तापी महाआरतीस प्रारंभ – सूर्यकन्या तापीभक्त परिवाराचा उपक्रम

भुसावळ येथे सूर्यकन्या तापी मातीच्या महाआरतीस प्रारंभ करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातून जाणारी जगातील पहिली नदी तापी आणि तिचा सभोवतालचा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे . त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी जलप्रदूषण होते वृक्षांची कत्तल सुद्धा होत आणि याच्यावर प्रशासनाच अंकुश नाही.

एकीकडे गुजरात मध्य प्रदेश मध्ये तसेच महाराष्ट्रातील शहादा प्रकाशा येथे तापी नदीचा मोठ्या प्रमाणात आरती व इतर विविध सेवा करून सन्मान केला जातो दररोज त्या ठिकाणी विविध घाटांवरती डोळ्यांचे पाळणे फेडणारी अशी सामूहिक आरती केली जाते .

तेथील प्रशासन तापी नदी घाटाच्या विकासासाठी तसेच तापी परिसराच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने तेथील जनतेला सोबत घेऊन त्या ठिकाणचा विकास करीत आहेत. मात्र भुसावळ शहरात प्रशासन याबाबत प्रचंड उदासीन आहे.

तापी महात्म्य खूप मोठ आहे आणि म्हणून तापीची महती समस्त भक्तांना कळावी तसेच तापी नदीत आणिपरिसरात होणारे प्रदूषण निवारण ,तापी नदी परिसर स्वच्छता, सुशोभीकरणासाठी तसेच तापी घाटांची निर्मिती साठी प्रयत्न करून इतर अध्यात्मिक ,धार्मिक , सामाजिक कार्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामूहिक रित्या भुसावळ येथील तापी नदीची महाआरतीस प्रारंभ करण्यात आलेला आहे.

या आरती मध्ये विविध सामाजिक, अध्यात्मिक संस्था संघटना तसेच इतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले जनतेला सोबत घेऊन महाआरतीचा क्रम कायम सुरू ठेवणार आहे .यासाठी सूर्यकन्या तापी महाआरती भक्त परिवार असा एक समूह तयार करण्यात आलेला आहे. आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी तापी नदीवरील महादेव घाटावर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे, सकल लेवा सखी मंडळाच्या अध्यक्षा भोरगाव रगाव पंचायत च्या पंच सौ मंगला पाटील, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, बापू दादा महाजन दिलीप टाक ,हिंदु जागरण मंचचे कैलास सिंग चव्हाण ,साहित्यिक संध्या भोळे मॅडम, गोकुळ सरोदे जगन्नाथ अत्तरदे , शालिनी राणे प्रगती पाटील नेहा रुळकर यांचे सह इतर भाविक उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *