राज्य सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत कियारसिंग बारेला यास कांस्यपदक

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे दिनांक २१ ते २३ जून २०२५ दरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सादर केले.

या स्पर्धेत जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि फॉरेस्ट विभागात सेवारत असलेल्या कियारसिंग बारेला यांनी पोल व्हॉल्ट (बांबू उडी) प्रकारात ३.०० मीटर उडी मारून तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या रोहित पाटील याने ४.४० मीटर उडीसह पटकावला,द्वितीय क्रमांक नाशिकच्या उत्कर्ष देशपांडे याने ४.०० मीटर उडीसह मिळवला,तर जळगावच्या कियारसिंग बारेला यांनी ३.०० मीटर उडी मारून तृतीय क्रमांक पटकाविला .

या यशाबद्दल कियारसिंग बारेला यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या यशाचे विशेष अभिनंदन जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे अध्यक्ष आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार राजुमामा भोळे, जिल्हा थलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके, चेअरमन प्रा. एम. वाय. चव्हाण, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्रा. इकबाल मिर्झा, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महानगरपालिका क्रीडा समिती सदस्य नितीन बर्डे, तसेच विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी केले आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेली ही स्पर्धा महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरली असून, पुढील राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड प्रक्रियेसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *