Blog

  • वृक्षसंवर्धनाचा आदर्श समोर ठेऊन वाढदिवस साजरा: विजय नारायण कोळींच्या संकल्पनेतून साकरीत जनता हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

    वृक्षसंवर्धनाचा आदर्श समोर ठेऊन वाढदिवस साजरा: विजय नारायण कोळींच्या संकल्पनेतून साकरीत जनता हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

    ‘एक पेड मा के नाम’ या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत व राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाला हातभार लावत, आज जनता हायस्कूल साकरी येथे एक विशेष वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

    या कार्यक्रमाचे विशेषत्व म्हणजे, विद्यार्थी विजय नारायण कोळी याचा वाढदिवस प्रकृतीच्या सेवेसाठी समर्पित करत वृक्षारोपण करण्यात आले. विजय नारायण कोळी आणि त्याचे सहकारी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात तसेच गावातील विविध ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावली.

    या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळी साकरीकर, उप पर्यवेक्षक राजपूत सर, वानखेडे सर, सुपे सर, देवयानी नेहेते मॅडम, तसेच विद्यार्थी रोशन तायडे, हेमांशु महाजन, यश फेगडे, प्रतीक फेगडे, मनिष पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

    कार्यक्रमादरम्यान राजपूत सर यांनी सांगितले की, “विजय कोळी दरवर्षी आपल्या वाढदिवशी वा कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपण करत असतो, हे कौतुकास्पद आहे.”

    या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजवण्याचा आणि समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    हा वृक्षारोपण उपक्रम इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, विजय कोळी याचे अभिनंदन होत आहे.

  • तापी महाआरतीस प्रारंभ – सूर्यकन्या तापीभक्त परिवाराचा उपक्रम

    तापी महाआरतीस प्रारंभ – सूर्यकन्या तापीभक्त परिवाराचा उपक्रम

    भुसावळ येथे सूर्यकन्या तापी मातीच्या महाआरतीस प्रारंभ करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातून जाणारी जगातील पहिली नदी तापी आणि तिचा सभोवतालचा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे . त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी जलप्रदूषण होते वृक्षांची कत्तल सुद्धा होत आणि याच्यावर प्रशासनाच अंकुश नाही.

    एकीकडे गुजरात मध्य प्रदेश मध्ये तसेच महाराष्ट्रातील शहादा प्रकाशा येथे तापी नदीचा मोठ्या प्रमाणात आरती व इतर विविध सेवा करून सन्मान केला जातो दररोज त्या ठिकाणी विविध घाटांवरती डोळ्यांचे पाळणे फेडणारी अशी सामूहिक आरती केली जाते .

    तेथील प्रशासन तापी नदी घाटाच्या विकासासाठी तसेच तापी परिसराच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने तेथील जनतेला सोबत घेऊन त्या ठिकाणचा विकास करीत आहेत. मात्र भुसावळ शहरात प्रशासन याबाबत प्रचंड उदासीन आहे.

    तापी महात्म्य खूप मोठ आहे आणि म्हणून तापीची महती समस्त भक्तांना कळावी तसेच तापी नदीत आणिपरिसरात होणारे प्रदूषण निवारण ,तापी नदी परिसर स्वच्छता, सुशोभीकरणासाठी तसेच तापी घाटांची निर्मिती साठी प्रयत्न करून इतर अध्यात्मिक ,धार्मिक , सामाजिक कार्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामूहिक रित्या भुसावळ येथील तापी नदीची महाआरतीस प्रारंभ करण्यात आलेला आहे.

    या आरती मध्ये विविध सामाजिक, अध्यात्मिक संस्था संघटना तसेच इतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले जनतेला सोबत घेऊन महाआरतीचा क्रम कायम सुरू ठेवणार आहे .यासाठी सूर्यकन्या तापी महाआरती भक्त परिवार असा एक समूह तयार करण्यात आलेला आहे. आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी तापी नदीवरील महादेव घाटावर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

    याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे, सकल लेवा सखी मंडळाच्या अध्यक्षा भोरगाव रगाव पंचायत च्या पंच सौ मंगला पाटील, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, बापू दादा महाजन दिलीप टाक ,हिंदु जागरण मंचचे कैलास सिंग चव्हाण ,साहित्यिक संध्या भोळे मॅडम, गोकुळ सरोदे जगन्नाथ अत्तरदे , शालिनी राणे प्रगती पाटील नेहा रुळकर यांचे सह इतर भाविक उपस्थित होते.

  • “योग मुद्रा आणि योग्य आहार – उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली” : महानंदा पाटील यांचे प्रतिपादन

    “योग मुद्रा आणि योग्य आहार – उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली” : महानंदा पाटील यांचे प्रतिपादन

    भुसावळ – वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत महिला पतंजली योग समिती, हरिद्वार यांच्या राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील यांनी योग, आहार आणि आरोग्य यावर मार्गदर्शन करताना सांगितले की, योग साधना ही उत्तम आरोग्यासाठीची गुरुकिल्ली आहे.

    रिंग रोडवरील ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील, तर सचिव सतीश जंगले आणि प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली पाटील उपस्थित होत्या.

    कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालिसा पठणाने झाली. “आजारी पडल्यावर फक्त औषधांवर अवलंबून राहू नये, योग साधना केल्यास बरे होण्याचा वेग वाढतो” असे प्रतिपादन करताना पाटील यांनी योग मुद्रा आणि त्यांचे फायदे समजावले.

    कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांच्या विविध आरोग्य समस्यांवर चर्चा सत्र घेण्यात आले व सभासदांचे समाधान करण्यात आले.

    कार्यक्रमात विकास राणे, संजीव चौधरी, परशुराम चौधरी, मंगला कोळी यांच्यासह मधुकर बेंडाळे आदींचा वाढदिवसाचा सत्कार करण्यात आला. तसेच धार्मिक यात्रेतील सहभाग आणि देणगीदार सभासदांचाही गौरव करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या प्रस्तावनेपासून आभार प्रदर्शनापर्यंतची सूत्रे श्री. सतीश जंगले यांनी प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  • एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील नऊशे विद्यार्थ्यांनी केला वृक्ष लागवडीचा संकल्प

    एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील नऊशे विद्यार्थ्यांनी केला वृक्ष लागवडीचा संकल्प

    शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शिक्षण विभागाकडून निर्धारित केलेल्या एक पेड मा के नाम या उपक्रमाला अतिशय उत्साहात प्रतिसाद दिला आहे

    शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले त्या अनुषंगाने शाळेतील नऊशे विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोरील अंगणामध्ये एक पेड मा के नाम लावण्याचा आणि ते वृक्ष त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे वृक्ष लागवड केली .यावेळी शालेय प्रशासनाकडून देखील शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते शाळेतील *इको क्लब* च्या सर्व विद्यार्थ्यांनी सदस्य तसेच शिक्षक सदस्यांना वड ,आंबा, चिंच, कडूनिंब, गुलमोहर, बाभूळ ,पिंपळ, सप्तपर्णी अशा विविध वृक्षांचे रोपांचे वाटप करण्यात आले.. यावेळी शाळेतील शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या शाळेमध्ये घरासमोरील अंगणामध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प केला….

  • तालुका व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती यादीत एन.के. नारखेडे स्कूलचे ८ विद्यार्थी

    तालुका व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती यादीत एन.के. नारखेडे स्कूलचे ८ विद्यार्थी

    संस्थेने चालविलेल्या एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल, शारदा नगर, भुसावळ या शाळेतील इ.5वी आणि इ.8वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर झाला.

    या परीक्षेत शाळेतील एकुण 8 विदयार्थी मेरीट यादी मध्ये तालुकास्तरीय आणि जिल्हा स्तरीय निवड होवुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

    यामध्ये इ.5वी च्या वर्गातील चैतन्य किरण पाटील आणि अनुष्का दिनेश वाणी या विदयार्थ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मेरीट यादी मध्ये निवड होवुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

    इ.8वी च्या वर्गातील निशांत दिनेश वाणी, दुर्वेश पराग चौधरी, चेतन लिलाधर चौधरी, कशिश संतोष तेली, घृष्मा राजेंद्र चौधरी, श्रेया प्रशांत ब-हाटे या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मेरीट यादी मध्ये निवड होवुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

    सदरील विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे, उपाध्यक्ष डॉ. किशोर एन. नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन. नारखेडे, सेंक्रेटरी. पी.व्ही. पाटील,तसेच संस्थेतील सर्व सभासदांतर्फे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी विदयार्थ्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या विदयार्थ्याना त्याचे शिक्षक व पालक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

  • नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या स्मृती प्रीत्यर्थ वरणगाव येथे रक्तदान व आरोग्य शिबिर

    नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या स्मृती प्रीत्यर्थ वरणगाव येथे रक्तदान व आरोग्य शिबिर

    वरणगाव – नेपाळमधील भीषण दुर्घटनेला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या दुर्घटनेतील मृतांच्या स्मृती प्रित्यर्थ गणपती हॉस्पिटल, वरणगाव येथे एक भावस्पर्शी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    या दिवशी, २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत रक्तदान शिबिर तसेच मोफत निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः दुर्बीणद्वारे गर्भपिशवी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, मुतखडा, प्रसूती, सीझर, फायमोसिस, अंगावरील गाठी इ. बाबत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.

    हा उपक्रम वरणगाव शहरवासी, ऑर्डन्स फॅक्टरीतील सर्व कर्मचारी, विविध राजकीय व सामाजिक गट तसेच गणपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.

    कार्यक्रमाद्वारे समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत नेपाळ दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

  • भुसावळ बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर – ॲड. कैलास लोखंडे अध्यक्षपदी

    भुसावळ बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर – ॲड. कैलास लोखंडे अध्यक्षपदी

    दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळ यांची वार्षिक निवडणूक दिनांक 22 जुलै 2025 रोजी पार पडली. यामध्ये जुलै 2025 ते जुलै 2026 या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात आला.

    या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून ॲड. कैलास लोखंडे यांची, उपाध्यक्षपदी ॲड. गौतम साळुंखे यांची, सचिवपदी ॲड. दिलीप बोदडे यांची, सहसचिवपदी ॲड. अभिजीत मेने यांची, महिला सहसचिव म्हणून ॲड. जयश्री उदले यांची, कोषाध्यक्ष म्हणून ॲड. मुकेश चौधरी यांची, सहकोषाध्यक्ष म्हणून ॲड. जितेंद्र भतोडे यांची, ग्रंथपाल म्हणून ॲड. प्रीतम मेढे यांची, तर सदस्य म्हणून ॲड. सुशील मेढे, ॲड. कैलास शेळके आणि ॲड. विजयालक्ष्मी मोतियाल यांची निवड करण्यात आली.

    सदरील कार्यकारणीचा कार्यकाळ हा जुलै 2025 ते जुलै 2026 पावेतो राहील, येणारे काळात वकील हित आणि संरक्षण कामी कार्य करू अशी माहिती ॲड. कैलास लोखंडे यांनी दिली.

    भुसावळ कोर्टात प्रॅक्टीस करणारे, दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन भुसावळ चे सदस्य यांनी नवीन कार्यकारणी चा सत्कार बार रूम भुसावळ कोर्ट येथे केला.

  • क्रीडा संकुलनास सरदार पटेल यांचे नाव द्या— लेवा समाजाची मागणी  मुख्यमंत्र्यांना प्रांत अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाठविले निवेदन

    क्रीडा संकुलनास सरदार पटेल यांचे नाव द्या— लेवा समाजाची मागणी मुख्यमंत्र्यांना प्रांत अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाठविले निवेदन

    *भुसावळ* – भुसावळ तालुक्यासाठी पूर्णत्वास येत असलेले भुसावळ तालुका क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या क्रीडा संकुलनास लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचे नाव देणे संदर्भात लेवा समाजातर्फे नुकतेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की भुसावळ तालुक्यात 7 कोटी 29 लाख 45 हजार रुपयांच्या निधीतून शहरातील क्रीडा संकुल उभारले जात आहे. स्विमिंग पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता विविध खेळांची मैदाने तयार केली जात आहेत.

    कामासाठी दिलेली मुदत जुलै अखेरपर्यंत संपणार आहे. संकुलाचे कामही याच दरम्यान पूर्ण होईल. वेळेत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती क्रीडा विभागाने नुकतीच दिली आहे भुसावळ तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, इनडोअर गेम्स स्टेडियमच्या इमारतीचेही काम पूर्ण झाले आहे.

    सध्या बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, टेनीस, लाँग जंम्प, ट्रिपल जंम्प, रनिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, नेट क्रिकेट आदी मैदानांचे स्वतंत्र मैदाने तयार केली जात आहे.यासाठी जमिन समतीलकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. काम जलदगतीने व गुणवत्तेत पूर्ण करण्यात यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात रंगरंगोटी करुन जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल.

    तालुका क्रीडा संकुलातील गॅलरी व इनडोअर गेम्ससाठी हॉलचे कामही पूर्णत्वाकडे गेले आहे. यानंतरच्या टप्प्यात विविध उर्वरित कामांनाही गती दिली जाणार आहे. ही कामे अत्यंत जलद गतीने पूर्ण होतील, अशी माहितीही क्रीडा विभागाने दिली.

    शहरातील क्रीडा संकुलात मैदाने तयार करण्याच्या कामाला गती आली. भुसावळ शहरातील हे क्रीडा संकुल संपूर्णपणे तयार झाल्यानंतर ,या क्रीडा संकुलाचे राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा संदेश देणारे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल क्रीडा संकुल भुसावळ तालुका भुसावळ जिल्हा जळगाव असे नामकरण करण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण होणे करिता लेवा पाटीदार समाजातर्फे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रांताधिकारी कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते साहेब यांना देण्यात आले.

    याप्रसंगी लेवा हितवादी चळवळीचे मुख्य प्रवर्तक शिशिर जावळे, सकल लेवा सखी मंडळाच्या अध्यक्षा तथा भोरगाव लेवा पंच सौ मंगला पाटील, अमोल पाटील, अँड सागर सरोदे, बापू दादा महाजन,पवन बाकसे, विकास पाटील, राहुल पाटील, दिगंबर भोळे,, शांताबाई भोळे ललित पाटील, दिलीप चौधरी, साई सरोदे, कुशल पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

  • भोळे महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

    भोळे महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मा. प्राचार्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

    आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांनी टिळकांचे शिक्षण विषयक विचार स्पष्ट करीत असतांना शिक्षण हेच खरे शक्तिशाली शस्त्र आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच राष्ट्र ऊभे राहू शकते असे प्रतिपादन केले तसेच सार्वजनिक सणांच्या माध्यमातून समाजात एकता निर्माण करण्यासाठी संघटनाचे महत्व स्पष्ट केले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. ए. आर. सावळे यांनी केले तर आभार प्रा. श्रेया चौधरी यांनी मानले.

    या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. बी. चव्हाण यांचे सह प्रा. डॉ. आर. बी. ढाके, प्रा. डाॅ. जी. पी. वाघुळदे , प्रा. डाॅ. एस. डी. चौधरी प्रा. डाॅ. जयश्री सरोदे , प्रा. डाॅ. माधुरी पाटील, प्रा. डाॅ. अंजली पाटील, प्रा. संगीता धर्माधिकारी, प्रा. एन. एस. वानखेडे ,प्रा. आर. डी. भोळे, प्रा. संजय डी. चौधरी, प्रा एस एस पाटील, प्रा खिलचंद धांडे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते .

  • पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

    पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

    दिनांक २० जुलै २०१५ रोजी राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठान भुसावळ संचलीत पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापनदिन लोणारी मंगल कार्यालय येथे मा. राजेंद्रभाऊ चौधरी, माजी सभापती पं.स भुसावल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा मा युवराजभाऊ लोणारी, माजी नगराध्यक्ष, नपा भुसावल, मा. सतीश भाऊ सपकाळे, मा-मुकेश पाटील, मा. राजुभाऊ आवटे, माजी नगरसेवक न.पा भुसावळ तसेच भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष मा. अँड. तुषार पाटील मा.टी.एस बावस्कर, मा आर.डी. बावस्कर, मा.पी.एस हरणकर व मा. बी.जी.चव्हाण हे व्यासपीठावर हजर होते

    सर्व मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज तसेच महर्षी पतंजली यांच्या फोटोचे माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.वर्धापन दिन कार्यक्रमा करिता कुन्हा (पानाचे), खंडाळे, ता भुसावळ व शहरातील जयगुरुदेव जेष्ठ नागरिक संघ, जय मंगल जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आवर्जुन हजर होते.

    मान्यवरांनी जेष्ठ नागरिकांना दीर्घायुष्य लाभो तसेच सध्या च्या परिस्थितीत कुटुबांशी जुळवून घेण्याकरिता स्वभावात फरक करून घेण्याच आवाहन केले. पुढील वर्षी पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या सभागृहात संपन्न व्हावा याबाबत शुभेच्छा दिल्या जेष्ठ नागरिक संघास नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन मा.श्री युवराजभाऊ लोणारी, मा-श्री. सतिशभाऊ सपकाळे, मा-भी राजुभाऊ आवटे यानी दिले. जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या सन्माननीय सदस्यांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर आशिष राठी यांनी नूतन कार्य करण्याचे स्वागत केले.

    श्री एस एम अकोले सचिव यांनी प्रास्ताविक भाषण केले तसेच श्री ए बी श्रावगी कोषाध्यक्ष यांनी आर्थिक जमाखर्च वाचून दाखवला. नवीन कार्यकारिणी वाचून दाखवली. सूत्रसंचालन श्री के यु पाटील सर मुख्याध्यापक चिखली बुद्रुक तालुका यावल यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बी एस पाटील यांनी केले

    श्री. आर. एस वसतकर (सेवानिवृत्र API) यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. श्री एस एम अकोले यांनी आगामी काळात करावयाच्या नियोजन बाबत सभेत माहिती दिली. सभेस स्त्री पुरुष मिळून ९०ते १०० जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

    वंदेमातरम राष्ट्रीय गीत वाजवून सभेची सांगता झाली. सभेनंतर सुरुची भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला