Blog

  • श्रावणात रानातील महादेव मंदिरात अध्यात्मिक उत्सवांची रेलचेल-उद्या श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रा आयोजित

    श्रावणात रानातील महादेव मंदिरात अध्यात्मिक उत्सवांची रेलचेल-उद्या श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रा आयोजित

    रानातील महादेव मंदिर, श्रावण २०२५:श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र रानातील महादेव मंदिरात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात रोज संध्याकाळी ७ वाजता नित्य आरती होते.

    विशेष म्हणजे:- रविवारी दुपारी ५ वाजता बालसंस्कार वर्ग सोमवारी ७ वाजता श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण (११वा अध्याय) मंगळवारी सकाळी ५ वाजता सुंदरकांड पाठ आणि सायंकाळी ७.३० वाजता हनुमान चालीसा शनिवारी ७ वाजता सुंदरकांडाचे सामूहिक पठण याशिवाय, प्रत्येक दशमी, एकादशी आणि द्वादशीला श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण केले जाते.

    मंदिरात संस्कृती व सनातन धर्म प्रचार यासाठी विशेष उपक्रम जसे की श्रीरामकथा, श्रीमद भागवत कथा, आणि श्री शिव महापुराण कथा यांचे आयोजनही करण्यात येते.गुरुवर्य श्री अतुल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम पार पडत असून, भक्तांनी या सेवांमध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे

    रानातील महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर संस्कार, साधना, आणि समाज प्रबोधनाचे केंद्र आहे.

    या सर्व उपक्रमांमध्ये आपली सदिच्छा, सेवा आणि उपस्थिती यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.ही एक अद्वितीय संधी आहे – भक्ती, संस्कार, व आध्यात्मिक उन्नती साधण्याची!आपण कुटुंबासह या कार्यक्रमांना उपस्थित राहून, अध्यात्मिक आनंद व पुण्य प्राप्त करावे, ही विनम्र विनंती.

  • श्रावणात रानातील महादेव मंदिरात अध्यात्मिक उत्सवांची रेलचेल-उद्या श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रा आयोजित

    श्रावणात रानातील महादेव मंदिरात अध्यात्मिक उत्सवांची रेलचेल-उद्या श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रा आयोजित

    रानातील महादेव मंदिर, श्रावण २०२५:श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र रानातील महादेव मंदिरात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात रोज संध्याकाळी ७ वाजता नित्य आरती होते.

    विशेष म्हणजे:- रविवारी दुपारी ५ वाजता बालसंस्कार वर्ग सोमवारी ७ वाजता श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण (११वा अध्याय) मंगळवारी सकाळी ५ वाजता सुंदरकांड पाठ आणि सायंकाळी ७.३० वाजता हनुमान चालीसा शनिवारी ७ वाजता सुंदरकांडाचे सामूहिक पठणयाशिवाय, प्रत्येक दशमी, एकादशी आणि द्वादशीला श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण केले जाते.

    मंदिरात संस्कृती व सनातन धर्म प्रचार यासाठी विशेष उपक्रम जसे की श्रीरामकथा, श्रीमद भागवत कथा, आणि श्री शिव महापुराण कथा यांचे आयोजनही करण्यात येते.

    गुरुवर्य श्री अतुल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम पार पडत असून, भक्तांनी या सेवांमध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे

    रानातील महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर संस्कार, साधना, आणि समाज प्रबोधनाचे केंद्र आहे.

    या सर्व उपक्रमांमध्ये आपली सदिच्छा, सेवा आणि उपस्थिती यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.

    ही एक अद्वितीय संधी आहे – भक्ती, संस्कार, व आध्यात्मिक उन्नती साधण्याची!आपण कुटुंबासह या कार्यक्रमांना उपस्थित राहून, अध्यात्मिक आनंद व पुण्य प्राप्त करावे, ही विनम्र विनंती.

  • प्रा. डॉ. दयाघन राणे यांचा भोळे महाविद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न

    प्रा. डॉ. दयाघन राणे यांचा भोळे महाविद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दयाघन एस राणे हे एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झालेत.

    सेवापूर्ती समारंभासाठी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तसेच प्राचार्य फोरम चे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री रमण भाऊ भोळे तसेच पराग पाटील कार्यालयीन अधिक्षक उपस्थित होते.

    उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ आर पी फालक, प्रा डॉ संजय चौधरी आणि प्रा डॉ आर बी ढाके यांनी केले.

    कार्यक्रम प्रसंगी मा. रमणभाऊ भोळे आणि प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते प्रा डॉ दयाघन राणे यांचा सपत्नीक सत्कार केला गेला. या वेळी सन्मानवस्त्र उभयतांसाठी सन्मानपूर्वक ड्रेस आणि पैठणी वस्त्र तसेच चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करीत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी आपल्या नोकरीच्या एकतीस वर्षांच्या काळात घेतलेल्या अनेक अनुभवांच्या आठवणी सांगितल्या त्या वेळी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झालेले होते.

    आपल्याला मिळालेल्या सहकार्य, आपुलकी, प्रेम आणि पाठबळ या मुळेच आपण अनेक गोष्टी करू शकलो असे मत व्यक्त करीत उपस्थित स्टाफच्या सदस्यांचे तसेच महाविद्यालय व्यवस्थापन तसेच प्रशासनाचे आभार व्यक्त केले. आणि महाविद्यालयाने केव्हाही आवाज द्यावा, मी महाविद्यालयाच्या सेवेसाठी तयार असेल अशी ग्वाही दिली.

    प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना मा. रमण भाऊ भोळे यांनी प्रा डॉ दयाघन राणे करीत असलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. व्यसन ही अत्यंत भयंकर अशी समस्या असून त्या साठी आपल्या महाविद्यालयातून सामाजिक जागृती साठी प्रयत्न होत आहेत ही एक महत्वाची बाब आहे. या सोबतच प्रा राणे यांनी सेवानिवृत्तीनंतर ही आपण महाविद्यालयाच्या सेवेसाठी तत्पर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आणि इतरांनीही असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.

    अध्यक्षस्थानावरून बोलत असताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी प्रा डॉ दयाघन राणे यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या विविध प्रकल्पाबद्दल माहिती दिली तसेच त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यामुळे महाविद्यालयाच्या विकासातले योगदान याबद्दल चर्चा केली. प्राचार्य म्हणून काम करीत असताना निर्माण होणारे प्रश्न आणि सहकाऱ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असताना महाविद्यालयातील वातावरण प्रगतीसाठी पोषक असते असे मत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ अनिल सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की डॉ दयाघन राणे आणि आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आम्हा दोघांना सारखेच संस्कार मिळाले म्हणून महाविद्यालयीन सेवा काळात आम्ही सोबतच काम करीत राहिलो.

    प्रा डॉ अनिल सावळे यांनी डॉ दयाघन राणे यांच्याबद्दलच्या काही आठवणी या वेळी सादर केल्या. कार्यालयीन कर्मचारी श्री प्रकाश सावळे यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की प्रा डॉ दयाघन राणे हे भौतिक शास्त्र विषय शिकवत असताना सतत काही न काही प्रयोग करीत असत. त्यांच्या प्रयोगशाळेत आल्यावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत असत. आम्हाला त्यातील बऱ्याच गोष्टी कळत नसत, पण राणे सरांशी चर्चा केल्यावर ते अत्यंत सोप्या भाषेत त्या सांगत असत. भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असले तरी अनेक विषयांचा त्यांना अभ्यास होता तसेच प्रत्येकाला ते अत्यंत आत्मियतेने मदत करत असत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा डॉ माधुरी पाटील यांनी केले तर प्रा डॉ जयश्री सरोदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ दयाघन राणे यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते

  • आपला पृथ्वीवरील खरा मित्र निसर्गमित्राचे रक्षण करूया पर्यावरणाच समतोल राखत पृथ्वीच संरक्षण करूया:- डॉक्टर सुरेंद्रसिंग पाटील

    आपला पृथ्वीवरील खरा मित्र निसर्गमित्राचे रक्षण करूया पर्यावरणाच समतोल राखत पृथ्वीच संरक्षण करूया:- डॉक्टर सुरेंद्रसिंग पाटील

    पृथ्वीजवळ पर्यावरणाचा समतोल राखत निसर्गनिर्मित सजीव सृष्टीसाठी आवश्यक ते पुरेस आहे मानवाने आपल्या कर्तव्यापोटी सर्व गोष्टीचे संरक्षण केले पाहिजे परंतु मानवाच्या लालसा /लालचेपोटी त्यांचे लाड पुरवण्यासाठी अतिरिक्त पृथ्वी जवळ काहीही नाही .

    तरीसुद्धा निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान करणे सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून.आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे आपला पृथ्वीवर खरा मित्र निसर्ग आहे निसर्ग आहे तर आपण आहोत .

    आज मैत्री दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या निसर्ग मित्रास त्रास देऊन विश्वासघात करणार नाही .आजपर्यंत मित्रास मैत्रीत विश्वासघात करून धोका देत ओरबाडण्याचा काम करत आलो . त्यामुळे आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे .आज मैत्री दिनाच्या निमित्ताने संकल्प करून आपल्या मित्रास आश्वासन देऊया आता मैत्रीत दगा करणार नाही .खऱ्या मित्रास दगा दिल्यास काय होते याचे फळ आज रोजी आपण सर्वजण भोगत आहोत डॉ .सुरेंद्र सिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान झालेल्या नुकसानीची परिपूर्ण भरपाई होऊ शकत नसली तरी जे जे शक्य असेल ते करेल .

    सर्व सजीवांना लागणारी फळ फुल ऑक्सिजन युक्त विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संवर्धन संगोपन करेल .प्लास्टिकचा वापर करणार नाही .शक्य असेल तेथे सार्वजनिक वाहनांचा वापर करेल ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीवर कंट्रोल करेल तसेच करण्यास सांगेल पाण्याचा गैरवापर न करता आवश्यक तितकाच वापरेल असे ज्या ज्या गोष्टी पर्यावरणास घातक असतील त्यांचा त्याग करून दुसऱ्यांनाही करण्यास सांगेल आज मैत्री दिनाच्या निमित्ताने संकल्प करू या व आपला खरा मित्र निसर्गमित्राचे संरक्षण करून पर्यावरण समतोल राखत पृथ्वीच्या अस्तित्व अबाधित ठेवूया .

  • भुसावळ भाजपाची शहर कार्यकारणी जाहीर : नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

    भुसावळ भाजपाची शहर कार्यकारणी जाहीर : नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

    भाजपाच्या संघटन पर्वाअंतर्गत भुसावळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात शहर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. स्टार लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

    सदरील कार्यकारणीत दोन सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, सात सचिव व एक कोषाध्यक्ष अशी एकूण 18 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

    या शहर कार्यकारणीत सामाजिक गणितांचा विचार करून समतोल राखण्याचा प्रयत्न करण्या सोबतच महिलांनाही संधी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

    कार्यकारणी पुढील प्रमाणे

    शहराध्यक्ष – संदीप पंडितराव सुरवाडे

    सरचिटणीस– पवन बुंदेले, सागर चौधरी

    उपाध्यक्ष– प्रीतमा गिरीश महाजन, वैशाली ललित मराठे, विशाल जंगले, मीना लोणारी, श्रेयस इंगळे, ॲड अभिजीत मेने, नितीन नाटकर

    सचिव– प्रीती मुकेश पाटील, सुजित हेमराज भोळे, चेतन जैन, किरण सरोदे, रवींद्र खरात, प्रा सीमा धीरज पाटील, लखन रणधीर

    कोषाध्यक्ष– सागर साळी

    महिला मोर्चा अध्यक्षा -वैशाली सैतवाल

    युवा मोर्चा अध्यक्ष –संकल्प वाणी

    अनुसूचित जाती अध्यक्ष -संतोष ठोकळ

    व्यापारी आघाडी अध्यक्ष – रिषभसिंह राजपूत

    ज्येष्ठ कार्यकर्ता अध्यक्ष– शंकर शेळके

    अल्पसंख्यांक अध्यक्ष -रेहमान शेख बाबू

    शिक्षक आघाडी अध्यक्ष -तुषार चिंधळे

    प्रसिद्धी प्रमुख -गोकुळ बाविस्कर

    या कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत पक्ष संघटनेची मजबुती ही स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांवर अवलंबून असते, असे मत व्यक्त केले.

