भुसावळ शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीचा स्केटर व एन.के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील याने थायलंड येथे झालेल्या ७ व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशिप २०२५ मध्ये आपले कौशल्य सिद्ध करत दोन सुवर्णपदक व तीन रजत पदकांची कमाई केली.
ही स्पर्धा १८ जून ते १९ जून २०२५ दरम्यान बँकॉक, थायलंड येथे एम. टी. एल. इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केटिंग व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, रशिया, थायलंडसह आणखी सात देशांच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.
तीर्थराजने ८ वर्षांखालील वयोगटातील इनलाईन व क्वाड स्केटिंगमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. शिवाय रिले मॅचमध्ये त्याने तिन रजत पदकांची कमाई करून आपले स्थान भक्कम केले. या घवघवीत यशामुळे त्याला आयोजकांच्या वतीने ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजयभाऊ सावकारे यांनी त्याचे खास अभिनंदन करून भुसावळचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवल्याबद्दल त्याचे कौतुक केले.

Leave a Reply