Blog

  • भुसावळातील गुणवंतांचा एकत्रित गौरव: ‘एक क्षण गौरवाचा’ मा. ना. वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न आईदादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    भुसावळातील गुणवंतांचा एकत्रित गौरव: ‘एक क्षण गौरवाचा’ मा. ना. वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न आईदादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    “आई दादा प्रतिष्ठान” व “भाजप अनुसूचित जाती मोर्चा, भुसावळ” यांच्या संयुक्त विद्यमाने “एक क्षण गौरवाचा 2025” हा विशेष सन्मान सोहळा भुसावळ तालुक्यात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, क्रीडा, साहित्य, कला, व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय सावकारे यांच्या हस्ते गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    “एक क्षण गौरवाचा 2025” या उपक्रमातून भुसावळ परिसरातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिक्षक, क्रीडापटू, साहित्यिक, व समाजसेवक यांचे योगदान ओळखून त्यांना समाजात नवे बळ व प्रोत्साहन देण्याचा उद्देश यशस्वीपणे पूर्ण झाला.

    कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक राहुल वसंत तायडे,आयोजक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी प्रेमचंद तायडे,संतोष ठोकळ,रविंद्र दाभाडे,विक्की गोहर, गणेश जाधव,राकेश सपकाळे,दिपक गायकवाड नरेश खंडारे,दिपक सोनवणे,दिनेश बालूरे,आकाश आव्हाड,भरत उमरिया,संजय नरवाडे,रवि घुले,वाल्मिक पवार,अश्विन नरवाडे,अजय तायडे यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.

  • राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक फाऊंडेशनतर्फे १६ जून रोजी साकरीत महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त शैक्षणिक साहित्य वितरण व पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन कार्यक्रम

    राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक फाऊंडेशनतर्फे १६ जून रोजी साकरीत महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त शैक्षणिक साहित्य वितरण व पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन कार्यक्रम

    राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाऊंडेशन, भुसावळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता, साकरी येथील मोठा हनुमान मंदिरात, “अवनी दत्तक योजना” अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष आहे आणि हा उपक्रम सलग चौथ्या वर्षी राबवण्यात येत आहे.कार्यक्रमात पोक्सो कायद्याविषयी जनजागृतीसाठी भुसावळ येथील विधीतज्ञ मा. अ‍ॅड. प्रिया अडकमोल यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. विनोद अमृत सोनवणे (सरपंच, साकरी) असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. रोशन अंबादास पाटील (उपसरपंच साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. रतनसिंग उत्तमसिंग बोदर(पोलीस पाटील साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. सोपान बळीराम भारंबे (मा. सभापती कृ.उ.बा. समिती, भुसावळ),मा.श्री. सुनिल श्रीधर महाजन(मा.सभापती कृ.उ.बा. समिती, भुसावळ) ,मा.श्री. किरण संतोष चोपडे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. जितेंद्र लक्ष्मण चोपडे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. नितीन पुंडलिक इंगळे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. अश्विन डिगंबर सपकाळे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. नारायण झगू कोळी (अध्यक्ष आदिवासी कोळी समाज वधु-वर सुचक महा राज्य),मा. सौ. नंदा भानुदास बाविस्कर(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा. सौ. काजल प्रदिप भारंबे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. निशा विनोद सोनवणे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. सुरेखा रविंद्र भारंबे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. निर्मला सुनिल महाजन(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. मालती शरद फालक(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. प्रिया संजय चोपडे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. मोहन पुंडलिक पाटील(ग्रामसेवक साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. संजयसिंग गुलाबसिंग चौधरी(समाजसेवक )व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    कार्यक्रमाचे संयोजन राजेश्री राजधर सुरवाडे (अध्यक्ष, राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाऊंडेशन) करणार असून, यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी महिला ,जय बजरंग गृप, साकरी,निर्मला ट्रेनिंग सेंटर,चर्तुभुज मित्र मंडळ,एकता महिला बचत गट सक्रिय योगदान देत आहेत.

  • राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक फाऊंडेशनतर्फे १६ जून रोजी साकरीत महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त शैक्षणिक साहित्य वितरण व पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन कार्यक्रम

    राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक फाऊंडेशनतर्फे १६ जून रोजी साकरीत महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त शैक्षणिक साहित्य वितरण व पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन कार्यक्रम

    भुसावळ (प्रतिनिधी): राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाऊंडेशन, भुसावळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता, साकरी येथील मोठा हनुमान मंदिरात, “अवनी दत्तक योजना” अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष आहे आणि हा उपक्रम सलग चौथ्या वर्षी राबवण्यात येत आहे.कार्यक्रमात पोक्सो कायद्याविषयी जनजागृतीसाठी भुसावळ येथील विधीतज्ञ मा. अ‍ॅड. प्रिया अडकमोल यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. विनोद अमृत सोनवणे (सरपंच, साकरी) असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. रोशन अंबादास पाटील (उपसरपंच साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. रतनसिंग उत्तमसिंग बोदर(पोलीस पाटील साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. सोपान बळीराम भारंबे (मा. सभापती कृ.उ.बा. समिती, भुसावळ),मा.श्री. सुनिल श्रीधर महाजन(मा.सभापती कृ.उ.बा. समिती, भुसावळ) ,मा.श्री. किरण संतोष चोपडे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. जितेंद्र लक्ष्मण चोपडे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. नितीन पुंडलिक इंगळे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा.श्री. अश्विन डिगंबर सपकाळे(सदस्य साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. नारायण झगू कोळी (अध्यक्ष आदिवासी कोळी समाज वधु-वर सुचक महा राज्य),मा. सौ. नंदा भानुदास बाविस्कर(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा. सौ. काजल प्रदिप भारंबे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. निशा विनोद सोनवणे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. सुरेखा रविंद्र भारंबे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. निर्मला सुनिल महाजन(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. मालती शरद फालक(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा.सौ. प्रिया संजय चोपडे(सदस्या साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. मोहन पुंडलिक पाटील(ग्रामसेवक साकरी ग्रामपंचायत),मा. श्री. संजयसिंग गुलाबसिंग चौधरी(समाजसेवक )व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    कार्यक्रमाचे संयोजन राजेश्री राजधर सुरवाडे (अध्यक्ष, राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाऊंडेशन) करणार असून, यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी महिला ,जय बजरंग गृप, साकरी,निर्मला ट्रेनिंग सेंटर,चर्तुभुज मित्र मंडळ,एकता महिला बचत गट सक्रिय योगदान देत आहेत.

    सर्व नागरिकांनी या उपक्रमात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • एक हफ्ते में बेकाबू हुआ सोना: 14 से 24 कैरेट तक सभी रेंज में भारी तेजी

    एक हफ्ते में बेकाबू हुआ सोना: 14 से 24 कैरेट तक सभी रेंज में भारी तेजी

    ईरान-इजरायल संघर्ष का असर, सोने की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई परनई दिल्ली | 15 जून 2025ईरान और इजरायल के बीच बढ़ते युद्ध के हालात से एक बार फिर दुनिया में तनाव का माहौल बन गया है। इसका सीधा असर ग्लोबल इकॉनमी और निवेश बाज़ारों पर देखा जा रहा है। सुरक्षित निवेश के रूप में पहचाने जाने वाले सोने (Gold) के दाम में जबरदस्त उछाल आया है।मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) पर 24 कैरेट गोल्ड ने ₹1 लाख प्रति 10 ग्राम का स्तर पार कर लिया है। वहीं घरेलू बाजार में भी सोने के दाम लगातार चढ़ रहे हैं।IBJA की रिपोर्ट के अनुसार:

    6 जून 2025 को 24 कैरेट गोल्ड: ₹98,163/10 ग्राम

    13 जून 2025 को 24 कैरेट गोल्ड: ₹99,060/10 ग्राम➡ एक हफ्ते में ₹897 की बढ़ोतरीअन्य कैरेट गोल्ड रेट (13 जून 2025):22 कैरेट – ₹96,680 / 10 ग्राम20 कैरेट – ₹88,160 / 10 ग्राम18 कैरेट – ₹80,240 / 10 ग्राम14 कैरेट – ₹63,890 / 10 ग्रामविशेषज्ञों का मानना है कि जब तक भू-राजनीतिक हालात सामान्य नहीं होते, तब तक सोने की कीमतों में उतार-चढ़ाव जारी रह सकता है। निवेशकों को सतर्क रहते हुए निर्णय लेने की सलाह दी जा रही है।

  • आईदादा प्रतिष्ठानच्या सौजन्याने उद्या सन्मान सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

    आईदादा प्रतिष्ठानच्या सौजन्याने उद्या सन्मान सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

    “आईदादा प्रतिष्ठान” यांच्या सौजन्याने उद्या रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी “एक क्षण गौरवाचा २०२५” या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना. गिरीशभाऊ महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा.ना. संजयभाऊ सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य असतील. विशेष अतिथी म्हणून मा.ना. रक्षाताई खडसे, केंद्रीय क्रीडा मंत्री, भारत सरकार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

    या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून, समाजातील योगदानाचे कौतुक करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे आहे.

    कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत राहुल वसंत तायडे (आयोजक – भाजप अनुसूचित जाती मोर्चा, भुसावळ शहर) आणि पदाधिकारी प्रेमचंद तायडे, संतोष ठोकळ, रविंद्र दाभाडे, विक्की गोहर, गणेश जाधव, राकेश सपकाळे, दीपक गायकवाड, नरेश खंडारे, दीपक सोनवणे, दिनेश बालूरे, आकाश आव्हाड, भरत उमरिया, संजय नरवाडे, रवि घुले, वाल्मिक पवार, अश्विन नरवाडे, अजय तायडे यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात पर्यावरणपूरक पुढाकार — कापडी पिशव्यांचे वाटप

    श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात पर्यावरणपूरक पुढाकार — कापडी पिशव्यांचे वाटप

    जळगाव ते पंढरपूर मार्गावर चाललेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात काल गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

    “प्लास्टिकच करूया अंत” या संदेशासोबत, श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांनी भाविकांना पिशव्या वितरित केल्या. शिरसोली येथील मुक्कामस्थळी पार पडलेल्या या उपक्रमात सिंगल यूज प्लास्टिक टाळण्याचा आग्रह करण्यात आला.

    ह.भ.प. मंगेश महाराज यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे रक्षण करत भक्तीचा प्रवास करणे ही खरी सेवा आहे.” अधिकाधिक ठिकाणी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले.

    कार्यक्रमावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, गिरीश कुलकर्णी, मदन लाठी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे करणसिंग राजपूत (प्रादेशिक अधिकारी), राजेंद्र सूर्यवंशी (क्षेत्र अधिकारी) व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक दिनी मातृशक्तींच्या हस्ते वाद्यपूजनाचा मंगल सोहळा संपन्न

    शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक दिनी मातृशक्तींच्या हस्ते वाद्यपूजनाचा मंगल सोहळा संपन्न

    तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा व हिंदू साम्राज्य दिनाच्या शुभमुहूर्तावर शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे वाद्यपूजन सोहळा हा मातृशक्ती यांच्या हस्ते करण्यात आला

    हा सोहळ्या साठी रजनी सावकारे प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष केतकी पाटील संचालक गोदावरी फाउंडेशन तथा भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रश्मी शर्मा इंटेलिजन्स ऑफिसर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संगीता पाटील सहाय्यक कृषी अधिकारी भारती काळे पीएसआय भुसावळ बाजारपेठ राजश्री कोलते द वर्ल्ड स्कुल संचालक मंगला पाटील सकल लेवा समाज महिला अध्यक्ष तेजल भंगाळे ज्येष्ठ वादक शिवमुद्रा ढोल पथक काव्या पाटील कवी व दुर्गावाहिनी तसेच हिंदू साम्राज्य व छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दत्त गिरणारे स्वामी ब्रह्मानंद स्वामी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रवींद्र ढगे शिवजयंती 2025 चे उपाध्यक्ष मुकेश गुंजाळ संतोषी माता को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव इंगळे डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी पाच नद्यांचे पाणी तसेच पंचामृत दुग्धभिषेक केला गणपती जगदंबा व छत्रपती शिवाजी महाराजांचे आरती करण्यात आली

    त्यानंतर वादकांनी वादन करून आकर्षण निर्माण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री विनोद उबाळे यांनी केले आभार प्रदर्शन वरून इंगळे यांनी केले या कार्यक्रमासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र गीताने करण्यात आला.

  • भुसावळ रेल्वे स्थानकात झोपेत असलेल्या प्रवाशाची सॅक व मोबाईल चोरी; दोघे अटकेत

    भुसावळ रेल्वे स्थानकात झोपेत असलेल्या प्रवाशाची सॅक व मोबाईल चोरी; दोघे अटकेत

    दिनांक ८ जून २०२५ रोजी रात्रीपासून ९ जूनच्या पहाटे दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील मुसाफिरखान्यात झोपलेल्या प्रवाशाची सॅक बॅग, ओपो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली. या प्रकरणी दिलारपूर, बिहार येथील बुध नारायण रामू साहनी (वय ३१) यांनी फिर्याद दिली.फिर्यादी हे जळगावहून ऑटो रिक्षाद्वारे भुसावळ रेल्वे स्थानकात आले होते. पहाटे ४ वाजता दानापुरकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी त्यांनी मुसाफिरखान्यात खांबाजवळील चौकोनी ओट्यावर झोप घेतली होती.

    त्यावेळी त्यांच्याजवळ असलेली निळ्या रंगाची सॅकबॅग व डाव्या खिशातील मोबाईल व ३००० रूपये रोख चोरीस गेले.गुन्हा दाखल झाल्यानंतर, लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ व रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त कारवाईत, गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.संदीप पुरुषोत्तम कांबळे (वय १९), गार्ड लाईन, भुसावळशेख इब्राहिम शेख नुरबेग (वय ३०), मिल्लत नगर, भुसावळत्यांच्याकडून चोरी गेलेला ओपो कंपनीचा ग्रीन-सिल्वर रंगाचा मोबाईल (किंमत ₹३९,९९९/-) जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींची १३ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली असून, आणखी माल हस्तगत व इतर आरोपींचा तपास सुरू आहे.

    ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक स्वाती भोर (लोहमार्ग, छ. संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संजय लोहकरे, निरीक्षक सुधीर धायरकर व आरपीएफ निरीक्षक पांचुराम मीना यांच्या सहकार्याने पार पडली.तपास अधिकारी म्हणुन पोहवा संजय निकम आणि गुन्हे प्रगटीकरण शाखा, लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ यांनी काम पाहिले.

  • ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेतून एक नाबालिग मुलगी वाचवली – भुसावळ रेल्वे  विभागाची तत्परता!

    ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेतून एक नाबालिग मुलगी वाचवली – भुसावळ रेल्वे विभागाची तत्परता!

    मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘नन्हे फरिश्ते’ या अभियानाअंतर्गत एक नाबालिग मुलगी सुरक्षितपणे बालकल्याण समितीकडे सुपूर्त केली.आज दिनांक ०८.०६.२०२५ रोजी ट्रेन क्र. १२५३३ पुष्पक एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले टीटीई श्री. के. के. मालपाणि यांना कोच S/4 मध्ये एक संशयास्पद नाबालिग मुलगी खंडवा स्टेशनपासून दिसून आली. चौकशी केली असता मुलीने समाधानकारक उत्तर दिले नाही व तिने कोणतीही तिकीट अथवा पास घेतले नसल्याचे सांगितले.

    त्यानंतर टीटीई महोदयांनी भुसावळ स्टेशनवर पोहोचल्यावर मुलीला आरपीएफ पोस्टवर आणले. सीसीटीव्ही देखरेखीखाली एएसआय श्री. एस. जे. दुबे व महिला प्रधान आरक्षक एस. एम. वांदे यांनी तिची विचारपूस केली. तिचे नाव अंशिका कुमारी गंगाराम निषाद, वय १७ वर्षे, राहणार – महुईया, जिल्हा इलाहाबाद असे असल्याचे तिने सांगितले.

    तपासात मुलगी घरात कोणालाही न सांगता निघाली असून ती तिच्या नातेवाईकांकडे जात होती, असे स्पष्ट झाले. तिच्याकडे पालकांचा संपर्क क्रमांकही नव्हता. यानंतर तिची ट्रॉमा केअर, भुसावळ येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

    ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत संपूर्ण कागदपत्री प्रक्रिया पूर्ण करून मुलीला बालकल्याण समिती, जळगाव यांच्याकडे सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आले.

    रेल्वे व आरपीएफने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही अत्यंत प्रशंसनीय आहे.

  • डोंबिवली येथे मोफत महाआरोग्य शिबिर २०२५ उस्फूर्तपणे संपन्न

    डोंबिवली येथे मोफत महाआरोग्य शिबिर २०२५ उस्फूर्तपणे संपन्न

    दिनांक ०१ जून २०२५ रविवार रोजी डोंबिवली येथे लेवा यूथ फोरम डोंबिवली शहर व केंद्रीय संस्था आयोजित व लेवा समाज पाटीदार मंडळ यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर लेवाभवन या ठिकाणी उत्साहात पार पडले.

    शिबिराची सुरुवात श्री गणपतीची आरती व भारत मातेची आरती करण्यात आली व तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन महिला डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले.

    आरोग्याची नवी दिशा निरोगी जीवनाची ग्वाही या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिरास डोंबिवलीकर व परिसर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात सुमारे ६५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला व विविध तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली व त्या संदर्भात सल्ला घेतला.

    शिबिरात एकूण २५ प्रमुख आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यात नाक-कान-घसा तज्ञ, हाडे-सांधे तज्ञ, नेत्रतज्ञ, दंत तज्ञ, त्वचा तज्ञ, लिव्हरतज्ञ, रक्तदाब तज्ञ, मधुमेह तज्ञ, ईसीजी, फिजीओथेरपी व कायरोथेरपी तपासण्या, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, न्यूरोलॉजी तज्ञ, हृदयरोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ आणि पचनतज्ञ यांचा समावेश होता. तपासणीसाठी या शिबिरात विविध क्षेत्रातील अनुभवी व सुप्रसिद्ध डॉक्टरांनी सहभाग नोंदवला तसेच नागरिकांच्या प्रश्नांवरती योग्य प्रकारे मार्गदर्शनही केले.

    या महाआरोग्य शिबिरास डॉ. राहूल चौधरी, डॉ. राहूल भिरुड, डॉ. निखिल भंगाळे, डॉ. रुचा एन. भंगाळे, डॉ. विशाखा जंगले, डॉ. सुमित फिरके, डॉ. सचिन फेगडे, डॉ. सिद्धेश पाटील, डॉ. हर्षल महाजन, डॉ. निलम एच. महाजन, डॉ. सागर चौधरी, डॉ. तेजस सावदेकर, डॉ. नीरज झांबरे, डॉ. भुवनेश पाचपांडे, डॉ. हिमाली पाचपांडे, डॉ. पंकज लढे, डॉ. कीर्ती लढे, डॉ. अमृता कोल्हे, डॉ. अनिकेत महाजन, डॉ. हितेंद्र पाटील, डॉ. विनया महाजन, डॉ. मनोज लोखंडे, डॉ. हरीश साळुंखे, डॉ. समीर लाड व राहूल चौधरी फाउंडेशन समस्त कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेऊन समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.**शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, आयोजक मंडळी तसेच सहभाग घेणारे नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

    या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री हर्षल भंगाळे, श्री अतुल महाजन, श्री किरण राणे, श्री सोहम कोल्हे, श्री आकाश धांडे, श्री दीपक पाटील, श्री मनोज महाजन, श्री संजय नेमाडे, श्री प्रवीण चौधरी, श्री मदन चौधरी, श्री तेजस चौधरी, श्री भावेश भोळे, श्री दिगंबर पाटील, श्री सुभाष राणे, श्री सतीश लोखंडे, श्री चेतन महाजन, श्री प्रफुल्ल पाटील, श्री चेतन महाजन, श्री विवेक राणे, श्री चेतन कोल्हे, श्री जीवन कोल्हे, श्री रोहित अत्तरदे, श्री सतीश कोल्हे, श्री योगेश पाटील, श्री हर्षल पाटील, श्री जितेश सावदेकर, सौ वैशाली फालक, सौ नयना धांडे, सौ माधुरी महाजन, सौ कविता पाटील, सौ मनीषा भंगाळे, सौ मेघना राणे, सौ मनीषा नेमाडे, सौ कीर्ती बोरोले तसेच संपूर्ण लेवा यूथ फोरम व लेवा समाज पाटीदार मंडळ डोंबिवलीचे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.