण्यास सांगेल पाण्याचा गैरवापर न करता आवश्यक तितकाच वापरेल असे ज्या ज्या गोष्टी पर्यावरणास घातक असतील त्यांचा त्याग करून दुसऱ्यांनाही करण्यास सांगेल आज मैत्री दिनाच्या निमित्ताने संकल्प करू या व आपला खरा मित्र निसर्गमित्राचे संरक्षण करून पर्यावरण समतोल राखत पृथ्वीच्या अस्तित्व अबाधित ठेवूया .

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *