महाराष्ट्र राज्य महावितरण महिला व पुरुष कबड्डी संघ 46 वी ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कबड्डी टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी हिमाचल प्रदेश, शिमला येथे 27 ते 29 एप्रिल दरम्यान रवाना होत आहे. या संघात कोल्हापूर, रत्नागिरी, कल्याण, मुंबई, नागपूर, अकोला, मुख्यालय मुंबई आणि जळगाव येथील खेळाडूंना संधी मिळाली असून, भुसावळचे गौरव असलेले जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय कबड्डीपटू श्री. चेतन पाटील यांचाही समावेश आहे.या निमित्ताने भुसावळ रेल्वे स्थानक येथे जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. वरुण इंगळे, सचिव श्री. प्रकाश सावळे तसेच संपूर्ण मंडळ, खेळाडू व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत चेतन पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.
ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कबड्डी स्पर्धेसाठी चेतन पाटील हिमाचल रवाना – जय मातृभूमी क्रीडा मंडळातर्फे भव्य निरोप समारंभ

Leave a Reply