जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन मान्यतेने आणि भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय ज्युनिअर (14, 16, 18, 20) व 23 वयोगट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा २२ ऑगस्ट, शुक्रवार सकाळी ८.३० वा. भुसावळ रेल्वे ग्राऊंड येथे पार पडणार आहेत. जिल्ह्यातील विविध वयोगटातील मुलं-मुली या अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.ना. संजयजी सावकारे (वस्त्रोद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सौ. रजनीताई संजय सावकारे (अध्यक्ष, प्रतिष्ठा महिला मंडळ) व श्री. संदीपभाऊ सुरवाडे (शहराध्यक्ष, भाजपा भुसावळ उत्तर) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धांमुळे जळगाव जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आपली क्रीडा क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, स्पर्धेच्या तयारीला अंतिम टप्पा आला आहे.

Leave a Reply