पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी “आनंदाची वारी” या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील असंख्य भाविकांसह एक विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली.
भुसावळला निघण्यापूर्वी जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय ते विश्वकर्मा चौक या मार्गावर पारंपरिक पायी दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाचा जयघोष करत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अध्यात्मिक वारीचा एक भाग होण्याचे भाग्य मिळाल्याची भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. “ही वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर अध्यात्मिक एकात्मतेचा उत्सव आहे,” असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply