Blog

  • भोळे महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

    भोळे महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात ‘सामाजिक गुलामगिरीचा’अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलानी ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ पहाट या देशाच्या दारी आली, ज्यांनी स्वातंत्र्य, समता, सत्यशोधन, लोकशाही अशा अनेक मुल्यांची रुजवण केली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे पुरोगामी विचारांचे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! करण्यात आले त्याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर पी फालक यांनी माल्यार्पण पण केले यांनी विद्यार्थ्याना यांच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे तसेच त्यांच्या जीवनकार्याचे सविस्तर वर्णन विद्यार्थ्यांसमोर मांडले.सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनातर्फे करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. संगीता धर्माधिकारी प्रा. डॉ. जयश्री सरोदे शिक्षकेतर कर्मचारी श्री मिलिंद नेवाळे श्री राजेश पाटील श्री प्रमोद नारखेडे श्री किरण पाटील श्री प्रकाश चौधरी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय धर्मा चौधरी यांनी कळविले आहे.

    जाहिरात 👇

  • पिंपळगावच्या मनीषा पाटील यांना ‘शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण पुरस्कार’

    पिंपळगावच्या मनीषा पाटील यांना ‘शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण पुरस्कार’

    पिंपळगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मनीषा पाटील यांना शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा गौरव स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि स्वराज्य शूरवीर जिवाजी महाले सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय फॅशन व सांस्कृतिक स्पर्धा समारंभात प्रदान करण्यात आला. पुण्यातील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात गिरीश राजूरकर आणि गणेश वांजुळकर यांनी संयोजन केले होते.या प्रसंगी राज्याचे नेते लक्ष्मण हाके, आमदार उमाताई खापरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अभिनेते सुनील गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.मनीषा पाटील यांच्या या यशाबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन, संतोष माळी, दुर्गेश बेदरकर आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

    जाहिरात 👇

  • शिशिर जावळे यांना तेजो रत्न 2025 पुरस्कार जाहीर

    शिशिर जावळे यांना तेजो रत्न 2025 पुरस्कार जाहीर

    भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांना तेजोदीप नव विचार फाउंडेशन नाशिक तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तेजवरत्न 2025 पुरस्कार जाहीर झाला आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, तेजोदीप नवविचार फाउंडेशन नाशिक ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून दरवर्षी या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ना तेजोरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यामुळे यंदाचा सामाजिक क्षेत्रातील तेजोरत्न पुरस्कार 2025 भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांना जाहीर झालेला आहे. शिशिर जावळे गेल्या 22 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिशीर जावळे हे वयाच्या चौदाव्या वर्षापासून समाज कार्य करत असून, समाजातील प्रत्येक घटकांशी जोडलेले आहेत. ते समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे असतात. गोरगरीब जनतेची सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी समस्या, आरोग्य सेवा यात नेहमीच त्यांचा अग्रक्रम असतो. तसेच त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कळस गाठला असून ते भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून तळागाळात काम करत आहेत. कुठलीही समस्या मांडताना न कचरता, आंदोलन असो किंवा मोर्चे असोत , कुठल्याही बातम्या असोत, अन्यायाविरोधी लढा असो, प्रत्येक कामात सक्रिय कार्यकर्ता म्हणून पुढे असतात. शिशीर जावळे हे समाजातील प्रत्येक घटकांशी जोडलेले आहेत. ते समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे असतात. गोरगरीब जनतेची सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी समस्या, आरोग्य सेवा यात नेहमीच त्यांचा अग्रक्रम असतो. तसेच त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कळस गाठला आहे.कुठलीही समस्या मांडताना न कचरता, आंदोलन असो किंवा मोर्चे असोत , कुठल्याही बातम्या असोत, अन्यायाविरोधी लढा असो, प्रत्येक कामात सक्रिय कार्यकर्ता म्हणून पुढे असतात. गोरगरिबांना सर्वांनाच शासनाच्या विविध योजनांची माहिती पुरवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच कौशल विकास अभियानांतर्गत त्यांनी विविध उपक्रम राबविले आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात.विद्यार्थ्यांना बेरोजगारांना विविध शासकीय परीक्षांचे योजनांचे मोफत मार्गदर्शन करून त्यांना मोफत फॉर्म भरून देण्याचे सुद्धा ते कार्य करतात. तसेच ओबीसींच्या सर्वांगीण कल्याणासाठी ते सातत्याने शासन दरबारी लढा देत आहे .ओबीसी समाजाचा आणि लेवा समाजाच एक युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. लेवा समाज आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे त्यात सुद्धा त्यांचं फार मोठे योगदान आहे.

    लेवा समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी सुद्धा त्यांनी लेवाहितवादी चळवळ सुरू केलेली आहे. शासन दरबारी विविध सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने ते पाठपुरावा करून ते कार्य तडीस नेतात.

    सध्या ते १) प्रदेश सचिव भा.ज.पा ओ.बी.सी मोर्चा, (म.रा.)

    २) संचालक सदस्य-वै.ह.भ.प.संतवै.ह.भ.प.संत तोताराम महाराज नवचैतन्य समाज मंडळ. जळगाव

    ३)महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्कप्रमुख –लेवा उत्थान फाउंडेशन ४) संस्थापक अध्यक्ष — साई निर्मल फाउंडेशन भुसावळ जिल्हा जळगाव

    ५) मा.जिल्हा संपर्क प्रमुख — हिंदु जागरण मंच भुसावळ जिल्हा

    ६) सदस्य स्वावलंबी भारत अभियान भुसावळ जिल्हा

    ७) मा.सदस्य — जिल्हा पुरवठा दक्षता समिती सदस्य

    ८) लेवा हितवादी चळवळ प्रणेते. यासह अनेक सामाजिक संघटना आणि संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी नाशिक येथे.

    तेजोदीप नव विचार फाउंडेशन तर्फे मान्यवरांच्या हस्ते तेजोरत्न पुरस्कार 2025हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

    जाहिरात 👇

  • श्रीरामजी नवमीला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसेंची गोमाता सेवा केंद्राला भेट गोरक्षकांमध्ये आनंदोत्सव

    श्रीरामजी नवमीला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसेंची गोमाता सेवा केंद्राला भेट गोरक्षकांमध्ये आनंदोत्सव

    रामनवमीच्या शुभमुहूर्तावर केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जामनेर रोड , भुसावळ येथील श्रीसाईबाबा मंदिरात आयोजित पालखी सोहळ्यात सहभाग घेत प्रभु श्रीरामजींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरासमोरील गोसेवा केंद्राला भेट दिली.

    या गोसेवा केंद्रात कत्तलीपासून वाचवलेल्या व जखमी गोमातांची व इतर मुक्या जीवांची उत्कृष्ट सेवा होत असल्याचे पाहून ताईंनी समाधान व्यक्त केले. गोभक्त श्री मुन्नाभाऊ बेहऱांनी माहिती दिली की हे कार्य पूर्णपणे निस्वार्थ भावनेने सुरू आहे.

    गोभक्त योगेश पाटील यांनी जखमी गोमातेच्या उपचारासाठी खासगी जागा दिली आहे. ताईंनी सांगितले की, भविष्यात या पवित्र कार्यासाठी संस्था स्थापन करून मुक्या जीवांसाठी एक अद्ययावत दवाखाना उघडण्याचे स्वप्न साकार करावे.

    या वेळी साईसेवक पिंटुभाऊ कोठारी, विनोदभाऊ चोरडिया, हर्षल सपकाळे, अनिरुद्ध कुलकर्णी, रोहित महाले आणि अनेक गोसेवक उपस्थित होते.

    रक्षाताईंनी केंद्राच्या व्यवस्थापक श्री रोहित महालेंना विचारले की, ही संस्था अधिकृत आहे का. यावर त्यांनी आर्थिक मर्यादेमुळे संस्था नाही असे सांगितले. तरीदेखील, तीन वर्षांपासून पादत्राणे न घालता गोरक्षणासाठी झटत आहेत, हे ऐकून ताईंनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

    जाहिरात👇

  • भुसावळ शहरातील भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा- आयोजक हिंदू घोष गृप भुसावळ

    भुसावळ शहरातील भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा- आयोजक हिंदू घोष गृप भुसावळ

    खडका रोडवरील जागृत हनुमान मंदिर, हिंदू घोष ग्रुप आणि पाटील मळा व परिसरातील भाविकांच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव २०२५ चे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. ११ आणि १२ एप्रिल रोजी हा उत्सव शहरात पारंपरिक श्रद्धा, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्य याचे दर्शन घडवणार आहे. हा उत्सव केवळ धार्मिक न राहता संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा, प्रेरणा देणारा आणि सद्भावनेचा संदेश देणारा आहे.

    कार्यक्रमाची सुसज्ज आखणी

    खडका रोडवरील जागृत हनुमान मंदिर, हिंदू घोष ग्रुप, पाटील मळा, भुसावळ यांच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे भुसावळ शहरातील सर्वांत भव्य दिव्य श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीचा सोहळा ११ आणि १२ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला आहे. आयोजकांनी सर्व हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

    कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:

    ११ एप्रिल, शुक्रवार सायंकाळी ७ वाजता भजन संध्या

    १२ एप्रिल, शनिवार सकाळी ५ वाजता महापूजा

    सकाळी ७ वाजता संगीतमय सुंदरकांड पारायण

    ११ वाजता महाआरती आणि

    ११.३० पासून महाप्रसाद तसेच याच दिवशी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा व मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून, हा सोहळा शहरवासीयांसाठी आध्यात्मिक आणि एकात्मतेचा उत्सव ठरणार आहे.

    कार्यक्रमाचे ठिकाण:जागृत हनुमान मंदिर, खडका रोड, पाटील मळा, भुसावळ

    हिंदू समाजासाठी एकत्रतेचा संदेश

    या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाज एकत्र येऊन धर्म, संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडवतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग असून, अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर अतिथी व श्रद्धावान भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

    आयोजकांचे भाविकांना आवाहन:

    सर्व भक्तगणांनी या पवित्र सोहळ्यात आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून, हनुमान जन्मोत्सव साजरा करावा व हनुमंताचा आशीर्वाद घ्यावा.

    जाहिरात 👇

  • भगवान परशुराम जन्मोत्सव २०२५: भुसावळमध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

    भगवान परशुराम जन्मोत्सव २०२५: भुसावळमध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

    भुसावळ शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव २०२५ निमित्ताने समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने चार दिवसांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला चालना देणाऱ्या या उत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

    २७ एप्रिल २०२५ रोजी उत्सवाची सुरुवात रक्तदान शिबिराने होणार आहे. सकाळी ९ वाजता ब्राह्मण संघ, न्यु एरिया वार्ड येथे हे शिबिर पार पडणार असून, आरोग्य विषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता श्री साईबाबा मंदिर, जामनेर रोड येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून, परशुराम जयंतीचा संदेश संपूर्ण शहरात पोहचवण्यात येईल.

    २८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता बियानी पब्लिक स्कूल प्रोफेसर कॉलनी येथे “शंभूगाथा” या विषयावर श्री. अभिजीत मुंडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर आधारित हे व्याख्यान तरुण पिढीला इतिहासाची जाण करून देणारे ठरेल.२९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री अष्टभुजा माता मंदिर ते श्रीराम मंदिर, म्युनिसीपल पार्क या मार्गावरून भव्य दिव्य शोभायात्रा पार पडणार आहे. या शोभायात्रेत डोल, लेझीम, पालखी आणि विविध पारंपरिक देखावे सहभागी होणार आहेत.शोभायात्रेनंतर रात्री ८ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या संपूर्ण उत्सवाचे आयोजन परशुराम जन्मोत्सव समिती २०२५ व समस्त ब्राह्मण समाज, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    जाहिरात 👇

  • हनुमान जन्मोत्सव निमित्त सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

    हनुमान जन्मोत्सव निमित्त सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

    हनुमान जन्मोत्सव हा दिवस प्रभू श्रीरामाचे परमभक्त व शक्ती, भक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक भगवान हनुमान यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा, भजन, कीर्तन आणि सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले जाते.

    याच पार्श्वभूमीवर, हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक भव्य संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले आहे. हे आयोजन 12 एप्रिल 2025 रोजी, सायं. 7.30 वाजता, संतोषीमाता बहुउद्देशीय हॉल शेजारील क्रिडांगणावर होणार आहे.

    या संगीतमय कार्यक्रमात भक्तीमय वातावरणात सामूहिकरित्या हनुमान चालीसा पठण होणार असून, श्रद्धेने आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा हा क्षण सहभागींसाठी निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे.

    या कार्यक्रमाचे आयोजन विश्वहिंदु परिषद, क्रीडा भारती, जय मातृभूमी क्रिडा मंडळ, आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, श्रीराम व हनुमान भक्तांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    जाहिरात 👇

  • इस्कॉनच्या गीता स्पर्धेत भुसावळच्या विद्यार्थ्यांना यश ; विद्यार्थ्यांना सायकल व इस्रो भेटीचे बक्षिस

    इस्कॉनच्या गीता स्पर्धेत भुसावळच्या विद्यार्थ्यांना यश ; विद्यार्थ्यांना सायकल व इस्रो भेटीचे बक्षिस

    भुसावळ येथील चार विद्यार्थ्यांनी इस्कॉन आयोजित मूल्यांकन शिक्षण गीता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे त्यांची थेट ‘इस्रो’ भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २४ एप्रिल रोजी बंगळुरू येथील चांद्रयान मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.

    फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्हा व बुरहानपूर विभागातून घेण्यात आलेल्या या जागतिक गीता स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात वर्ल्ड स्कूल, भुसावळ येथील सातवीचा विद्यार्थी सानिध्य श्रीवास्तव याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याची बहीण शाम्भवी श्रीवास्तव हिनेही आठ ते दहा वयोगटात ९८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
    याशिवाय, सेंट अलायसीस शाळेचा पाचवीचा विद्यार्थी कृष्णा चौधरी आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची सातवीची इरा अग्रवाल यांनीही स्पर्धेत उत्तम यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना सायकल बक्षिस स्वरूपात मिळणार असून, ‘इस्रो’ भेटीदरम्यान त्यांना वैज्ञानिक सोमनाथ यांच्याकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे.

    कृष्णा व इरा हे इस्कॉनच्या ‘गोपाल फन स्कूल’चे नियमित विद्यार्थी असून, ही परीक्षा पुणे व भुसावळ येथे एकाच वेळी घेण्यात आली होती.
    या स्पर्धेत एकूण ९० विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये पारितोषिके पटकावली, काही विद्यार्थी भुसावळ,जळगाव,रावेर ,जामनेर येथील आहे त्यांचा सन्मान समारंभ १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कमल गणपती हॉल, भुसावळ येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत.

    भविष्यात अशा अनेक उपक्रमांची योजना असून, विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण रुजवण्याचे काम सुरू राहील, असे आयोजकांनी सांगितले इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष प्रभु रासयात्रादास यांनी सांगितले

  • पतंजली जेष्ठ नागरिक संघाचे मंत्री सावकारेंकडे निवेदन – आरोग्य व सार्वजनिक सुविधांवरील मागण्या अग्रक्रमावर

    पतंजली जेष्ठ नागरिक संघाचे मंत्री सावकारेंकडे निवेदन – आरोग्य व सार्वजनिक सुविधांवरील मागण्या अग्रक्रमावर

    भुसावळ, दि. ६ एप्रिल २०२५: पतंजली जेष्ठ नागरिक संघ, भुसावळ तर्फे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयभाऊ सावकारे यांच्याकडे विविध सार्वजनिक व आरोग्यविषयक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत

    महादेव मंदिरासमोरील जेष्ठ नागरिक सभागृहाचे विस्तारीकरण व सभामंडपाची मागणी

    भुसावळ येथील सर्वे क्रमांक २२२/१ व २२२/२ मधील ओपन जागेतील भिरूड कॉलनीतील महादेव मंदिरासमोरील जेष्ठ नागरिक सभागृहाचे पश्चिम दिशेने विस्तारीकरण करावे, तसेच संपूर्ण बांधकाम व मंदिरावरील सभामंडपाचे काम करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

    जेष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एनफ्ल्युएन्झा लसीकरणाची मागणी

    उच्चरक्तदाब व मधुमेहग्रस्त जेष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनामार्फत एनफ्ल्युएन्झा लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव यांना आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

    ट्रामा सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची मागणी

    भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर येथे सोनोग्राफी, टू डी इको, स्ट्रेस टेस्ट, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. आदी यंत्रसामुग्रीसाठी निधी मंजूर करून उपकरणे पुरविण्यात यावीत.

    ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक व रात्रपाळीसाठी व्यवस्था

    ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने नेमणूक करण्यात यावी, तसेच रात्रपाळीसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचर व वाहनचालकाची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.

    आरोग्य सल्लागार समितीत जेष्ठ नागरिक प्रतिनिधींची नेमणूक करावी

    भुसावळ ट्रामा सेंटरमधील आरोग्य सल्लागार समितीत जेष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.यावर मंत्री संजयजी सावकारे यांनी चांगला प्रतिसाद दिला असून ते या संदर्भात ठोस पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

    जाहिरात 👇

  • रक्तदान सेवेसाठी संजीवनी ग्रुपचे सागर विसपुते आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित

    रक्तदान सेवेसाठी संजीवनी ग्रुपचे सागर विसपुते आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित

    इटारसी, नर्मदापूरम: रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी संजीवनी ग्रुप (भुसावळ) तर्फे कार्यरत असलेले सागर विसपुते यांना ‘आंतरराष्ट्रीय रक्तवीर सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान मध्यप्रदेश रक्तदान सेवा ग्रुप, इटारसी यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खा. दर्शन सिंह चौधरी (नर्मदापूरम लोकसभा) आणि माननीय डॉ. सीतासरण शर्मा (माजी विधानसभा अध्यक्ष) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सागर विसपुते यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार संपूर्ण संजीवनी ग्रुप आणि त्यामधील सर्व रक्तदात्यांच्या सेवाभावाचे प्रतीक म्हणून समर्पित करण्यात आला. सागर विसपुते यांनी हा सन्मान स्वीकारत आपल्या कार्याचा आणि संजीवनी ग्रुपच्या तत्त्वांचा गौरव जागतिक स्तरावर पोहचवला.”हा पुरस्कार माझा नसून संजीवनी ग्रुपच्या प्रत्येक रक्तदात्याचा आहे,” असे भावनिक उद्गार सागर विसपुते यांनी यावेळी काढले. त्यांनी संपूर्ण ग्रुपकडून सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.संजीवनी ग्रुप हा अनेक वर्षांपासून रक्तदान, आरोग्य शिबिर आणि सामाजिक उपक्रमांत सक्रीय असून, त्यांच्या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे.

    भुसावळ, जळगावसह संजीवनी ब्लड ग्रुपने केलेल्या प्रेरणादायक कार्यामुळे अनेक इतर रक्तदाते समूहांनीही त्याच पद्धतीने कार्य सुरू केले आहे. या माध्यमातून अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत असून, हे कार्य एक सामाजिक चळवळ बनत चालले आहे. संजीवनीच्या सेवाभावाची ही प्रेरणा इतर गटांसाठी मार्गदर्शक ठरते आहे.

    जाहिरात 👇