आमोदे तालुका यावल येथे गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५ रोजी घनश्याम काशीराम विद्यालय, आमोदे येथे विद्यार्थ्यांसाठी संविधान विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. समाजातील विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणारी संस्था अनुलोम च्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी, विद्यार्थ्यांना संविधान आणि त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.मार्गदर्शक म्हणून ॲड.गुंजन वाघोदे सर यांनी संविधानाची निर्मिती, त्याची गरज, तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये याविषयी सखोल माहिती दिली. याप्रसंगी सर्वप्रथम ॲड. गुंजन वाघोदे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे व संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले संविधान निर्मितीचा प्रवास दाखवणारी एक व्हिडिओ स्लाइड देखील यावेळी दाखवण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी बोठे यांनी संविधानाची माहिती प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अनुलोम संस्थेचे भाग जनसेवक खेमचंद्र धांडे उपस्थित होते. तसेच, विद्यालयाचे माजी विद्यार्थी निलेश महाजन यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी ॲड. गुंजन वाघोदे यांचा सत्कार इयत्ता दहावीचे विद्यार्थी कु.प्रज्ञा भंगाळे,ऐश्वर्या चौधरी ,जय कोळी, मनोज चिखले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.पी. पिंपरकर सर यांनी केले. या मार्गदर्शन सत्रातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि आपली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply