वृक्षसंवर्धनाचा आदर्श समोर ठेऊन वाढदिवस साजरा: विजय नारायण कोळींच्या संकल्पनेतून साकरीत जनता हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

‘एक पेड मा के नाम’ या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत व राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाला हातभार लावत, आज जनता हायस्कूल साकरी येथे एक विशेष वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे विशेषत्व म्हणजे, विद्यार्थी विजय नारायण कोळी याचा वाढदिवस प्रकृतीच्या सेवेसाठी समर्पित करत वृक्षारोपण करण्यात आले. विजय नारायण कोळी आणि त्याचे सहकारी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात तसेच गावातील विविध ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावली.

या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळी साकरीकर, उप पर्यवेक्षक राजपूत सर, वानखेडे सर, सुपे सर, देवयानी नेहेते मॅडम, तसेच विद्यार्थी रोशन तायडे, हेमांशु महाजन, यश फेगडे, प्रतीक फेगडे, मनिष पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान राजपूत सर यांनी सांगितले की, “विजय कोळी दरवर्षी आपल्या वाढदिवशी वा कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपण करत असतो, हे कौतुकास्पद आहे.”

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजवण्याचा आणि समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा वृक्षारोपण उपक्रम इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, विजय कोळी याचे अभिनंदन होत आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *