आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी वरणगाव येथे श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे वरणगाव येथील समस्त नाभिक समाजाला श्री संत सेना महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या प्रसंगी वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नितु पाटील, तुकाराम पाटील, वरणगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष कमलेश येवले, उपाध्यक्ष श्रीराम सणांसें, खजिनदार रवी पवार, सचिव संतोष रेलकर, सदस्य रवींद्र शिवरामे, गणेश बोलनारे, सुधाकर शिवरामे, राजेंद्र आंबटकर, जंगो न्हावी, तसेच जय डिजिटलचे संचालक राहुल भाऊ माळी आणि वासुदेव नेत्रालयातील सर्व सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात संत सेना महाराज यांचा प्रसिद्ध अभंग गाऊन भाविकांना वैराग्य, विवेक आणि सद्विचारांचा संदेश देण्यात आला :
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।। चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
या पुण्यतिथी निमित्ताने संत परंपरेचे स्मरण करत समाजात एकता, सेवाभाव आणि अध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply