Blog

  • रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!नागपूर–नाशिक दरम्यान दोन विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या धावणार; भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड येथे थांबा

    रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!नागपूर–नाशिक दरम्यान दोन विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या धावणार; भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड येथे थांबा

    रेल्वे प्रशासनाने नागपूर ते नाशिक रोड दरम्यान २३ व २४ जुलै २०२५ रोजी दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

    वेळापत्रक व मार्ग:

    रेल्वे गाडी क्रमांक ०१२०६नागपूरहून प्रस्थान: सायंकाळी ७:३० वाजता नाशिक रोड आगमन: दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता

    थांबे असलेली स्थानके:नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड.

    या गाड्यांमध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही.प्रवाशांना स्थानकावर जाऊनच अनारक्षित तिकीट खरेदी करावे लागेल.या निर्णयामुळे ऐनवेळी प्रवास करायच्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    रेल्वे प्रशासनाने गर्दीचा विचार करून अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, तिकीट घ्यावे व अनारक्षित डब्यांचा वापर संयमानं करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • रावेर रेल्वे स्टेशनजवळील गेट क्र. 171B ची दुरुस्ती; 19 ते 25 जुलैदरम्यान वाहतुकीसाठी बंद

    रावेर रेल्वे स्टेशनजवळील गेट क्र. 171B ची दुरुस्ती; 19 ते 25 जुलैदरम्यान वाहतुकीसाठी बंद

    रेल्वे प्रशासनामार्फत गेट क्रमांक 171B (किमी 478/28-30), रावेर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक, दि. 19 जुलै 2025 रोजी सकाळी 07:00 वाजल्यापासून दि. 25 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे पटरीची मरम्मत होणार असल्याने नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

    सात दिवसांच्या बंदमुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक व व्यापाऱ्यांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याबाबत स्थानिक यंत्रणांशी समन्वय सुरू आहे.

  • सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय – रवा उत्तपम पनीरसोबत

    सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय – रवा उत्तपम पनीरसोबत

    सामग्री ( 4 जणांसाठी):

    सूजी उत्तपम/चिला साठी:सूजी (रवा) – 1 कपदही – ½ कपपाणी – सुमारे ½ कप (किंवा गरजेनुसार)मीठ – चवीनुसारहिरवी मिरची (बारीक चिरलेली) – 1आले – 1 लहान चमचा (किसलेले)बेकिंग सोडा – 1 चुटकी (किंवा ¼ चमचा इनो)तूप किंवा तेल – शेकण्यासाठी

    टॉपिंगसाठी भाज्या:

    कांदा – 1 (बारीक चिरलेला)टोमॅटो – 1 (बारीक चिरलेला)शिमला मिरची – ½ (बारीक चिरलेली)कोथिंबीर – 2 चमचेगाजर – 1 लहान (किसलेले, ऐच्छिक)

    पनीर मिक्ससाठी:पनीर – 100-150 ग्रॅम (मॅश केलेले किंवा छोटे तुकडे)मीठ – चवीनुसारकाळी मिरी पूड – ¼ चमचाचाट मसाला – ½ चमचालिंबाचा रस – 1 लहान चमचाकोथिंबीर – 1 चमचा

    कृती:1.

    पीठ तयार करा:

    1.एका बाऊलमध्ये रवा (सूजी) आणि दही मिक्स करा. 2.थोडे-थोडे पाणी घालून पीठ तयार करा (ना खूप पातळ ना खूप घट्ट). 3.त्यात मीठ, आले आणि हिरवी मिरची टाका. 4.झाकून 10-15 मिनिटे विश्रांतीला ठेवा.

    2. पनीर मिक्स तयार करा:

    1 एका बाऊलमध्ये मॅश केलेले पनीर घ्या.2.त्यात मीठ, काळी मिरी, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाका.3.सगळं एकत्र मिक्स करा.

    3. उत्तपम चिला बनवा:

    1.तवा गरम करा आणि त्यावर थोडं तेल पसरवा.2.पीठात बेकिंग सोडा किंवा इनो घालून नीट मिसळा.3.तव्यावर एक डाव पीठ घालून थोडं पसरवा.4.त्यावर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर पसरवा.5.भाज्या थोड्या दाबा जेणेकरून त्या चिकटून राहतील.6.झाकण ठेवून मंद आचेवर खालचा भाग सोनेरी होईपर्यंत भाजा.7 नंतर उलटवून दुसरी बाजूही थोडी भाजा.

    4. पनीर स्टफिंग करा:

    1.तयार चिल्यावर 1-2 चमचे पनीर मिश्रण पसरवा.2 हवे असल्यास अर्धवट मोडा किंवा वरून पनीर पसरवून उघडंही सर्व्ह करा.

    हे उत्तपम गरम गरम पुदिन्याची चटणी, आंबट-गोड चिंच चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

  • सामाजिक सलोखा आणि क्रांतीचे प्रेरणास्थान: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भुसावळात अभिवादन

    सामाजिक सलोखा आणि क्रांतीचे प्रेरणास्थान: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भुसावळात अभिवादन

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळातील अण्णाभाऊ साठे नगर येथे सामूहिक अभिवादन करून त्यांच्या कार्यास आदरांजली वाहण्यात आली.

    या कार्यक्रमात भाजपा शहराध्यक्ष श्री. संदीप सुरवाडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष विकास वलकर, क्रिश संतोष बारसे, अजय लोखंडे वॉर्ड अध्यक्ष, संतोष ठोकळ (सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा), अशोक पारधे, मुकेश कांबळे, श्याम गोरधे यांच्यासह वार्डातील नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या समाजक्रांतिकारी कार्याचा उजाळा देण्यात आला आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.

  • जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून मोफत पंढरपूर यात्रा!

    जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून मोफत पंढरपूर यात्रा!

    महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा सर्वोच्च उत्सव – आषाढी वारी नुकताच भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वारीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून “आनंदाची वारी” या उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेची मोफत सोय करण्यात आली आहे.

    या यात्रेसाठी विशेष रेल्वे ची व्यवस्था करण्यात आली असून शनिवार, दि. १९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता जामनेरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांना जमुन भुसावळ रेल्वे स्थानकासाठी रवाना व्हायचे आहे. यानंतर जामनेर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी भुसावळ येथुन खास आरक्षित रेल्वेने पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे.

    मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. “वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा” ही धारणा बाळगून सरकारने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत हा विशेष उपक्रम राबवला आहे.

    ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

  • गुरुपौर्णिमेनिमित्त अनुलोम संस्थेतर्फे श्री. शिवाजी हायस्कूल खानापूर येथे वनरक्षक सौ. कल्पनाताई पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    गुरुपौर्णिमेनिमित्त अनुलोम संस्थेतर्फे श्री. शिवाजी हायस्कूल खानापूर येथे वनरक्षक सौ. कल्पनाताई पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    श्री. शिवाजी हायस्कूल खानापूर येथे आज दिनांक 10 जुलै 2025 वार गुरुवार रोजी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त अनुलोम संस्थेतर्फे गुरुवंदना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरु शिष्य या विषयावर मार्गदर्शन व विद्यार्थ्यांनी लावले आपल्या आपल्या गुरूंच्या नावे वृक्ष.

    सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर चेक पोस्ट च्या वनरक्षक सौ. कल्पनाताई पवार व अनुलोम चे भाग जनसेवक नथ्थू धांडे उपस्थित होत्या. तसेच गावातील अनुलोम मित्र धनराज महाराज, माधव चौधरी, रघुनाथ भालेराव ही मंडळी उपस्थित होती. सदर कार्यक्रमाप्रसंगी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी वकृत्व सादर केली तसेच सर्व विद्यार्थ्यांना वनरक्षक सौ. कल्पनाताई पवार यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले तसेच आदरणीय धनराज महाराज यांनी सुद्धा सर्व गुरूंचा आदर कसा करावा याचे महत्त्व पटवून दिले.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. पी. बी. इंगळे सर यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रूपाली नेमाडे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार सय्यद वसीम सर यांनी मानले.

    सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सुद्धा सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

  • जगन्नाथ नगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करा -शिशिर जावळे : अंजाळे गावाच्या नामकरण मुद्दा शासन दरबारी प्रलंबित

    जगन्नाथ नगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करा -शिशिर जावळे : अंजाळे गावाच्या नामकरण मुद्दा शासन दरबारी प्रलंबित

    खानदेशातील यावल तालुक्यातील अंजाळे येथील थोर संत वैकुंठवासी परमपूज्य जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे सन्मानार्थ अंजाळे तालुका यावल या गावाचे जगन्नाथ नगर नामकरण करण्याची मागणी भाजपाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव तथा लेवा समाज हितवादी चळवळीचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी शासनाकडे केलेली आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, खान्देशामध्ये वारकरी सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराची परंपरा अखंड अविरतपणे आपल्या हजारो कीर्तन सेवेच्या माध्यमातून व वारीच्या माध्यमातून कायम ठेवणारे व वारकऱ्यांमध्ये विठ्ठल भक्ती जागृत करणारे वयाच्या चौदाव्या वर्षापासून आजन्म पायी वारी करणारे… यावल तालुक्यातील अंजाळे या गावातील थोर संत वैकुंठवासी खानदेश भूषण हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज अंजाळेकर हे निस्वार्थ संत होऊन गेले. त्यांचा शिष्य परिवार खान्देशासह मराठवाडा महाराष्ट्र व भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे.

    या थोर संताचं निस्वार्थ कार्य बघून त्यांना 2008 मध्ये भुसावळ शहरात भव्य अशा कार्यक्रमात खानदेश भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले होते. त्यांना अध्यात्मिक क्षेत्रातील विविध कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले होते. त्यानंतर च्या कालावधीमध्ये महाराजांचा आदर सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याची महती संपूर्ण महाराष्ट्रासह विविध प्रांतात व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाच्या भक्तांच्या विशेष मागणी नुसार अंजाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायतीने.

    अंजाळे या गावाचे जगन्नाथ नगर असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे सादर केला होता. मात्र शासन दरबारी असलेली उदासीनतेमुळे आज पर्यंत सुद्धा या गावाचं नामकरण करण्यात आलेलं नाही तो प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडलेला आहे आणि म्हणून अशा या थोर संताच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा शासन दरबारी प्रलंबित धूळखात असलेला हा नामकारणाचा चा प्रस्ताव त्वरित मंजूर करून यावल तालुक्यातील अंजाळे गावाचे जगन्नाथ नगर असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा लेवाहितवादी चळवळीचे प्रमुख प्रवर्तक शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह , जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहशासनाकडे मागणी केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे

  • भुसावळ  रेल्वे विभाग सुरक्षा आयुक्त व नवनियुक्त क्रीडा अधिकारी श्री. चित्रेश जोशी सर यांची भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन ने घेतली सदिच्छा भेट

    भुसावळ रेल्वे विभाग सुरक्षा आयुक्त व नवनियुक्त क्रीडा अधिकारी श्री. चित्रेश जोशी सर यांची भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन ने घेतली सदिच्छा भेट

    आज भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने भुसावळ रेल्वे विभागाचे सुरक्षा आयुक्त तसेच नव्याने नियुक्त क्रीडा अधिकारी श्री. चित्रेश जोशी सर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.या भेटीत विविध क्रीडा विषयक बाबींवर मोलाची चर्चा झाली.

    या प्रसंगी श्री. रमन भोळे सर यांनी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख श्री. जोशी सरांना करून दिली.

    यावेळी क्रीडा, तरुणांचे प्रशिक्षण, आणि तालुक्यातील अ‍ॅथलेटिक्स विकासाबाबत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

    कार्यक्रमास अध्यक्ष श्री. चंद्रकांत निकम साहेब, सचिव श्री. रवींद्र चोपडे सर, श्री. गोपीसिंग राजपूत, श्री. योगेंद्र हरणे, श्री. गुडू कुमार, श्री. डॅनियल पवार, श्री. सतीश चौधरी तसेच इतर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन – २० जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

    भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन – २० जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

    भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजनभुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता पार पडणार आहे.

    हा सोहळा वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संजयजी वामन सावकारे यांच्या सुरभी नगर, भुसावळ येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

    कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री. संजयजी वामन सावकारे उपस्थित राहणार आहे.

    या सोहळ्यात भुसावळ तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. खेळ आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आयोजित या कार्यक्रमाबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

  • भुसावळात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्व तर्फे सम्मान आपल्या कर्तृत्वाचा कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

    भुसावळात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्व तर्फे सम्मान आपल्या कर्तृत्वाचा कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

    भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्व यांच्या वतीने “सन्मान आपल्या कर्तृत्वाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ येथे करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झालेल्या नवनियुक्त सदस्यांच्या सन्मानार्थ घेण्यात आला. कार्यक्रम भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.ना. संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला.

    या वेळी केंद्र सरकारच्या “एक पेड़ मां के नाम” या पर्यावरणपूरक संकल्पनेनुसार, सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाचा भाग म्हणून भाजपाने एक आगळीवेगळी मानवंदना सादर केली.

    कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून मा.हिरालालजी चौधरी,मा.मधुकरजी राणे,सौ.गोमतीताई बारेला,मा.विकासजी अवसरमल(छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्राप्त) नवनिर्वाचित शहराध्यक्ष मा.संदिप सुरवाडे(उत्तर) मा.किरण कोलते(दक्षिण)प्रास्ताविकातून अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नागेश्वर साळवे यांनी कार्यक्रमाचे महत्व मांडले. सुत्रसंचलन प्रशांत निकम(सरचिटणीस) यांनी केले.भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्व जिल्हा सरचिटणीस अर्जून वाघ,जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, कैलास सुरवाडे,चेतन सावकारे विधानसभा क्षेत्र प्रमुख, कैलास नरवाडे नगरसेवक,सुभाष सुरवाडे,बबलू घारू,अनिल डांबरे,संतोष ठोकळ,रविंद्र दाभाडे,प्रेमचंद तायडे,राकेश सपकाळे,रविंद्रनाथ खरात,भरत उमरिया,विशाल गव्हाळे, विनोद वाघोदे,सुरेंद्र पालवे,किरण सोनवणे,संतोष मेढे,संजय वाघ,बाळू इंगळे,योगेश जोहरे,राजेश साळूंके,किरण वसंत सोनवणे,नगीन वाघ, आकाश भालेराव,मयुर लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

    .आभार प्रदर्शन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी केले.उत्कृष्ट उपक्रमातून सन्मानित करण्यात आले असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.

    भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव पूर्व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले.