Blog

  • ना.श्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ बस आगारात नव्या बसेसचा शुभारंभ

    ना.श्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ बस आगारात नव्या बसेसचा शुभारंभ

    भुसावळ येथील बस स्थानकावर नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर व प्रवाशांच्या सोयीसाठी शासनामार्फत भुसावळ आगाराला या नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या नवीन बससेवेमुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेळेत आणि आरामदायक होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा निर्माण होणार आहे.

    या प्रसंगी प्रांताधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तसेच अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

    जाहिरात 👇

  • भुसावळमध्ये बुद्धिष्ट सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संविधान भेट उपक्रमाअंतर्गत ३५ मान्यवरांचा सत्कार

    भुसावळमध्ये बुद्धिष्ट सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संविधान भेट उपक्रमाअंतर्गत ३५ मान्यवरांचा सत्कार

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवदत्त नगर,भुसावळ येथील बुद्धिष्ट सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सर्व समाजातील अनेक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भारतीय संविधान भेट देऊन सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज लोणारी,मा.नगरसेवक हे होतेप्रमुख उपस्थितीत बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ, प्रभागाचे मा.नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे भाजपचे अनुसुचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंतदादा तायडे यांचा सन्मान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष बी.वाय‌.सोनवणे सर यांनी प्रास्ताविक संबोधित केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केले.यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष भगवान बागुल,सचिव राजीव कापडणे तसेच सर्व सह पदाधिकारी सदस्य यांनी प्रयत्न केले.

    अध्यक्षीय भाषणात युवराज लोणारी यांनी “संविधान घराघरात पोहोचवण्याचा” उपक्रम म्हणजेच समाजप्रबोधनाचे शक्तिशाली माध्यम असल्याचे सांगून सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले, आणि एक चांगला उपक्रम संस्थेच्या माध्यमातून झाला याबद्दल त्यांचे कौतुक केले.

  • भोळे महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

    भोळे महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय येथे मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी, लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 134 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. आर पी फालक यांनी माल्यार्पण केले .सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनातर्फे करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.माधुरी पाटील प्रा. आर.डी भोळे प्रा.अनिल सावळे प्रा. संगीता धर्माधिकारी प्रा. अंजली पाटील प्रा जी पी वाघुळदे ,श्री प्रकाश सावळे प्रा. डॉ.अनिल सावळे प्रा. डॉ.संजय विठ्ठल बाविस्कर उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी यांनी कळविले आहे

  • उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल…..

    उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल…..

    आता उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीराला पाण्याची कमतरता जाणवणे, स्ट्रोक, खूप जास्त घाम येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांचा त्रास होतो. अशात भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे आणि नीट योग्य तो पोषक आहार घेणे गरजेचे आहे.इन हाउस आयुर्वेदिक सल्लागार डॉ. अश्विनी कोन्नूर यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.

    आहाराकडे लक्ष द्या...तु्म्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर दिसून येतो. उन्हाळ्यात पचायला हलक्या असणाऱ्या अन्नाचा आहारात समावेश करणे कधीही चांगले असते. उष्ण वातावरणात शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हलका पोषक आहार घ्यावा. उदा. दही, पांढरा भात, सॅल्मन मासा तुम्ही खाऊ शकता. आंबट व तिखट पदार्थ खाणे टाळा.*भरपूर फळे आणि भाजीपाला खा…

    *फळे आणि भाजीपाल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फोलिक अॅसिड व मिनरल्स असतात. हे घटक शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये चांगले फॅट्स असतात; जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. उदा.काकडी, बेरी, टरबूज,सायट्रिक अॅसिड समृद्ध फळे, अॅव्होकॅडो.

    *जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा…*उन्हाळ्यात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. द्रव पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरून काढतात आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात अल्कोहोल घेणे टाळले पाहिजे. त्याऐवजी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, ग्रीन टी हे द्रव पदार्थ सहज उपलब्ध असतात आणि त्याचे अनेक फायदेही दिसून येतात.

    *व्यायामामध्ये बदल करा…*उन्हाळ्यात शरीरावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्या आणि त्यानुसार व्यायामप्रकार निवडा. खूप जास्त तास व्यायाम करणे आणि खूप जास्त धावणे टाळा. त्याऐवजी प्राणायाम करा.

    *शीतली प्राणायाम…* या प्राणायामामध्ये तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

    *सदांता प्राणायाम…* या प्राणायामामध्ये दातांद्वारे हवा आत घेऊन नाकावाटे बाहेर सोडली जाते.त्याशिवाय तुम्ही वृक्षासन, अर्धकटी चक्रासन, कोनासन, त्रिकोणासन, मार्जारासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, चक्रासन, नवासन, योग निद्रा इत्यादी आसन प्रकार तुम्ही करू शकता.

    *जीवनशैलीमध्ये बदल करा…*उन्हाळ्यात रात्र लहान असते. त्यामुळे दिवसा तुम्ही थोडा आराम करू शकता. त्याशिवाय फिकट रंगाचे सुती कपडे, चंदन, फुलांपासून बनविलेले अत्तर यांचा वापर करा. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान ५० एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरा. जर कडाक्याचे ऊन असेल तर सनकोट, तसेच छत्री वा टोपीचा वापर करा.

  • ACIDITY झाली असताना काय खावे आणि काय खाऊ नये?

    ACIDITY झाली असताना काय खावे आणि काय खाऊ नये?

    हे खावे :-

    ✅ फळे: केळी, सफरचंद, पपई, कलिंगड

    ✅ भाज्या: कोबी, गाजर, बीट, दुधी भोपळा

    ✅ दही आणि ताक: यामुळे पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.

    ✅ ओट्स आणि साबुदाणा: हलके आणि पचायला सोपे असतात.

    ✅ नारळपाणी: शरीरातील अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.✅ जिरे पाणी किंवा सौंफ पाणी: पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी करते.✅ हळद आणि आले: यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.✅ तुळशीची पाने किंवा आलं: अॅसिडिटीमुळे होणाऱ्या गॅस आणि जळजळीवर उपयोगी.

    हे खाऊ नये :-

    ❌ तिखट आणि मसालेदार पदार्थ: मिरची, गरम मसाले यामुळे अॅसिडिटी वाढते.

    ❌ तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ: पचनावर ताण येतो.

    ❌ कॅफिन आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स: चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स यामुळे अॅसिडिटी वाढू शकते.

    ❌ चॉकलेट आणि मिठाई: यामध्ये साखर आणि प्रक्रिया केलेले घटक असतात.

    ❌ साइट्रस फळे: संत्री, मोसंबी, लिंबू यामुळे जळजळ होऊ शकते.

    ❌ फास्ट फूड आणि जंक फूड: हे पचायला जड असते आणि अॅसिडिटी वाढवते.

    ❌ जास्त प्रमाणात कांदा आणि लसूण:

    काही लोकांना हे पदार्थ अॅसिडिटी वाढवू शकतात.

    ➤ उपाय :— जेवणाच्या 30 मिनिटांनंतर कोमट पाणी प्यावे.— लवंग किंवा तुळशीची पाने चघळावीत.— झोपताना उशी जरा उंच ठेवावी, जेणेकरून अॅसिडिटी वर येणार नाही.— नियमितपणे योग आणि प्राणायाम करावे.

  • कुछ जानने योग्य बातें हेल्थ टिप्स

    कुछ जानने योग्य बातें हेल्थ टिप्स

    (१) किसी भी रोग की शुरूआत में उपवास, मूँग का पानी, मूंग, परमल, भूने हुए चने, चावल की राब आदि लेना लाभकारक है।दवा लेने की यदि विधि न बताई गई हो तो वह दवा केवल पानी या शहद के साथ लें।

    (२) भूखे पेट ली गई आयुर्वेदिक काष्ठ औषधि अधिक लाभदायक होती है। खाली पेट दोपहर एवं रात्रि को भोजन से पूर्व दवा लें किन्तु जहाँ स्पष्ट बताया गया हो वहाँ उसी प्रकार दवा लेने की सावधानी रखें ।

    (३) सामान्य रूप से दवा चार घण्टे के अंतर से दिन में तीन बार ली जाती है।

    (४) विविध दवाओं की मात्रा जब न बताई गई हो वहाँउन्हें समान मात्रा में लें।

    (५) दवा के प्रमाण में जब अनिश्चितता हो, शंका उठे तब प्रारंभ में थोड़ी ही मात्रा में दवा देना शुरू करें। फिर पचने पर धीरे-धीरे बढ़ाते जायें या अनुभवी वैद्य की सलाह लें।

    (६) वच, अतिविष, कुचला, जायफल, अरीठे जैसी उग्र दवाओं को सावधानीपूर्वक एवं कम मात्रा में ही दें।

    (७) हरड़े खाना तो बहुत हितकारी है। भोजन के पश्चात् सुपारी की तरह तथा रात्रि को हरड़े अवश्य लेनी चाहिए। इसे धात्री अर्थात् दूसरी माता भी कहा गया है। लेकिन थके हुए, कमजोर, प्यासे, उपवासवाले व्यक्तियों एवं गर्भवती स्त्रियों को हरड़े नहीं खानी चाहिए ।

    (८) आँवले का सेवन अत्यंत हितावह है। अतः भोजन के प्रारंभ, मध्य एवं अंत में नित्य सेवन करें ।

    (९) प्रकृति के अनुकूल प्रयोग करें। भोजन के एक घण्टे बाद जल पीना आरोग्यता की दृष्टि से हितकर है।

    (१०) दोपहर के भोजन के पश्चात् सौ कदम चलकर १० मिनट वामकुक्षि (बाँयीं करवट लेटना) करना स्वास्थ्य के लिए लाभदायक है।

    (११) दाँयें स्वर में भोजन एवं बाँयें स्वर में पेय पदार्थ लेना स्वास्थ्य के लिए हितकर है।

    (१२) भोजन एवं सब्जी के साथ फलों का रस कभी न लें। दोनों के बीच दो घण्टे का अंतर अवश्य होना चाहिए।

    (१३) दूध के साथ कोई भी फल न लें ।

    (१४) फलों का रस दिन के समय ही लें। रात्रि को फलो का रस पीना हितकर नहीं पिना चाहिए

    जाहिरात 👇

  • सेवेचा व भक्तीचा संगम – महारक्तदान शिबिरात भुसावळकरांचा सहभाग

    सेवेचा व भक्तीचा संगम – महारक्तदान शिबिरात भुसावळकरांचा सहभाग

    अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि अनिरुद्ध आदेश पृथक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर एकूण १३४ ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सद्गुगुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भुसावळ येथील उपासना केंद्रा मार्फत अशाच प्रकारचे शिबीर ब्राह्मण संघ येथे आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये एकूण ८० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यापैकी 60 जणांनी उत्साहाने रक्तदान केले. भक्ती आणि सेवेला जोडणारा हा उपक्रम दरवर्षी भुसावळमध्ये राबवला जात असून स्थानिक नागरिकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

    जाहिरात 👇

  • स्वरांच्या मैफलीस सज्ज भुसावळ- स्पर्धकांकडून जोरदार तयारी. भोरगाव लेवा पंचायत तर्फे आयोजन

    स्वरांच्या मैफलीस सज्ज भुसावळ- स्पर्धकांकडून जोरदार तयारी. भोरगाव लेवा पंचायत तर्फे आयोजन

    भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ महिला मंडळाच्या वतीने लेवा पाटीदार समाजातील हौशी गायकांसाठी ‘करा ओके’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आज रविवार, दि. १३ एप्रिल रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत प्रभाकर हॉल, भुसावळ येथे होणार आहे.करा ओके’ स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धक दिवस-रात्र तयारी करत आहेत. अनेकांनी पारंपरिक गाणी, तर काहींनी बॉलिवूड गाणी सादर करण्याचे ठरवले आहे.प्रत्येक वयोगटात स्पर्धा चुरशीची होणार असून प्रेक्षकांसाठी संगीतमय पर्वणी ठरणार आहे.लेवा पाटीदार समाजातील मुले, मुली, महिला व पुरुष या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. आयोजकांनी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

  • पित्ताचा त्रास? या घरगुती उपायांनी मिळवा त्वरित आराम!”

    पित्ताचा त्रास? या घरगुती उपायांनी मिळवा त्वरित आराम!”

    पित्ताचा त्रास,आंबट ढेकर या उपायाने कमी करा._* उत्तम पचनासाठी पित्ताची लेव्हल योग्य असणे गरजेचे असते. पण जर पित्त वाढले तर मात्र तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो. पित्त हे लिव्हर मध्ये तयार होते आणि पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होते. येथून अन्नाच्या पचनासाठी छोट्या आतड्यांमध्ये ते सोडले जाते. आयुर्वेदामध्ये पित्त पचनशक्ती किंवा अग्नी या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांना आठवड्यातून एकदा तरी उलट्या होतात. प्रत्येक आठवड्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. अगदी वैताग येतो. विविध औषधे केली तरी तात्पुरता आराम मिळतो आणि मग पुन्हा जैसे थे. पित्ताचा त्रास त्यांना होतो ज्यांच्या शरीरात उष्णता फार जास्त असते. उष्णतेमुळे पित्तामध्ये वाढ होते आणि मग ते पित्त उलटून पडते. जर ते बाहेर निघाले नाही तर, मग डोके प्रचंड दुखायला लागते. पित्त शांत होईपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो. काही घरगुती उपायांनी पित्त शांत करता येते.

    ◼️आम्ल पित्त :-_काहीही खाल्यावर जळजळणे किंवा आंबट ढेकर येणे. तसेच छातीत सारखे दुखणे आणि श्वास घेताना त्रास होणे ही हायपर अॅसिडीटीची लक्षणे आहेत. त्याला आयुर्वेदामध्ये आम्ल पित्त असे म्हटले जाते. असा त्रास सारखा झाल्याने मग उलट्या होतात.

    या आम्ल पित्ताच्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय करा.

    🫸शरीरात खूप उष्णता असेल तर तुम्ही तांदळाचे वा भाताचे पाणी प्य्याला हवे.यामुळे शरीरात थंडावा वाढतो. जर तुम्हाला पित्ताची लक्षणे दिसत असतील आणि तुमच्या शरीरात खूप जास्त उष्णता झाल्याचे तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही नियमितपणे तांदळाचे पाणी प्यायला हवे.

    🫸रोज रात्री झोपण्याआधी चमचाभर धने पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे. धने पित्तशामक असतात.

    🫸 जेवणानंतर बडीशेप खा. बडीशेप पचनासाठी फार चांगली असते. तसेच पोटाला थंडावा देते. बडीशेप आणि खडीसाखर खाल्याने पित्तावर नियंत्रण ठेवता येते. जेवणानंतर हे मिश्रण खात जा. किंवा एक कप पाण्यात काही बडीशेप घेऊन ती उकळवा आणि त्याचा काढा प्या. बडीशेपमध्ये तेल असते जे पचनाला मदत करते

    🫸आम्ल पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मस्त उपाय म्हणजे गुलकंद खाणे. गुलकंद थंड असतो. गुलकंद हा पित्तशामकही असतो. चमचाभर गुलकंदही पुरेसा आहे.

    🫸नारळ पाणी पिणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. तसेच लिंबू पाणीही पिऊ शकता

  • रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा हनुमान चालीसा पठण, हवन,सुंदर कांड यांचे नियोजन

    रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा हनुमान चालीसा पठण, हवन,सुंदर कांड यांचे नियोजन

    वरणगाव- ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित रेवा कुटी वरणगाव याठिकाणी वासुदेव परिवार तर्फे विविध उपक्रमांनी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 3 वाजता गणेश आराधना,प्रभु श्री राम स्तुती नंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे पठण सोबत हवन करण्यात आले.यावेळी प्रत्येकी 11 असे हनुमान चालीसाचे एकूण 506 सामूहिक संगीतमय पाठ करण्यात आले.महाराज रामनानंदजी जयस्वाल यांच्या समूहाद्वारे “सुंदरकांड पाठ’ करण्यात आला. त्यांच्या सोबत संगीतकार आनंद कुमार,राजेश धुर्वे, कुणाल शिंदे,बुधाजी महाराज उपस्थित होते.,यावेळी तुकाराम पाटील,वैशाली पाटील,पियुष महाजन, डॉ. अनिल शिंदे,डॉ. रवींद्र माळी,विवेक पाटील,सुलोचना पाटील,डॉ. रेणुका पाटील, गजानन नाथजोगी, कपिल राणे, प्रीती महाजन, रुपाली महाजन,दीपक फेगडे, मनोज गोसावी,उमेश माळी,पार्थ महाजन, कमलेश येवले,कुणाल शिंदे,डॉ. विशाखा बेंडाळे ,ज्ञानेश्वर पाटील,चंद्रकांत बढे, दिनकर पाटील,प्रकाश पाटील, रामा शेटे,रत्ना पाटील,सुनीता चौधरी,माधुरी फेगडे,चैताली फेगडे,किशोर मिश्रा,मीना मिश्रा,उषा राणे,चेतन झोपे,आकाश भंगाळे,सारंग जोशी,संजय महाजनआदी आदी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते.शेवटी प्रसाद भोजन झाल्यावर आभार प्रदर्शन दीपक फेगडे यांनी मानले.

    राम सेतू दगडाचे विशेष आकर्षण… दिपक फेगडे

    हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत आलेल्या भाविकांसाठी प्रभु श्री राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राम सेतू दगड दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.7 हजार वर्षापूर्वी घडलेल्या रामायणातील राम सेतू दगड अजूनही पाण्यात तरंगत असून भाविकांसाठी हा हनुमान जन्मोत्सव कायम स्मरणात राहणार आहे.दिपक फेगडे,सदस्य, वासुदेव परिवार,वरणगाव

    भाविकांचा वाढता उत्साह संजीवनीसारखा:- पियुष महाजन

    दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुरू केलेले संगीतमय हनुमान चालीसा पठणासाठी भाविकांची संख्या वाढत असून,आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.भाविकांचा वाढता उत्साह आम्हाला संजीवनी सारखा आहे.आगामी काळात व्यापक नियोजन करू.पियुष महाजन,सदस्य, वासुदेव परिवार,वरणगाव