हनुमान जन्मोत्सव हा दिवस प्रभू श्रीरामाचे परमभक्त व शक्ती, भक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक भगवान हनुमान यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा, भजन, कीर्तन आणि सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले जाते.
याच पार्श्वभूमीवर, हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक भव्य संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले आहे. हे आयोजन 12 एप्रिल 2025 रोजी, सायं. 7.30 वाजता, संतोषीमाता बहुउद्देशीय हॉल शेजारील क्रिडांगणावर होणार आहे.
या संगीतमय कार्यक्रमात भक्तीमय वातावरणात सामूहिकरित्या हनुमान चालीसा पठण होणार असून, श्रद्धेने आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा हा क्षण सहभागींसाठी निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन विश्वहिंदु परिषद, क्रीडा भारती, जय मातृभूमी क्रिडा मंडळ, आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, श्रीराम व हनुमान भक्तांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात 👇



Leave a Reply