श्रीराम मित्र मंडळ कुऱ्हे पानाचे तर्फे आयोजित शिव जयंती वकृत्व स्पर्धेने परिसरात एक वेगळाच उत्साह निर्माण केला. पोवाडा गायन,विविध वकृत्व व काव्यात्मक प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि आपल्या भाषण कौशल्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेतील विजयी
(मोठा गट)
अनिकेत कौतिक राजोळ
प्रथम
20 mark भाषण
प्रेरणा सुनिल धोटे
प्रथम
20 mark पोवाडा
पुर्वा प्रविण बडगुजर
यश नारायण सपकाळे
द्वितीय
18 mark भाषण
ज्ञानदा उमेश बडगुजर
द्वितीय
19 mark पोवाडा
मानवी प्रविण बिलवाड
तृतीय
18 mark गीत
लहान गट
हिंदवी विश्वास पाटील
प्रथम (भाषण)
गणेश योगेश बोबडे
द्वितीय (भाषण)
विरेंद्र सुनिल सपकाळे
रिध्दी सतिष पाटील
तृतीय
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धांचा आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्पर्धेने परिसरातील नागरिकांमध्ये देखील सकारात्मक वातावरण निर्माण केले. अनेकांनी आपल्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे उत्साहीपणे स्वागत केले.
शिव जयंतीच्या उपलक्ष्याने घेतलेल्या या कार्यकमाने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्जवल करण्याचा एक महत्त्वपूर्ण पायंडा ठरला.
कार्यक्रमात वक्ते श्री मयूरजी देशमुख ऑर्डनन्स फॅक्टरी ,वरणगाव म्हणून तर प्रमुख पाहुणे आर ए पाटील सर आणि योगेश गांधेले सर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला, असे आयोजकांनी सांगितले.


Leave a Reply