राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भुसावळ येथील पतंजली जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विशेष मासिक सभेचे आयोजन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष श्री. टी. यस. बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. श्री. प्रकाश विसपुते, श्री. राजेंद्र बावस्कर, श्री. नामदेवराव बोरसे आणि अध्यक्ष बावस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुणे श्री. वैभव पाटील यांनी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायासाठीचे कार्य, शिक्षण प्रसार आणि बहुजन हिताय घेतलेले निर्णय याबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी शाहू महाराजांचा आदर्श आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
सभेचे सुरळीत संचालन सतीश अकोले यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. भागवत पाटील यांनी केले. या कार्यक्रमास ७५ ते ८० सभासदांची उपस्थिती होती.संपूर्ण वातावरणात शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि सामाजिक समतेचा संदेश अनुभवता आला.

Leave a Reply