Blog

  • योग्य आहार,योग्य विहार,आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य… ना.संजय सावकारे

    योग्य आहार,योग्य विहार,आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य… ना.संजय सावकारे

    निरोगी आणि दिर्घकाळ आयुष्य जगायचे असेल तर प्रत्येकाने
    योग्य आहार,योग्य विहार,आणि योग्य विचार ही सुखी आणि समृद्धी आयुष्याची गुरुकिल्ली असून ती आचरणात आणली तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती आयुष्याची शंभरी पार करू शकेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी केले आहे.
    ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित टी. व्ही. पाटील सर यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सव सोहळा दरम्यान ते बोलत होते. ना. सावकारे पुढे म्हणाले की सध्याच्या धावपळीच्या जीवनात जंक फूड खाण्याच्या सवयी वाढल्या आहेत.सोशल मीडियामुळे शारिरीक कसरत कमी होत असून विचारांवर पण बंधन राहिले नाही.त्यामुळे प्रत्येकाचे आयुष्याचे जीवनमान खालावलेला असून आयुष्य पण कमी होत आहे.या नवीन पिढीसमोर ही जुनी पिढी नक्कीच आदर्श असून प्रत्येकाने हा आदर्श समोर ठेवावा.
    या अमृत महोत्सवात प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम वासुदेव पाटील यांची 75 दिव्यांनी ओवाळणी करण्यात आली.यानंतर गूळ तुला करण्यात आली. स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री माऊली भजनी मंडळ तर्फे संगीत संध्या सादर करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील शिक्षक,राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी प्रस्तावना प्रकाश पाटील,सूत्रसंचालन सतीश जंगले आणि आभार धनराज पाटील यांनी मानले.

  • महानिरीक्षक सुरेंद्र नाथ चौधरी यांचे भुसावळमध्ये वार्षिक सुरक्षा निरीक्षण आरपीएफ जवानांना मार्गदर्शन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

    महानिरीक्षक सुरेंद्र नाथ चौधरी यांचे भुसावळमध्ये वार्षिक सुरक्षा निरीक्षण आरपीएफ जवानांना मार्गदर्शन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

    मध्य रेल्वे, मुंबईचे महानिरीक्षक व प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त श्री सुरेंद्र नाथ चौधरी यांनी भुसावळ येथे वार्षिक सुरक्षा निरीक्षणासाठी भेट दिली. त्यांच्या आगमनप्रसंगी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मंडल रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पांडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.या निमित्ताने खंडवा येथील नव्याने बांधलेल्या आरपीएफ जवानांच्या बैरक व शेगाव येथील नविन पोस्ट भवनाचे उद्घाटन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले.निरीक्षणादरम्यान, विभागीय अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षा व्यवस्थेसंबंधी समन्वय बैठक घेण्यात आली. यामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला.भुसावळ येथील रिझर्व लाईनवर आरपीएफ जवानांबरोबर सुरक्षा संमेलन घेण्यात आले. यावेळी श्री चौधरी यांनी राष्ट्रनिर्माणातील आरपीएफच्या योगदानाची प्रशंसा केली आणि सेवा, समर्पण व शिस्तबद्धतेने कार्य करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमात वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त श्री चित्रेश जोशी, सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ, सहाय्यक सुरक्षा आयुक्त मनमाड, तसेच भुसावळ मंडलातील सर्व आरपीएफ निरीक्षक उपस्थित होते.

  • जळगाव जिल्हा सिनियर गट मैदानी स्पर्धेत भुसावल तालुक्यातील खेळाडूंचा सहभाग  १ व २ जून रोजी जळगावमध्ये एथलेटिक्स स्पर्धेचा थरार

    जळगाव जिल्हा सिनियर गट मैदानी स्पर्धेत भुसावल तालुक्यातील खेळाडूंचा सहभाग १ व २ जून रोजी जळगावमध्ये एथलेटिक्स स्पर्धेचा थरार

    जळगाव जिल्हा सिनियर गट मैदानी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा २०२५ ही स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे १ व २ जून २०२५ रोजी होणार आहे.या स्पर्धेमध्ये भुसावल तालुका एथलेटिक्स असोसिएशनचे सिनियर गटातील उत्कृष्ट खेळाडू सहभाग घेणार आहेत.

    संघाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी सुजल शुक्ला यांची टीम मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.भुसावल तालुका एथलेटिक्स असोसिएशन परिवार यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

  • “धरतीमातेचा राग शांत करण्यासाठी — प्रत्येक धार्मिक स्थळी वृक्षारोपण, कारण वृक्षांची घटती संख्या हीच मानवाच्या संकटांची सुरुवात!”- डॉ सुरेंद्रसिंग पाटिल

    “धरतीमातेचा राग शांत करण्यासाठी — प्रत्येक धार्मिक स्थळी वृक्षारोपण, कारण वृक्षांची घटती संख्या हीच मानवाच्या संकटांची सुरुवात!”- डॉ सुरेंद्रसिंग पाटिल

    आपण विविध जाती, धर्म पंथ आपण मानत असलेले देवता वेगवेगळ्या रूपाने असतील परंतु सर्वांचा साक्षीदार एकच आहे धरतीमाता कुठलाही जातीभेद धर्मभेद न करता आपण सर्व धरती मातेचे लेकर आहात ज्याप्रमाणे आपण कुठल्याही ऑफिसमध्ये जातो तेव्हा दारावर आपणास सुरक्षारक्षकास नमस्कार करावा लागतो तसाच आपण मानत असलेल्या विविध देवी-देवतांना नमस्कार करताना येताना जाताना मंदिराच्या बाहेर असलेल्या देवाचे वाहन असलेल्या उदाहरणार्थ नंदीबैल, कासव तसेच धरतीला नमस्कार करावाच लागतो सद्यस्थितीत काही कारणास्तव पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने धरतीमाता आपल्या सर्वांवर नाराज असल्याने आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे

    उदाहरणार्थ ग्लोबल वार्मिंग मुळे गेल्या तीन वर्षात आपण म्हणत होतो आपले ऋतू एक महिन्याने पुढे सरकलेले आहेत त्यामुळे मान्सूनचे आगमन एक महिना पुढे होत आहे परंतु आज रोजी आपण मान्सूनच्या आगमन पंधरा दिवस आधी होत आहे असे म्हणत आहोत पावसाळा सुरू होण्याच्या वेळेस कधीही इतके दमट वातावरण आपण बघितलेले नाही हे सर्व सजीवांना आवश्यक असलेले वृक्षांची संख्या काही कारणास्तव भरपूर प्रमाणात कमी झालेले आहेत साक्षीदार जर नाराज असेल तर भगवंतही आपण कितीही दानरूपी रक्कम कितीही ठेवले कितीही अन्नदान केले तरी आपली इच्छा पूर्ण होत नाही

    आपण सर्व धरतीचे लेकरं आहोत सर्व सजीवांचा समतोल राखणारी धरतीमाता अतृप्त असून तर ती तृप्त होण्यासाठी मानवासहित सर्व सजीवांना आवश्यक असलेले विविध प्रकारच्या प्रसाद रुपी वृक्षांची संगोपनासहित दान करावे पर्यावरण तज्ञ डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान कुठल्याही धार्मिक स्थळी प्रत्येक जण धरतीवर आपले डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करणारे तसेच त्यांच्याकडून नमस्कार होत नाही ते धरती मातेला हात लावून आपण विविध धर्मानुसार जातीनुसार वेगवेगळ्या देवतांना धर्मगुरूंना नमस्कार करत असतो आपली मागणी देवाजवळ पूर्ण होण्यासाठी साक्षीदार धरतीमाता प्रसन्न होण्यासाठी सर्व सजीवांना आवश्यक असलेली विविध प्रकारचे वृक्ष संगोपनासहित लावावे कुठलाही जातीभेद धर्मभेद न मानता सर्वांना एकसारखी न्याय देणारी सर्वांना आपली लेकरं मानणारी धरतीमाता आनंदी असेल तर सर्व मानवासहित सर्व सजीव आनंदी.

  • वाल्मीक नगर, रमाबाई आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगरमधील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी ना. संजयभाऊ सावकारे यांना मागणी

    वाल्मीक नगर, रमाबाई आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगरमधील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी ना. संजयभाऊ सावकारे यांना मागणी

    जळगाव जिल्हा भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने कामगार नेते राजुभाऊ खरारे यांनी भुसावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. संजयभाऊ सावकारे यांना निवेदन देण्यात आले. जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयासमोरील वाल्मीक नगर, रमाबाई आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगर या अनुसूचित जाती स्लम परिसरात गेल्या १५ वर्षांपासून वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे.

    या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून या परिसरात नवीन स्वतंत्र रोहीत्र बसवण्यात यावे, अशी मागणी उपाध्यक्ष राजु खरारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. ही मागणी आमदार निधीतून करण्याची विनंतीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

  • बोदवड नगर पंचायतच्या कर वाढीविरोधात भाजपा आक्रमक — निवेदनाद्वारे निषेध

    बोदवड नगर पंचायतच्या कर वाढीविरोधात भाजपा आक्रमक — निवेदनाद्वारे निषेध

    बोदवड़ नगरपंचायत ने शहरातील नागरीकांना अवाजवी कर व चुकीच्या पद्धतीने कर आकारणी लादली. त्यामुळे शहरातील संपूर्ण जनतेमध्ये रोष आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी व त्यातील काही कर ज्याचा लाभ अजुन पर्यंत बोदवड़ शहराला भेटला नही असे म्हणजे वृक्षरोपण कर, अग्निशमक कर, रोजगार हमी कर, शैक्षणीक कर, त्यातून कमी करावे व जाचक कर न लावता योग्य ती वसूली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी ने आज नगरपंचायत ला निवेदन दिले. भारतीय जनता पार्टी ने निवेदनात नगर पंचायत ने लावलेले शैक्षणिक कर, वृक्षरोपण कर, रोजगार हमी कर, हे पूर्णतः रद्द करण्यास सांगितले तसेच तालुकाध्यक्ष अमोलभाऊ देशमुख यांनी सीईओ साहेबांना तीन मागणी केली. नगरपंचायत झाली तेव्हापासुन उपविधी का झाली नाही. त्यावर सीईओ साहेबांनी सांगितले की आम्ही बॉडी समोर विषय ठेवला आहे. बॉडी ने पटलावर घेतला नही. बॉडी ने तो विषय घेतला तर कोणता घेतला यावर सीईओ साहेबांना समाधानकारक उत्तर देता आली नही. नंतर तक्रार नंबर देण्याची मागणी केली. तक्रार देण्यासाठी नगरपंचायत मार्फत नंबर दिला गेला पाहिजे. आम्ही तीसरी मागणी तक्रार बुक ची केली. आता पर्यंत कोणाच्या तक़रारी आल्या व कोणत्या आल्या समझल्या पाहिजे. आमच्या मागण्या वर सीईओ साहेबांना योग्य ती समाधानकारक उत्तर देता आली. एक लोहार की सौ सुनार की अशी गत सीईओ साहेबांची झाली. तुम्ही घेतलेल्या कर मधील नफा फंडातुन कोणत्या कोणत्या प्रभागात किती कामे केली जात आहे हे नागरीकांना कळावे या संदर्भ मध्ये पण भारतीय जनता पार्टी ने सखोल चर्चा केली. तसेच करा संदर्भ मध्ये सीईओ साहेब यांनी राज्य शासन चे GR मधील नियम सांगितले त्यानुसार त्याच GR मधील आम्ही त्यांना प्रश्न विचारले की GR नुसार बोदवड़ नगरपंचायत मार्फत शहरातील नागरिकांना प्रती व्यक्ति प्रती लीटर पाहिजे तेवढ पाणी भेटतेय का याची विचारणा केली.आज भारतीय जनता पार्टी नेतालुकाध्यक्ष अमोलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात बोदवड़ शहरातील नागरिकांवर लादलेल्या अवाजवी कर संदर्भ मध्ये नगरपंचायतचे सीईओ गजानन तायडे साहेब यांच्याशी सखोल चर्चा केली त्यांनी सांगितले की मी तुमचे म्हणने राज्य शासनाला कळवतो व कर कमी कसे करण्यात येतील ते बघतो.त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

  • पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भुसावळ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने “युवा संवाद मेळावा” साजरा

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भुसावळ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने “युवा संवाद मेळावा” साजरा

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित “युवा संवाद मेळावा” आज साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाचे आयोजन भाजप भुसावळ शहर (उत्तर-दक्षिण) विभागातर्फे करण्यात आले होते. शहराध्यक्ष किरणभाऊ कोलते (दक्षिण) व संदीपभाऊ सुरवाडे (उत्तर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संवादात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

    माजी नगराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी यांनी आपल्या भाषणातून युवकांना समाजातील सकारात्मक बदलासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेत युवा पिढीने नेतृत्व आणि समाजसेवेत योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.

    कार्यक्रमाला भाजपचे अनेक मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संवादात सामाजिक प्रश्न, रोजगार, शिक्षण आणि युवकांसाठीच्या संधी यावर चर्चा झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. संवाद, प्रेरणा व राष्ट्रनिर्माणाची दिशा देणारा हा मेळावा युवकांसाठी निश्चितच एक ऊर्जा देणारा ठरला.

  • भुसावळात स्त्रीशक्तीचा गजर – लाठीकाठी प्रशिक्षणाने मिळाले आत्मविश्वासाचे शस्त्र

    भुसावळात स्त्रीशक्तीचा गजर – लाठीकाठी प्रशिक्षणाने मिळाले आत्मविश्वासाचे शस्त्र

    बदलत्या काळातल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे तुम्ही स्वतः सक्षम झालात तर दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकाल असे प्रेरणादायी मत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी मांडले निमित्त होते विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वहिनी तर्फे आयोजित लाठीकाठी प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई सावकारे आचार्य स्वामी ब्रह्मानंद जी महाराज दत्त गिरनारी मठ, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. श्रीकांतजी लाहोटी, राष्ट्र सेविका समितीच्या अनघाताई कुलकर्णी,संतोषीमाता बहुउ्देशीय हॉल चे संस्थापक श्री.वासुदेवजी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. 15 मे ते 25 मे या दहा दिवसाच्या काळात शिवमुद्रा प्रतिष्ठान व जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या प्रांगणावर उदघाटन प्रसंगी तहसीलदार नीताजी लबडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त इंटेलिजन्स ऑफिसर रेखाजी मिश्रा, बाजारपेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुलजी वाघ उपस्थित होते. सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात शहरातील फक्त मुलींसाठी लाठी काठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले होते रावेर येथील श्री.जीवन महाजन व कु.परि महाजन यांनी या काळात मुली व महिलांना लाठीकाठी चे प्रशिक्षण दिले शहरातील सुमारे 400 मुली व महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला या दहा दिवसाच्या प्रशिक्षण काळात डॉ. देवेंद्र शर्मा, प्रा.जयंत लेकुरवाळे,ऍड.मेघा वैष्णव,राष्ट्र सेवा समितीच्या अनघा कुलकर्णी, दत्त गिरनारी मठ शिरपूर कन्हाळा येथील ऐश्वर्या ताई चौधरी यासारख्या मान्यवरांनी प्रशिक्षणाला भेट देऊन प्रशिक्षणार्थींना बौद्धिक मार्गदर्शन केले या प्रशिक्षण शिबिराचा समारोप कार्यक्रम रविवारी संध्याकाळी संतोषी माता बहुउ्देशीय सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच दुर्गामाता यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी मुलींनी व महिलांनी लाठीकाठी चे वेगवेगळे प्रात्यक्षिक सादर केले सदर प्रात्यक्षिकांनी सर्वांची मने जिंकलीतसेच शिबिरात वय वर्ष 80 असे 2 जेष्ठ नागरिकांनी सुद्धा प्रात्यक्षित केले वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारच्या शिबिरातून देशाची संस्कारक्षम भावी पिढी तयार होईल असा विश्वास दाखविला तर रजनीताई सावकारे यांनी शिबिरार्थी मुलींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकाबद्दल त्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वरुण इंगळे यांनी मांडले सूत्रसंचालन श्री. विनोद उबाळे आणि सोनल शर्मा यांनी केले आभार प्रदर्शन सौ.सारिका पाटील यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिबिरार्थी मुली महिला तसेच पालकांनी गर्दी केली होती.

  • राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त नर्मदेश्वर मंदिरात वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत भाजपाचे स्वच्छता अभियान

    राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त नर्मदेश्वर मंदिरात वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत भाजपाचे स्वच्छता अभियान

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून, दिनांक २५ मे रोजी नर्मदेश्वर महादेव मंदिर व परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयभाऊ सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर विभाग मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभाग मंडळ अध्यक्ष किरण कोलते यांच्या यांच्यासह माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे राजेंद्र नाटकर प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, प्रवीण इखणकर, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी,माजी नगरसेवक निर्मल कोठारी, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, ललित मराठे, राजू खरारे, शंकर शेळके, रवींद्र ढगे, राहुल तायडे, प्रशांत पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता आंबेकर, अलका शेळके, शैलेजा पाटील, पल्लवी वारके, प्रमोद पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, अमित असोदेकर,अमोल झटकार, सागर चौधरी,सागर वाघोदे, रवींद्र खरात, रवींद्र दाभाडे,संतोष ठोकळ, गोपी राजपूत, करण पन्सारी आदींची उपस्थिती होती.

  • ऑपरेशन “उपलब्ध” अंतर्गत RPF भुसावळची कारवाई – रेल्वे तिकीट दलाल जेरबंद

    ऑपरेशन “उपलब्ध” अंतर्गत RPF भुसावळची कारवाई – रेल्वे तिकीट दलाल जेरबंद

    रेल्वे सुरक्षा दल (RPF) भुसावळने “ऑपरेशन उपलब्ध” अंतर्गत मोठी कारवाई करत रेल्वे तिकीट दलाली करणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ पकडले आहे. ही संयुक्त कारवाई उपनिरीक्षक सुदामा यादव, प्रधान आरक्षक नीलेश अढवाल व आरक्षक विलास बोरोले यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या आरक्षण केंद्रावर केली.कारवाईदरम्यान संशयित इसम मो. युसूफ मो. इलियास खाटीक (वय ४४, रा. मिल्लत नगर, भुसावळ) याला पकडण्यात आले. त्याच्याकडे २१ मे २०२५ रोजी जाणाऱ्या १२७१५ DN सचखंड एक्सप्रेसचे PNR नं 453-1626185 असलेले स्लीपर क्लासचे तिकीट मिळाले. या तिकीटाबाबत चौकशी केली असता, त्याने प्रवाशाकडून तिकीटाच्या मूळ किमतीशिवाय ₹२०० अतिरिक्त रोख रक्कम दलाली म्हणून घेतल्याचे कबूल केले.सदर व्यक्तीने कोणताही वैध रेल्वे तिकीट एजंट परवाना सादर केला नाही. त्याच्याविरुद्ध रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत गुन्हा क्रमांक २१३१/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपासासाठी प्रकरण उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. चौकशीत त्याने आपले guilt मान्य करत, ओळखीच्या मंजूर खान रुकसिन खानसाठी अतिरिक्त दलाली घेऊन तिकीट काढल्याचे कबूल केले.रेल्वे प्रशासनाकडून तिकीट दलालांविरोधात अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.