  • तळवेल गावाचे नाव तीर्थराज पाटील ने अंतराष्ट्रिय स्थरावर पोहचवले – मुख्याध्यापक‌ एस एस अहिरे

    तळवेल गावाचे नाव तीर्थराज पाटील ने अंतराष्ट्रिय स्थरावर पोहचवले – मुख्याध्यापक‌ एस एस अहिरे

    १ ऑगस्ट रोजी नेहरू विद्यामंदिर तळवेल येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर ७ व्या अंतराष्ट्रीय रोलर रिले चैम्पियनशिप थायलंड या अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष गटामध्ये भुसावळ व मुळ रहिवासी तळवेल येथिल तीर्थराज मंगेश पाटील विद्यार्थ्याने दोन सुवर्णपदक मिळविले व रिले मॅच मध्ये तिन रजत पदक मिळवून विजयी झाल्याबद्दल नेहरु विद्या मंदिर तळवेल च्या माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्था चेअरमन श्री ज्ञानदेव हरी झोपे यांच्या हस्ते चि तिर्थराज पाटील चा सत्कार करण्यात आला

    तिर्थराज हा एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ चा इयत्ता २री चा विद्यार्थी आहे नेहरू विद्यामंदिर तळवेल चे मुख्याध्यापक एस एस अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्था सचिव बी टी इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी यासाठी संस्था सदैव आपल्या सोबत आहे व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा क्षेत्रात सदैव मदतीसाठी तत्पर राहील असे मार्गदर्शन केले

    कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव हरी झोपे संस्था सचिव बी टी इंगळे सह सचिव अविनाश पाटील नेहरू विद्यामंदिर मुख्याध्यापक‌ एस एस अहिरे तिर्थराज मंगेश पाटीलमंगेश सुभाष पाटील रोहिणी मंगेश पाटील व इतर शिक्षक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि टी रोटे सर यांनी केले प्रास्ताविक श्री एस एस आहिरे सर मुख्याध्यापक‌ यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री एस सी पाटील सर यांनी केले

  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची  पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

    भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे एक ऑगस्ट रोजी अण्णासाहेब साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

    सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील व ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील,श्री अतुल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून अण्णासाहेब साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमे ला मार्ल्यापण करण्यात आले .

    यानंतर विद्यार्थिनींनी दोन्ही नेत्यांवरआपली मनोगत सांगितले त्यानंतर शाळेतील शिक्षक वत्सला वानखेडे , पल्लवी पाटील,अतुल जाधव, सौ आशा पाटील यांनीही विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले .

    शाळेचे मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी महत्त्व सांगितले .कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन सरोज कोष्टी,सौ योगिता पाटील यांनी केले .

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  • अहिल्यादेवी कन्या विद्यालयात श्रावणी शुक्रवार साजरा

    अहिल्यादेवी कन्या विद्यालयात श्रावणी शुक्रवार साजरा

    भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात आज श्रावणी शुक्रवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले

    त्यानंतर श्रावण शुक्रवार चे महत्व सांगून श्रावण महिना हा विविध सण उत्सव यांनी कसा भरलेला आहे त्यासोबतच हा महिना सामाजिक धार्मिक वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे या निमित्तानेशाळेत श्रावणी शुक्रवार साजरा करण्यात येतो अशी माहिती दिली.

    विद्यार्थिनीच्या मार्फत शुक्रवारची कहाणी सांगितली जाते यावेळी सकाळ सत्रात अवनी देवळा तर दुपार विभागात समीक्षा खनके हिने श्रावण शुक्रवारची कथा सांगितली .त्यानंतर गणपती व इतर देवींची आरती होऊन चणे फुटाण्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला .

    सूत्रसंचालन सौ सरोज कोष्टी आणि सौ योगिता पाटील यांनी केले..

    श्रावणी शुक्रावर निमित्त विद्यार्थिनी पारंपरिक वेषभूषा मध्ये विद्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

  • भाकरीसोबत हवीय झणझणीत चव? मग ही लसूण चटणी नक्की ट्राय करा!

    भाकरीसोबत हवीय झणझणीत चव? मग ही लसूण चटणी नक्की ट्राय करा!

