भुसावळ शहरातील भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा- आयोजक हिंदू घोष गृप भुसावळ

खडका रोडवरील जागृत हनुमान मंदिर, हिंदू घोष ग्रुप आणि पाटील मळा व परिसरातील भाविकांच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव २०२५ चे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. ११ आणि १२ एप्रिल रोजी हा उत्सव शहरात पारंपरिक श्रद्धा, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्य याचे दर्शन घडवणार आहे. हा उत्सव केवळ धार्मिक न राहता संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा, प्रेरणा देणारा आणि सद्भावनेचा संदेश देणारा आहे.

कार्यक्रमाची सुसज्ज आखणी

खडका रोडवरील जागृत हनुमान मंदिर, हिंदू घोष ग्रुप, पाटील मळा, भुसावळ यांच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे भुसावळ शहरातील सर्वांत भव्य दिव्य श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीचा सोहळा ११ आणि १२ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला आहे. आयोजकांनी सर्व हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:

११ एप्रिल, शुक्रवार सायंकाळी ७ वाजता भजन संध्या

१२ एप्रिल, शनिवार सकाळी ५ वाजता महापूजा

सकाळी ७ वाजता संगीतमय सुंदरकांड पारायण

११ वाजता महाआरती आणि

११.३० पासून महाप्रसाद तसेच याच दिवशी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा व मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून, हा सोहळा शहरवासीयांसाठी आध्यात्मिक आणि एकात्मतेचा उत्सव ठरणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण:जागृत हनुमान मंदिर, खडका रोड, पाटील मळा, भुसावळ

हिंदू समाजासाठी एकत्रतेचा संदेश

या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाज एकत्र येऊन धर्म, संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडवतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग असून, अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर अतिथी व श्रद्धावान भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आयोजकांचे भाविकांना आवाहन:

सर्व भक्तगणांनी या पवित्र सोहळ्यात आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून, हनुमान जन्मोत्सव साजरा करावा व हनुमंताचा आशीर्वाद घ्यावा.

जाहिरात 👇

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *