Blog

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 29 मध्ये माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 29 मध्ये माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

    प्रभाग क्रमांक 29 चे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या वतीने आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम नगर, पंडित नगर येथील संपर्क कार्यालयात विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. परिसरातील नागरिकांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवर – भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार,भाजप नेते महेश हिरे,मंडलाध्यक्ष राहुल गणरे,माजी नगरसेविका छाया देवा,महिला अध्यक्ष सोनाली ठाकरे,सोनाली राजे पवार,भूषण राणे,तुळशीराम भागवत,प्रकाश सोनवणे,राजेंद्र जडे,दिलीप देवा,शितल भामरे आदी उपस्थित होते.

    त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.तसेच मुकेश शहाणे यांच्या संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले.

    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवन कातकडे, राकेश कोष्टी, सोनू केदारे, प्रदीप चव्हाण, रोहित सूर्यवंशी, पंकज बोरसे, संदीप जाधव, सचिन कमांकर, आनंद आडले, चेतन सानप, कुणाल शहाणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरात समाधान आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

  • आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत तीर्थराज पाटीलचे शानदार यश-वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून तीर्थराजचा सत्कार

    आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत तीर्थराज पाटीलचे शानदार यश-वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून तीर्थराजचा सत्कार

    भुसावळ शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीचा स्केटर व एन.के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील याने थायलंड येथे झालेल्या ७ व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशिप २०२५ मध्ये आपले कौशल्य सिद्ध करत दोन सुवर्णपदक व तीन रजत पदकांची कमाई केली.

    ही स्पर्धा १८ जून ते १९ जून २०२५ दरम्यान बँकॉक, थायलंड येथे एम. टी. एल. इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केटिंग व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, रशिया, थायलंडसह आणखी सात देशांच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.

    तीर्थराजने ८ वर्षांखालील वयोगटातील इनलाईन व क्वाड स्केटिंगमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. शिवाय रिले मॅचमध्ये त्याने तिन रजत पदकांची कमाई करून आपले स्थान भक्कम केले. या घवघवीत यशामुळे त्याला आयोजकांच्या वतीने ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.

    या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजयभाऊ सावकारे यांनी त्याचे खास अभिनंदन करून भुसावळचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवल्याबद्दल त्याचे कौतुक केले.

  • एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये “परिवहन समितीची सहविचार सभा सर्पन्न”

    एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये “परिवहन समितीची सहविचार सभा सर्पन्न”

    एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये “परिवहन समितीची सहविचार सभा” दि. 22/07/2025 रोजी ठिक 11:00 वाजता घेण्यात आली.मा. जिल्हाधिकारी जळगांव याच्या निर्देशाप्रमाणे मा. गटशिक्षणाधिकारी भुसावळ यांच्या बैठकीनुसार विद्यार्थी वाहतुक सुरळीत होण्यासाठी सहविचार सभा घेण्यात आली.

    सदरिल सभेच्या अध्यक्ष स्थानी भुसावळ वाहतुक समितीचे शहर सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश महाले, पालक प्रतिनिधी चेतन आमोदकर, संस्थेचे सेक्रटरी पी.व्ही. पाटील, ऑनररी जॉईंट सेकेटरी प्रमोद नेमाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे, रिक्षाचालक प्रतिनिधी राजेंद्र बोरोले, बस प्रतिनिधी योगेश कोळी सर्व रिक्षाचालक परिवहन समितीच्या सभेस उपस्थित होते.

    सभेत सर्व रिक्षाचालकांनी विद्यार्थी परवाना काढुन घेणे, आपल्या रिक्षांना दोन्ही बाजुने जाळया लावून घेणे, प्रत्येक वाहनाचा रंग पिवळा असणे, रिक्षेमध्ये विद्यर्थ्यांना front seat वर बसवू नये, तसेच रिक्षेमध्ये वाहतुक नियमानुसार मर्यादित विद्यार्थी संख्या असावी. विद्यर्थ्यांच्या सर्वागिण सुरक्षितेसाठी वाहतुक नियमांचे कसे पालन करावे या वाहतुक नियमा बाबत चर्चा करण्यात आली.

