आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फैजपूरमध्ये महारक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे विकास पुरुष मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भव्य “महारक्तदान शिबीर” आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अमोल जावळे उपस्थित होते.त्यांनी स्वतः रक्तदान करत समाजात एक सकारात्मक संदेश दिला.

शिबिरात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.आ. अमोल जावळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,”रक्तदान हे केवळ आरोग्यदायी नव्हे, तर समाजप्रती असलेली कर्तव्य भावना दर्शवते. असे उपक्रम म्हणजेच खरी लोकसेवा.”

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *