Blog

  • “एन.के. नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये योगदिन उत्साहात साजरा” “योग शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जागवली आरोग्यप्रेमाची भावना”

    “एन.के. नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये योगदिन उत्साहात साजरा” “योग शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जागवली आरोग्यप्रेमाची भावना”

    एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल, शारदा नगर, भुसावळ या शाळेत दिनांक .21/06/2025 रोजी सकाळी ठिक 7.30 वाजता शाळेच्या आवारात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख म्हणून योगा शिक्षक क्षीरसागर,संस्थेचे सेंक्रेटरी पी.व्ही. पाटील,शाळेच्या, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.


    योगा शिक्षक क्षीरसागर यांनी विदयार्थ्यांना ताडासन, वृक्षासन,भद्रासन, अर्घचकासन,वज्रासन,शशांकासन, त्रिकोणासन, भ्रामरी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक केले.सुर्यनमस्काराचे महत्व सांगितले. शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे योगा. यामुळे आपले शरीर शेवटपर्यंत चांगले राहते.


    शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका सहभागी होवुन उत्साहाने त्यांनी योग, प्राणायम, ध्यान केले. आभारप्रदर्शन पुनम भोळे यांनी केले.

  • भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर वसाहत येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आर्ट ऑफ लिविंग शिक्षक श्री. अशोक धांडे व श्री. कुणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. संतोषजी वकारे, प्रभारी मुख्य अभियंता प्रकल्प यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक श्री. जाधव, कल्याण अधिकारी श्री. वासुदेव, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी, अभियंते, अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता, श्री. खुरपे, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ श्री. मोराळे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

  • रेल्वे क्रीडांगणावर हजारो नागरिकांनी केला केंद्रीय , राज्यमंत्री व  इतर अधिकारी वर्गासोबत सामूहिक योगाभ्यास

    रेल्वे क्रीडांगणावर हजारो नागरिकांनी केला केंद्रीय , राज्यमंत्री व इतर अधिकारी वर्गासोबत सामूहिक योगाभ्यास

    आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ११ वा वर्धापनदिन “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य” या संकल्पनेनुसार भव्य उत्साहात रेल्वे क्रीडांगण, भुसावळ रेल्वे स्थानकासमोर येथे सकाळी ७.०० वाजता साजरा करण्यात आला.

    या योग कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

    कार्यक्रमात केंद्र शासन निर्देशित कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास पार पडला. या भव्य कार्यक्रमात केंद्रीय राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशजी महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आणि भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्यासह विविध अधिकारी, रेल्वे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

    योगासारखा प्राचीन आणि प्रभावी शारीरिक-मानसिक आरोग्याचा मार्ग जगभर पोहोचवण्यासाठी भारत सरकार आणि स्थानिक प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार प्रशंसनीय ठरला.

  • आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

    आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

    एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ७ व्या अंतराष्ट्रीय रोलर रिले चैम्पियनशिप थायलंड स्पर्धा दिनांक १८जुन २०२५ ते १९ जुन २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये भारत रशिया, थायलंड सह अन्य देशातील स्केटर यांनी सहभाग घेतला होता या अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष वयोगटांतील इनलाईन व क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमी चा स्केटर व एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने दोन सुवर्णपदक मिळविले व रिले मॅच मध्ये तिन रजत पदक मिळवून तो विजयी झाला व त्याला एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड यांच्या वतीने ट्राफी देण्यात.

    या निवडीमध्ये त्याचे कोच पियुश दाभाडे सर दिपेश सोनार सर अंतराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्याला मार्गदर्शन केले एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केले आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजयी झाल्याबद्दल त्याचे केंद्रिय क्रिडा मंत्री रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयभाऊ सावकारे आमदार राजुमामा भोळे खासदार स्मिताताई वाघ व भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी फोन वरुन अभिनंदन केले तिर्थराज पाटील च्या तळवेल व भुसावळ येथिल घरी आंनदी वातावरण आहे तो त्याचे कोच व वडिलांसह दि २१जून रोजी रात्री १वा भारतात परत येणार आहे व २२ जून रोजी भुसावळ मध्ये येणार आहे.

  • अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

    अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

    एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ७ व्या अंतराष्ट्रीय रोलर रिले चैम्पियनशिप थायलंड स्पर्धा दिनांक १८जुन २०२५ ते १९ जुन २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये भारत रशिया, थायलंड सह अन्य देशातील स्केटर यांनी सहभाग घेतला होता या अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष वयोगटांतील इनलाईन व क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमी चा स्केटर व एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने दोन सुवर्णपदक मिळविले व रिले मॅच मध्ये तिन रजत पदक मिळवून तो विजयी झाला व त्याला एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड यांच्या वतीने ट्राफी देण्यात

    या निवडीमध्ये त्याचे कोच पियुश दाभाडे सर दिपेश सोनार सर अंतराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्याला मार्गदर्शन केले एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केले आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजयी झाल्याबद्दल त्याचे केंद्रिय क्रिडा मंत्री रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयभाऊ सावकारे आमदार राजुमामा भोळे खासदार स्मिताताई वाघ व भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी फोन वरुन अभिनंदन केले तिर्थराज पाटील च्या तळवेल व भुसावळ येथिल घरी आंनदी वातावरण आहे तो त्याचे कोच व वडिलांसह दि २१जून रोजी रात्री १वा भारतात परत येणार आहे व २२ जून रोजी भुसावळ मध्ये येणार आहे.

  • १००० वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पुण्यदर्शन जळगावकरांसाठी आज जळगावमध्ये ऐतिहासिक धार्मिक सोहळा; सामूहिक १.०८ लाख जाप आणि रुद्र पूजा

    १००० वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पुण्यदर्शन जळगावकरांसाठी आज जळगावमध्ये ऐतिहासिक धार्मिक सोहळा; सामूहिक १.०८ लाख जाप आणि रुद्र पूजा

    जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक व अध्यात्मिक पर्वणी घेऊन येत आहे. १००० वर्षांपूर्वीचे प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग जळगावमध्ये आज रोजी दर्शनासाठी येणार आहे. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग जळगाव आणि ओंकारेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

    आज १,०८,००० ‘ॐ नमः शिवाय’ जाप व रुद्र पूजेचा भव्य धार्मिक सोहळा पार पडणार असून, भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    स्वयंसेवकांची जोशात तयारीभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता या दिव्य सोहळ्यासाठी अनेक स्वयंसेवक जोरदार तयारीला लागले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग, मंदिर परिसर, व्यवस्थापन यांनी भक्तांच्या स्वागतासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.संपूर्ण शहरात शिवलिंगाच्या दर्शनाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. स्वयंसेवक घरोघरी जाऊन याबाबत प्रचार प्रसार करत आहेत,प्रत्येक जण “हर हर महादेव” म्हणत या पावन क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

    वेळ: संध्याकाळी ४ वाजेपासून पुढे

    स्थळ: ओंकारेश्वर मंदिर, जळगाव

    अधिक माहितीसाठी संपर्क:डॉ. रंजना बोरसे – 9823246246 अर्चना राणे – 9766184641

  • चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप

    चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप

    काल दिनांक 17/06/2025 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त भिलमाळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ते 4, चा 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यात 200 पेजेस दोनशे वही, 100 पेजेस 200 वही, 200 रजिस्टर, 150 पेन, रबर, कंपास बॉक्स ,कलर पेन, श्रपणार आदि साहित्य चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन चे अध्यक्ष विक्की मेश्राम, सल्लागार होमगार्ड अधिकारी सुरेश इंगळे,विशाल दादा सुर्यवंशी सल्लागार रवींद्र तांबे, सल्लागार आनंद मामा हुसळे, पत्रकार राजेश तायडे, सदस्य सुरेश सोनवणे, सोनू वाघमारे, प्रमोद पगारे, रविराज पारधे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावाचे पोलीस पाटील रमेश पवार सर, यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापिका माधुरी पाटील मॅडम यांनी केले

    कोणालाही शैक्षणिक साहित्य देऊन गरीब विद्यार्थी यांचे मदत करायची असेल तर या नंबर वर संपर्क करावे,9922784403

  • चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप

    चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप

    काल दिनांक 17/06/2025 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त भिलमाळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ते 4, चा 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यात 200 पेजेस दोनशे वही, 100 पेजेस 200 वही, 200 रजिस्टर, 150 पेन, रबर, कंपास बॉक्स ,कलर पेन, श्रपणार आदि साहित्य चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन चे अध्यक्ष विक्की मेश्राम, सल्लागार होमगार्ड अधिकारी सुरेश इंगळे,विशाल दादा सुर्यवंशी सल्लागार रवींद्र तांबे, सल्लागार आनंद मामा हुसळे, पत्रकार राजेश तायडे, सदस्य सुरेश सोनवणे, सोनू वाघमारे, प्रमोद पगारे, रविराज पारधे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावाचे पोलीस पाटील रमेश पवार सर, यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापिका माधुरी पाटील मॅडम यांनी केले

  • जॅक्सनव्हिल में 16 जून ‘श्री श्री रविशंकर शांति और स्वास्थ्य दिवस’ घोषित

    जॅक्सनव्हिल में 16 जून ‘श्री श्री रविशंकर शांति और स्वास्थ्य दिवस’ घोषित

    ऐतिहासिक घोषणा और सम्मान समारोह :- अमेरिका के फ्लोरिडा राज्य के जॅक्सनव्हिल शहर ने 16 जून को ‘श्री श्री रविशंकर शांति और स्वास्थ्य दिवस’ के रूप में घोषित किया है। यह घोषणा जैक्सनविल की मेयर डोना डीगन ने नॉर्थ फ्लोरिडा यूनिवर्सिटी में आयोजित एक विशेष समारोह के दौरान की। इस कार्यक्रम में स्वयं श्री श्री रविशंकर भी मौजूद थे। यह ऐतिहासिक निर्णय उनके सामाजिक, आध्यात्मिक और वैश्विक शांति के लिए किए गए योगदान को सम्मानित करने के उद्देश्य से लिया गया है।

    आर्ट ऑफ लिविंग का वैश्विक योगदान:- श्री श्री रविशंकर द्वारा स्थापित “आर्ट ऑफ लिविंग” संस्था विश्वभर में योग, ध्यान, तनावमुक्त जीवन और मानवता के मूल्यों के प्रचार-प्रसार में कार्यरत है। संस्था के कार्यक्रमों के माध्यम से लाखों लोगों के जीवन में सकारात्मक परिवर्तन आया है। जैक्सनविल शहर ने उनके इसी योगदान की सराहना करते हुए यह दिन समर्पित करने का निर्णय लिया है, जिससे समाज में शांति और स्वास्थ्य को लेकर जागरूकता फैले।

    दुनिया का 32वां शहर बना जैक्सनविल :- जैक्सनविल ऐसा करने वाला दुनिया का 32वां शहर बन गया है, जिसने श्री श्री रविशंकर के योगदान को सार्वजनिक रूप से स्वीकारा और उनके नाम पर विशेष दिवस घोषित किया। अब हर वर्ष 16 जून को जैक्सनविल में ‘शांति और स्वास्थ्य दिवस’ मनाया जाएगा, जिससे आने वाली पीढ़ियों को भी शांति, सेवा और समरसता के मार्ग पर चलने की प्रेरणा मिलेगी।

  • भुसावळातील गुणवंतांचा एकत्रित गौरव: ‘एक क्षण गौरवाचा’ मा. ना. वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न आईदादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    भुसावळातील गुणवंतांचा एकत्रित गौरव: ‘एक क्षण गौरवाचा’ मा. ना. वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न आईदादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त“आई दादा प्रतिष्ठान” व “भाजप अनुसूचित जाती मोर्चा, भुसावळ” यांच्या संयुक्त विद्यमाने “एक क्षण गौरवाचा 2025” हा विशेष सन्मान सोहळा भुसावळ तालुक्यात आयोजित करण्यात आला.

    या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, क्रीडा, साहित्य, कला, व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

    कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय सावकारे यांच्या हस्ते गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    “एक क्षण गौरवाचा 2025” या उपक्रमातून भुसावळ परिसरातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिक्षक, क्रीडापटू, साहित्यिक, व समाजसेवक यांचे योगदान ओळखून त्यांना समाजात नवे बळ व प्रोत्साहन देण्याचा उद्देश यशस्वीपणे पूर्ण झाला.

    प्रसंगी भुसावळ चे माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे,भाजप शहराध्यक्ष किरण कोलते,संदीप सुरवाडे, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील,गोलू पाटील, नागेश्वर साळवे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा यांची उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक राहुल वसंत तायडे,आयोजक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी प्रेमचंद तायडे,संतोष ठोकळ,रविंद्र दाभाडे,विक्की गोहर, गणेश जाधव,राकेश सपकाळे,दिपक गायकवाड नरेश खंडारे,दिपक सोनवणे,दिनेश बालूरे,आकाश आव्हाड,भरत उमरिया,संजय नरवाडे,रवि घुले,वाल्मिक पवार,अश्विन नरवाडे,अजय तायडे यांच्यासह संजिवनी महिला मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.