    तसेच पालकांची सुद्धा आपला पाल्य कोणत्या रिक्षाने जात आहे याबाबत वेळोवेळी चौकशी करत रहावी. शालेय वाहनासाठी परिवहन विभागाच्या सूचनांचे वाचन केले सदर कार्यक्रमालाइंग्लिश मिडीयम स्कुल मधील सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन मिस धनश्री महाजन यांनी केले.

  • 22 जुलै राष्ट्रीय ध्वज तिरंगा अंगीकारण दिवस या निमित्ताने ह्या पावसाळ्यात प्रत्येकाने सजीव सृष्टीला आवश्यक किमान एक तरी वृक्ष देवतेची प्राणप्रतिष्ठा करावी-पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    22 जुलै राष्ट्रीय ध्वज तिरंगा अंगीकारण दिवस या निमित्ताने ह्या पावसाळ्यात प्रत्येकाने सजीव सृष्टीला आवश्यक किमान एक तरी वृक्ष देवतेची प्राणप्रतिष्ठा करावी-पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    22 जुलै 1947 ला त्याग, बलिदान, शांती व एकतेचे प्रतीक आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा अंगीकरण दिवस . विजयी विश्व तिरंगा प्यारा ,झेंडा उचा रहे हमारा. भूमाता की मिट्टी का तिलक लगाकर हमारा प्यारा तिरंगा ला वंदन करून संकल्प करूया निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे कुठलेही नुकसान न करण्याचा तसेच कार्बन डाय-ऑक्साइड मुक्तऑक्सिजन युक्त करण्याचा सद्यस्थितीत निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे कळत नकळत आपल्या हातून बरेचसे नुकसान झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे संकट खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहे त्यामुळे आपणाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे आदरणीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार एक पेड माॅ के लिये अभियान दोन अभियाना अंतर्गत या पावसाळ्यात सर्व सजीवांना आवश्यक असलेले फळे फुले तसेच वृक्षाचे वटवृक्ष रूपांतर होणारे दीर्घकाळ टिकणारे किमान एक तरी वृक्ष लावून वृक्ष देवतेची प्राणप्रतिष्ठा करूया.

    डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान त्याचे संगोपन व संवर्धन म्हणजे पाण्याची व्यवस्था करून वृक्ष देवतेला पाणी देणे तसेच देखभाल करणे म्हणजेच रोज पाणी टाकून अभिषेक करून पूजा करणे. अशा रीतीने आपण वृक्ष देवतेसाठी घेतलेली काळजीचे प्रसादरुपी फळ आपणास कायमस्वरूपी आयुष्यभर मिळेल वृक्ष देवता चे रूपांतर व ते वृक्षात झाल्यावर स्वतः वृक्ष देवता उन्हात राहुन आपणास सावली देण्याचा काम करतातआपल्या येथील तापमानात घट होऊन ऑक्सिजन युक्त शुद्ध हवा व प्रसन्न वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल. चला तर मग आपण व आपल्यासहित घरातील प्रत्येक सदस्यांनी किमान एक तरी वृक्ष लावून वृक्ष देवतेची प्राणप्रतिष्ठा करून त्याचे संगोपन व संवर्धन करून जगवू या .

  • आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फैजपूरमध्ये महारक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न

    आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फैजपूरमध्ये महारक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न

    नवमहाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे विकास पुरुष मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भव्य “महारक्तदान शिबीर” आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अमोल जावळे उपस्थित होते.त्यांनी स्वतः रक्तदान करत समाजात एक सकारात्मक संदेश दिला.

    शिबिरात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.आ. अमोल जावळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,”रक्तदान हे केवळ आरोग्यदायी नव्हे, तर समाजप्रती असलेली कर्तव्य भावना दर्शवते. असे उपक्रम म्हणजेच खरी लोकसेवा.”

  • सिद्धगुरू नित्यानंद स्वामी पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप-सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ यांचा उपक्रम

    सिद्धगुरू नित्यानंद स्वामी पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप-सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ यांचा उपक्रम

    ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे सिद्धगुरू नित्यानंद स्वामी यांच्या 64 वा पुण्यतिथीनिमित्त निंभोरा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही, पाटी,कंपास आदी साहित्य वाटप करण्यात आले.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान हे दरवर्षी सिद्धगुरू नित्यानंद स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. सिद्धगुरु नित्यानंद स्वामी यांचा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बालभोजन.गणेशपूरी,मुंबई याठिकाणी स्वामीची समाधी मंदिर असून त्याठिकाणी दररोज बालभोजन उपक्रम सुरू असतो.तोच उपक्रम पुढे चालवत प्रतिष्ठान तर्फे भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील 40 विद्यार्थ्यांना पंचमुखी हनुमान कवच, वही, पाटी, कंपास आदी चे वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमांनंतर सर्वाना भाजी,पोळी, श्रीखंड आदींचे भोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका सुनीता जोशी, क्रांती ढाके, करुणा जोहरे,तुकाराम पाटील, वैशाली पाटील,डॉ. नितु पाटील,डॉ.रेणुका पाटील, राहुल माळी, राम शेटे, विवेक पाटील,चेतन झोपे आदी उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान सदस्य रिद्धी फेगडे,चिरंजीव वेदांत, चिरंजीव दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे,मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी,मनोज गोसावी आदींनी परिश्रम घेतले.

  • भुसावळ तालुका एथलेटिक्स असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा संपन्न

    भुसावळ तालुका एथलेटिक्स असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा संपन्न

    आज रोजी भुसावल तालूका एथेलेटिक्स एसोसिएशन, भुसावळचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा, माननीय वस्त्र उद्योग मंत्री श्री संजय भाऊ सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला.

    यात दोन जिवन गौरव पुरस्कार श्री इंद्रसिग गुलाबसिग पाटील व श्री गजानन टंकाधर यांना देण्यात आला. उत्कृष्ट क्रिडा प्रशिक्षकाचा पुरस्कार श्री पुर्वेश प्रमोद सोनवणे यांना देण्यात आला.

    उत्कृष्ट खेळाडू चा पुरस्कार कुमारी गौरी कृष्णा लोहार, कुमारी सुजल महेंद्र शुक्ल व कुमार प्रसाद सदाशिव सोनावणे यांनी देण्यात आला, तर विशेष योगदान पुरस्कार श्री गुड्डू कुमार व दिया पटेल यांना देण्यात आला.

    या वेळी प्रोत्साहन पर पंधरा ते विस कनिष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तर कु. जोसेफ डँनियल पवार या खेळाडू ला महाजन इ-बाईक्स तर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला.

    कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्रीमती रजनी ताई सावकारे, श्री संदीप भाऊ सुरवाडे, श्री किरण भाऊ कोलते, श्री राहूल भाऊ तायडे, माजी नगरसेवक श्री पवन बुंदेले, श्री जयंत माहूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. श्री राहूल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रमण भोळे सरांनी केले.

    पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या पालकांची उपस्थिती लक्षवेधी होती.यावेळी भुसावळ तालुका एँथेलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री चन्द्रकांत निकम साहेब जी, व सचिव श्री रविन्द्र चोपडे सर जी, कार्यकारी सचिव श्री गोपी सिंह राजपूत जी कोषाध्यक्ष श्री उदय महाजन , श्री किरण पाटिल, श्रीमती ममता जांगिड, श्री डोंगरसिंग महाजन, श्री सत्यवान बिंद्रा श्री योगेन्द्र हरणे, श्री सरोज कुमार, श्री सुरेंद्र पाटिल, श्री डेनियल पवार जी,, आदी भुसावल तालूका एथेलेटिक्स एसोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते।

  • जय गणेश फाऊंडेशन निस्पृहपणे कार्य करणारी संस्था- रमण भोळेसर :सर्वसाधारण सभेत कृती, कर्तृत्व आणि प्रेरणेला सलाम – १० मान्यवरांचा सन्मान

    जय गणेश फाऊंडेशन निस्पृहपणे कार्य करणारी संस्था- रमण भोळेसर :सर्वसाधारण सभेत कृती, कर्तृत्व आणि प्रेरणेला सलाम – १० मान्यवरांचा सन्मान

    भुसावळ शहरातील जय गणेश फाऊंडेशन ह्या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ.सुधा खराटे आदी उपस्थित होते.

    यावेळी भुसावळ शहरातील विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या दहा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना क्रीडाशिक्षक रमण भोळे यांनी जय गणेश फाऊंडेशन च्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रा. सुधा खराटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव तुकाराम आटाळे यांनी केले.

    अध्यक्षीय भाषणात राजेंद्र यावलकर यांनी पुढील नियोजित उपक्रमांची माहिती दिली. ‘सन्मान कर्तृत्वाचा’ अंतर्गत सन्मान करण्यात आलेल्या व्यक्तींचा परिचय फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी करून दिला.

    सूत्रसंचालन हर्षल वानखेडे याने केले. सभा यशस्वीततेसाठी राहुल भावसेकर, तुषार झांबरे,प्रवीण पाटील, निलेश कोलते, नचिकेत यावलकर, मनोज चौधरी, विशाल आहुजा,दगडू पाटील आदींनी प्रयत्न केले.

    कृती, कर्तृत्व आणि प्रेरणेला सलाम – १० मान्यवरांचा सन्मान

    रमण भोळे,विश्वनाथ पाटील, बाळकृष्ण झांबरे,विरेंद्र पाटील,नुपूर भालेराव,राजेंद्र जावळे, अजय आंबेकर, सौ.प्रिया पाटील, ज्ञानेश धांडे, विरेंद्र फिरके यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

  •  “विठुरायाच्या दर्शनासाठी आनंदाची वारी : जामनेर तालुक्यातील भाविक विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना”

     “विठुरायाच्या दर्शनासाठी आनंदाची वारी : जामनेर तालुक्यातील भाविक विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना”

    पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी “आनंदाची वारी” या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील असंख्य भाविकांसह एक विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली.

    भुसावळला निघण्यापूर्वी जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय ते विश्वकर्मा चौक या मार्गावर पारंपरिक पायी दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाचा जयघोष करत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

    या अध्यात्मिक वारीचा एक भाग होण्याचे भाग्य मिळाल्याची भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. “ही वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर अध्यात्मिक एकात्मतेचा उत्सव आहे,” असे त्यांनी सांगितले.

  • अनुलोमच्या माध्यमातून  नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल तालुका रावेर येथे गुरुवंदना उपक्रम संपन्न

    अनुलोमच्या माध्यमातून नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल तालुका रावेर येथे गुरुवंदना उपक्रम संपन्न

    गुरु पौर्णिमेच्या निमित्त चिनावल येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल येथे महंत प.पु.श्री. लक्ष्मण दास जी महाराज रामायणाचार्य अयोध्या धाम यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरु व शिष्य यांच्या प्रेमळ नात्यातील बारकावे समजून सांगितले

    मार्गदर्शनानंतर शाळेतील मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे यांनी महंत व अनुलोमचे आभार मानले संस्थेचे सुनील महाजन व खेमचंद्र पाटील यांनी संस्थेच्या वतीने महंतांचा स्वागत व सत्कार केला संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

    महंतांच्या मार्गदर्शनानंतर 800 विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या वर्ग शिक्षकांच्या व आलेल्या महंतांची चरण वंदना केली या उपक्रमासाठी अनुलोमचे उपविभाग जनसेवक दिनेश चव्हाण,अनुलोमचे भाग जनसेवक नथ्थू धांडे, अनुलोमचे मित्र निलेश नेमाडे ,शुभम सरोदे , जितेंद्र वानखेडे यांनी परिश्रम घेतले