    पावसाळ्यात गरम भाकरीसोबत किंवा वरणभाताबरोबर काहीतरी चटकदार हवं असतं ना?मग ही 🔥 भाजलेल्या लसणाची झणझणीत चटणी एकदा नक्की करून बघा – चव अशी की,हातचं थांबणार नाही! 😋घरच्या साध्या जेवणातही झणझणीत रंगत यावी अशी खास १० मिनिटात तयार होणारी झकास टिप तुमच्यासाठी! 👇

    🌶️ झणझणीत भाजलेल्या लसणाची चटणी (२-३ जणांसाठी)

    🔸 साहित्य: • लसूण पाकळ्या – १० ते १२ (सालासकट) • सुकं खोबरं – ¼ कप (हलकं खरपूस भाजून) • तिखट – १ टीस्पून (किंवा चवीनुसार) • मीठ – चवीनुसार • जिरे – ½ टीस्पून • चिंच – ½ टीस्पून (ऐच्छिक) • थोडंसं तेल (भाजण्यासाठी)

    👨‍🍳 कृती:1️⃣ लसूण भाजा:एका कोरड्या कढईत थोडंसं तेल घालून लसूण सालीसकट मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.साले काढून फेकून द्या. लसूण आतून मऊसर आणि सुवासिक झाला पाहिजे.2️⃣ खोबरं आणि जिरे भाजा:त्याच कढईत सुकं खोबरं आणि जिरे थोडं भाजून थंड होऊ द्या.3️⃣ मिक्सिंग:मिक्सरमध्ये भाजलेला लसूण, खोबरं, जिरे, तिखट, मीठ आणि ऐच्छिक असल्यास चिंच घालून थोडंसं पाणी टाकून दरम्यानसर वाटून घ्या.4️⃣ चव चेक करा:आवडीनुसार थोडं मीठ किंवा तिखट वाढवू शकता. ही चटणी जरा दाटसर आणि ओलसर हवी!

    💡 खास टिप: • ही चटणी फ्रीजमध्ये ३ दिवस टिकते, पण खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी राहीलच असं नाही 😄 • वरण-भात, थालीपीठ, भाकरी, पोळी – कशासोबतही परफेक्ट लागते!🌟 एकदा ही चटणी ट्राय केली की, तोंडात पाणी सुटेल आणि हातचं थांबणार नाही – हे पक्कं! 🌶️🔥

  • परकियांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानू नका, आपली संस्कृती परंपरा संस्कार या अनुषंगाने जीवनात मार्गक्रमण करा…प्रा. अश्विनी टाव्हरे ,पुणे

    परकियांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानू नका, आपली संस्कृती परंपरा संस्कार या अनुषंगाने जीवनात मार्गक्रमण करा…प्रा. अश्विनी टाव्हरे ,पुणे

    एकविसाव्या शतकात मार्गक्रमण करत असताना बऱ्याचदा आम्ही मेंढराच्या कळपाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो इतरांचं अंधानुकरण करण्यात आपण धन्यता मानतो मग ते परकीयांचं खाद्य असो वस्त्र असो किंवा अन्य गोष्टी असो त्या आम्ही पटकन स्वीकारतो आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला जे शिकवलंय ते आम्ही विसरतो आमची संस्कृती आमचा संस्कार महान आहे त्यामुळे त्या अनुषंगाने मार्गक्रमण करा असा मोलाचा सल्ला प्राध्यापिका अश्विनी टाव्हरे यांनी विद्यार्थ्यांना दिला निमित्त होते द्वारकाई व्याख्यानमाला कार्यक्रमाचे

    जय गणेश फाउंडेशन द्वारे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प आज शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संपन्न झाले .

    या व्याख्यानमालेमध्ये आजच्या प्रथम पुष्पाच्या वक्त्या प्राध्यापिका अश्विनीताई टाव्हरे या पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याता, कीर्तनकार, संत साहित्याच्या निष्णात अभ्यासक सुमारे 150 पेक्षा जास्त वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या वक्त्या आहेत.. त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने विद्यार्थिनी समोर सुमारे तासभर कळी उमलताना आवश्यक संस्कार या विषयावर प्रबोधन केले एकविसाव्या शतकात वावरताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत या आव्हानांना यशस्वीपणे पेलण्यासाठी संस्काराची शिदोरी जवळ असणे अत्यंत आवश्यक असल्याचे बहुमोल मार्गदर्शन अश्विनीताईंनी केले.


    यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी , जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश भाऊ नेमाडे , विद्यमान अध्यक्ष श्री राजेंद्र यावलकर, श्री गणेश फेगडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उमेश भाऊ नेमाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सोनाली राणे यांनी आभार प्रदर्शन श्री राजेंद्र यावलकर यांनी तर सूत्रसंचालन सौ आशा पाटील यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.