Blog

  • भुसावळ विभागात महिला सुरक्षेसाठी RPF ची विशेष मोहिम — एकाच दिवशी 103 जणांवर कारवाई

    भुसावळ विभागात महिला सुरक्षेसाठी RPF ची विशेष मोहिम — एकाच दिवशी 103 जणांवर कारवाई

    भुसावळ रेल्वे विभागात 21 एप्रिल 2025 रोजी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने विशेष तपास मोहिम राबवण्यात आली. भुसावळ स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, ताप्ती गंगा एक्सप्रेस, काशी एक्सप्रेस, सूरत-अमरावती एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस या गाड्यांतील महिला राखीव डब्यांची तपासणी करण्यात आली.

    या तपासणीदरम्यान अनधिकृतपणे महिला कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना खाली उतरवून, रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत कारवाई करण्यात आली. एकूण 103 प्रकरणांमध्ये प्रत्येकाला ₹300 इतका दंड ठोठावण्यात आला. ही मोहिम RPF निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.

    महिला प्रवाशांना कोणतीही सुरक्षा अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक 139 वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची युवक कार्यकारणी जाहीर… सागर वाघोदे अध्यक्षपदी तर अमोल महाजन यांची सचिवपदी निवड

    भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची युवक कार्यकारणी जाहीर… सागर वाघोदे अध्यक्षपदी तर अमोल महाजन यांची सचिवपदी निवड

    समाजहिताच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळतर्फे तरुणांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने युवक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा भोरगाव लेवा पंचायत विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषचंद्र भंगाळे आणि धीरज पाटील यांनी केली.

    नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सागर वाघोदे, सचिवपदी अमोल महाजन, सहसचिव शेखर धांडे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून पवन बाक्षे, सुमित बऱ्हाटे, सागर सरोदे, शिशिर जावळे, जीवन वारके आणि पवन भोळे यांची नियुक्ती झाली आहे. खजिनदारपदी प्रवीण पाटील, तर सहखजिनदार अश्विन लोखंडे यांची निवड झाली आहे.

    कार्यकारिणी सदस्य म्हणून अमोल पाटील, गौरव महाजन, ललित भोळे, यश फालक, वरद फालक, श्रेयस इंगळे, विकास पाटील, हर्षल बोरोले आणि निलेश भोळे यांचा समावेश आहे.

    युवक मंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना दिशा देणारे उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असून, सदस्य नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

  • उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या, यामागचं नेमकं ‘सत्य’…..

    उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या, यामागचं नेमकं ‘सत्य’…..

    सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊया…

    उशिरा उठणं:- उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते.तुम्हाला ताण येऊ शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. म्हणून सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करा.

    फोनचा अतिवापर..जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरायला सुरुवात केली तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचवते. तसेच डोकेदुखी, डोळे दुखणे आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.मोबाईलचा जास्त वापर केल्यानेही झोपेचा अभाव होऊ शकतो. सकाळी मोबाईल फोनचा वापर कमीत कमी करा आणि तुमचा दिवस चांगला सुरू करा.

    नाश्ता न करणं…सकाळी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव होतो. यामुळे ऊर्जेचा अभाव आणि थकवा येऊ शकतो.मधुमेह आणि हृदयरोगासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून सकाळी नाश्ता आवर्जून करावा.

    व्यायाम न करणं…प्रत्येक व्यक्तीने सकाळी व्यायाम केला पाहिजे. यामुळे तुम्ही लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या समस्या टाळू शकता.व्यायाम न केल्याने तुम्हाला ताण आणि थकवा देखील जाणवतो, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. सकाळी व्यायाम करा आणि तुमचे शरीर निरोगी ठेवा.

    नियोजन नाही…तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्याकडे प्रत्येक दिवसाची योजना असली पाहिजे. असं केल्याने तुमचा मूड फ्रेश राहतो आणि तुम्हाला दिवसभर हलकं वाटतं.

  • भाजपच्या शहराध्यक्ष निवडीचा काउंटडाऊन सुरू; कुणाच्या नशिबी माळ?

    भाजपच्या शहराध्यक्ष निवडीचा काउंटडाऊन सुरू; कुणाच्या नशिबी माळ?

    भुसावळ शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आता काउंटडाऊन सुरू झाला आहे. प्रदेश कार्यालयाकडून २४ ते ४८ तासांत अधिकृत नाव जाहीर होईल, अशी माहिती मिळते आहे.या पदासाठी दावेदारांची संख्या वाढत असली तरी पक्ष नव्या चेहऱ्यांकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पसरली आहे.भुसावळ भाजप अध्यक्ष पदासाठी वरिष्ठ स्तरावर अंतिम फेरफार सुरू असून, लवकरच नाव जाहीर होणार आहे. नवीन नेतृत्वासाठी पक्ष नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवेल का, की पुन्हा एकदा अनुभवी नगरसेवकांवर भर देईल, हा मोठा प्रश्न आहे.नाव सुचवण्यासाठी स्थानिक पातळीवरून अहवाल पाठवले गेले असून, त्यात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया व संघटनामधील योगदानाचाही विचार केला गेला आहे. त्यामुळे कोणत्या गटाचा उमेदवार पुढे येतो, यावरून शहरातील भाजपची पुढची दिशा ठरणार आहे.किरण कोलते, संदीप सुरवाडे, राहुल तायडे व श्रेयस इंगळे ही नावं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही इच्छुकांची वरिष्ठांशी थेट बैठक झाली असल्याचेही समजते. या पदासाठी स्थानिक व प्रदेशस्तरावरील मतांचा समन्वय साधणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.कार्यकर्त्यांची एकजूट ठेवणे, आगामी नगरपालिका निवडणूक तयारी आणि स्थानिक गटबाजी दूर ठेवण्यासाठी भुसावळ भाजपचे संकटमोचक युवराज लोणारी यांचा सुद्धा पुन्हा शहराध्यक्ष म्हणून विचार होऊ शकतो अशी सुद्धा पण एक चर्चा सुरू आहे.

  • भाजपच्या शहराध्यक्ष निवडीचा काउंटडाऊन सुरू; कुणाच्या नशिबी माळ?

    भाजपच्या शहराध्यक्ष निवडीचा काउंटडाऊन सुरू; कुणाच्या नशिबी माळ?

    भुसावळ शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आता काउंटडाऊन सुरू झाला आहे. प्रदेश कार्यालयाकडून २४ ते ४८ तासांत अधिकृत नाव जाहीर होईल, अशी माहिती मिळते आहे.
    या पदासाठी दावेदारांची संख्या वाढत असली तरी पक्ष नव्या चेहऱ्यांकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पसरली आहे.भुसावळ भाजप अध्यक्ष पदासाठी वरिष्ठ स्तरावर अंतिम फेरफार सुरू असून, लवकरच नाव जाहीर होणार आहे. नवीन नेतृत्वासाठी पक्ष नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवेल का, की पुन्हा एकदा अनुभवी नगरसेवकांवर भर देईल, हा मोठा प्रश्न आहे.नाव सुचवण्यासाठी स्थानिक पातळीवरून अहवाल पाठवले गेले असून, त्यात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया व संघटनामधील योगदानाचाही विचार केला गेला आहे. त्यामुळे कोणत्या गटाचा उमेदवार पुढे येतो, यावरून शहरातील भाजपची पुढची दिशा ठरणार आहे.

    किरण कोलते, संदीप सुरवाडे, राहुल तायडे व श्रेयस इंगळे ही नावं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही इच्छुकांची वरिष्ठांशी थेट बैठक झाली असल्याचेही समजते. या पदासाठी स्थानिक व प्रदेशस्तरावरील मतांचा समन्वय साधणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

    कार्यकर्त्यांची एकजूट ठेवणे, आगामी नगरपालिका निवडणूक तयारी आणि स्थानिक गटबाजी दूर ठेवण्यासाठी युवराज लोणारी यांचा सुद्धा पुन्हा शहराध्यक्ष म्हणून विचार होऊ शकतो अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे.

  • पिंपळाच्या पानांचा रस पिणे आरोग्यासाठी खूप गुणकारी

    पिंपळाच्या पानांचा रस पिणे आरोग्यासाठी खूप गुणकारी

    पिंपळाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. याच्या पानांचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिपळाच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करतात.कॅल्शियम, मॅंगनीज, तांबे, लोह यांसारखी खनिजे आणि प्रथिने, फायबर यांसारखी पोषक तत्त्वे पिंपळाच्या पानांमध्ये आढळतात. पिंपळाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीडायबेटिक गुणधर्म असतात, जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.चला जाणून घेऊया पिंपळाच्या पानांचा रस पिण्याचे काय फायदे आहेत.

    फुफ्फुस निरोगी ठेवा :- पिंपळाची पाने फुफ्फुसासाठी फायदेशीर आहेत. पिंपळाच्या पानांचा रस फुफ्फुसांना डिटॉक्स करण्याचे काम करतो. हा रस प्यायल्याने फुफ्फुसातील जळजळ होण्याची समस्याही दूर होते. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.

    खोकला आराम :-पिंपळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म खोकला दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. याच्या रसाचे सेवन केल्याने खोकल्याची समस्या दूर होते, हा रस प्यायल्याने श्लेष्माची समस्या देखील दूर होते.

    पचनासाठी फायदेशीर :-पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते. जर तुम्हाला डायरियासोबतच मळमळण्याची समस्या असेल तर या रसाच्या सेवनाने या समस्येपासून सुटका मिळते. याशिवाय हा रस गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या दूर करतो.

    रक्त स्वच्छ करा :- पिंपळाच्या पानांचा रस डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करतो. हा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते. रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. हे पेय प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग देखील दूर होतात.

    साखर नियंत्रण :- हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते. पिंपळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म स्पाइक नियंत्रित करतात आणि साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात. पिंपळाच्या पानांचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.

    दात आणि हिरड्या निरोगी करा :- पिंपळाच्या पानांचा रस दात आणि हिरड्यांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात निरोगी राहतात. पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने हिरड्यांच्या त्रासातही आराम मिळतो.

  • अभाविपतर्फे भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि सेवा उपक्रम

    अभाविपतर्फे भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि सेवा उपक्रम

    भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

    या कार्यक्रमानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या बांधवांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेच्यावतीने सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेतही उपस्थित बांधवांची सोय लक्षात घेऊन ABVP ने हा उपक्रम राबवला.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग संयोजक भावीन पाटील, जिल्हा कार्यालय प्रमुख प्रतीक साळी महानगर सहमंत्री चिन्मय महाजन महानगर एस एफ डी संयोजक गणेश दुसाने विद्यापीठ नगर मंत्री गौरव राजपूत आणि इतर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असे अभाविप च्या वतीने सांगण्यात आले.

    जाहिरात 👇

  • जय मातृभूमी क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू चेतन पाटील यांची हिमाचल प्रदेशातील महावितरण कबड्डी स्पर्धेसाठी संभाव्य २३ जणांच्या यादीत निवड

    जय मातृभूमी क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू चेतन पाटील यांची हिमाचल प्रदेशातील महावितरण कबड्डी स्पर्धेसाठी संभाव्य २३ जणांच्या यादीत निवड

    जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय कबड्डीपटू श्री. चेतन पाटील यांची २७ ते २९ एप्रिल २०२५ दरम्यान हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या महावितरण कबड्डी टूर्नामेंटसाठी संभाव्य २३ जणांच्या यादीत निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनत, उत्कृष्ट खेळ कौशल्य आणि संघातील योगदानाची पावती आहे.चेतन पाटील यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भुसावळ आणि जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • पिलखेडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर – विज्ञान व अध्यात्माची एकत्रित झलक

    पिलखेडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर – विज्ञान व अध्यात्माची एकत्रित झलक


    आज पिलखेडा, शिंदखेडा जिल्हा धुळे येथे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान जयंती निमित्त गुरु गोरक्ष नाथ आखाडा दक्षिणमुखी मारुती पिलखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज 15 एप्रिल रोजी करण्यात आले
    होते.

    शिबिराचे उद्घाटन रा स्व संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते कार्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, स्वामी असिमानंद जी महाराज, योगी दत्तनाथ महाराज, परमपूज्यने योगी अवधूतनाथ महाराज, आचार्य मानेकर बाबा, शाम चैतन्य महाराज, स्वामी ब्रह्मगिरी महाराज, ह भ प परमेश्वर बाबा महाराज, रमेश गिरी महाराज, शुभ्रानंद जी महाराज, रा.स्व.संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह श्री बाळासाहेब चौधरी,आ. अनुपजी अग्रवाल, आ. अमोलदादा जावळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायणजी भाऊसाहेब, जिजाबराव भाऊसाहेब,के पी गिरासे सर, दीपक बागल,डॉ. रितेश पाटील, पंकज कदम, हितेंद्रजी जैन , भाजपा तालुक्याप्रमुख, शिंदखेडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित होते.
    प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन श्री बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनही केले
    या प्रसंगी विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम या ठिकाणी घडून आला आहे. शारीरिक आरोग्यासाठी विज्ञान तर मानसिक शांतता आणि आरोग्यासाठी अध्यात्म्याची आवश्यकता आहे. महिला आणि अनेक पेशंट दवाखान्यात जायला टाळत असतात.अशा लोकांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा या शिबिरात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सतत कामात असल्याने मानसिक आरोग्या ची अडचण निर्माण होते. शारीरिक आरोग्य बरोबर मानसिक आरोग्य देखील जपले पाहिजे याबाबत बोलायला सुरुवात केली पाहिजे असेही सांगितले.
    सिंधखेडा व आसपासच्या गावातील बहुसंख्य लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. येथे अनेक व्याधींवर तपासणी करून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचार आणि प्रसंगी शस्त्रक्रियेची देखील व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे.

  • दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याचे हे आहेत फायदे…नक्की वाचा !

    दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याचे हे आहेत फायदे…नक्की वाचा !

    दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याचे अनेक फायदे आहेत. या सवयीमुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात. तसेच हृदयविकाराचा झटका, मधुमेह यासह अनेक आजारांपासूनही बचाव होतो.

    *हृदयविकाराचा झटका –

    दातांना किड लागण्यास सुरुवात होताच शरीरात सी-रिअँक्टिव्ह प्रथिने आणि फायब्रिनोजेनची पातळी वाढू लागते. या घटकांमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच किडलेले दात ताबडतोब काढण्याचा सल्ला न्यूयॉर्क विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देतात. एवढेच नव्हे तर दातांमध्ये असलेले जिवाणू रक्तात मिसळून संसर्ग पसरवतात.

    *फुप्फुसांचा आजार –
    क्रॉनिक ऑब्सट्रेक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) आणि दातांच्या आरोग्याचा थेट संबंध आहे.

    अमेरिकन अकॅडमी ऑफ पीरिओडोंटोलॉजीच्या मते, तोंडातील जिवाणू फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत संसर्ग पसरवतात. यामुळे सीओपीडी असलेल्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. सिगारेटदेखील या आजाराचे एक प्रमुख कारण मानले जाते.

    *मधुमेह –*

    न्यू कॅसल विद्यापीठाच्या संशोधकांना मधुमेह असलेल्यांमध्ये हिरड्यांशी संबंधित आजार असण्याची तिप्पट शक्यता असल्याचे आढळून आले. तसेच मधुमेहींची ग्लुकोजची पातळी नियंत्रित राखण्याची क्षमता कमी होते. सोबतच हृदय आणि मूत्रपिंडाचा आजार होण्याची भीती असते.

    *संधिवात –*

    हिरड्यांशी संबंधित आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीच्या दातांशी जुळलेली हाडे कमकुवत होऊ लागतात. तज्ज्ञांच्या मते, काही रुग्णांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा हा संकेत असू शकतो. काही काळानंतर ते संधिवाताचे कारण बनते.