पोळा_श्रमदेवतेची पूजा करूया संकल्प करूया आपल्या शेतातील निसर्गाकडून त्यांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचे जतन करून पर्यावरणाचा समतोल साधूया- डॉ.सुरेंद्रसिंग पाटील

आज आपणास अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या कायम कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करत श्रम करणाऱ्या श्रमदेवतेचा दिवस म्हणजेच बैलपोळा .

शेतकरी त्यांना सर्जा राजा म्हणता बैलांचे म्हणजे सर्जा राजाचे शेतकऱ्यांवर अनंत उपकार असतात व तो आयुष्यभर ते फेडू शकत नाही. जसे आपण गाडीविना राहू शकत नाही तसेच आता मोबाईल विना राहू शकत नाही त्याचप्रमाणे बैलाविना शेतकरी शेती करू शकत नाही.

शेतकऱ्यांबरोबर कायम कष्ट करणाऱ्या श्रमदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येतो. शेतकरी आपल्या या सर्जा राजासाठी या दिवशी सर्व कामे बंद ठेवतो. या सर्जा राजाची आंघोळ करून त्यांचे शिंग रंगवून तसेच संपूर्ण शरीर अलंकाराने सजवून मनोभावे या श्रमदेवतेची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.

या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते . शेतामध्ये बैल जोडी शेतकरी कामानिमित्त घेