मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक असलेल्या भुसावळ जंक्शनने यंदाच्या उन्हाळ्यात अभूतपूर्व विक्रम केला आहे. ४४४ एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचे यशस्वी नियोजन व संचालन करून भुसावळने महाराष्ट्रातील एकमेव स्थानक म्हणून ४०० हून अधिक गाड्या हाताळण्याचा टप्पा पार केला आहे.
हे यश केवळ तांत्रिक व प्रशासकीय कौशल्याचे प्रतीक नाही, तर या स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबईपासूनचे ४४४ कि.मी अंतर याच आकड्यात सामावले असल्यामुळे, या संख्येचे एक वेगळेच प्रतीकात्मक महत्त्व निर्माण झाले आहे.
देशातील सर्वाधिक वर्दळीच्या टॉप ५ जंक्शन्सपैकी भुसावळचा समावेश यामुळे निश्चित झाला आहे. यामागे Team Bhusawal चा समर्पणभाव, आणि मध्य रेल्वेच्या नेतृत्वाचे कुशल व्यवस्थापन या घटकांचे मोलाचे योगदान आहे.भुसावळ स्थानक हे केवळ एक ट्रान्झिट पॉइंट नसून, आता रेल्वेच्या गती, प्रगती आणि समन्वयाचे एक तेजस्वी प्रतीक बनले आहे.

Leave a Reply