पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमातून नवीन तीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यात नागपूर (अजनी) – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस चा समावेश आहे. भुसावळ स्टेशनवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थित राहून या गाडीचे स्वागत केले व पुणे दिशेने हिरवा झेंडा दाखवला.
पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार असून अवघ्या १२ तासांत हा प्रवास पूर्ण होईल. सध्या या मार्गावरील सर्वात जलद गाडी हावडा-दुरांतो असून तिला १२ तास ५५ मिनिटे लागतात. वंदे भारत त्यापेक्षा एक तास आधी गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.
जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकाळच्या मागणीनंतर रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प यशस्वी केला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक पुनित अग्रवाल तसेच महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply