गणेश कॉलनीत आषाढी एकादशीनिमित्त संगीत संध्या भक्तिमय वातावरणात संपन्न

” सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया” या अभंगाने सुरवात करत गणेश कॉलनी येथे संगीत संध्या कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.

भुसावळ शहरातील नेत्रतज्ञ डॉ.नितु पाटील यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांच्या राहत्या घरी रात्री संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध अभंग, भक्ती गीत, गवळण आदी सादर करत परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध करण्यात आले. सदर कार्यक्रम हा माऊली भजनी मंडळ भुसावळ यांच्यातर्फे करण्यात आला. कार्यक्रम संपत असताना पावसाचे हजेरी झाली तरी कुठलाही भाविक हा जागा सोडण्यास तयार नव्हता.

अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण होऊन सर्व परिसरातील नागरिक हे हे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ओलीचिंब झाले होते.

माऊली भजनी मंडळातील सर्वश्री सतीश जंगले, प्रकाश पाटील, मिलिंद कोल्हे ,प्रभाकर उखर्डू झांबरे, सतीश मराठे, प्रमोद बोरोले ,भास्कर खाचणे, सुनील सूर्यवंशी,गणेश सरोदे ,अशोक नेहते ,संजीव चौधरी व प्रमोद चौधरी हे उपस्थित होते.

यावेळी अनुष्का पाटील,वेदांत पाटील,दुर्वांग पाटील,तारुष ढाके,प्रणव ढाके यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी परिसरात भाविक उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *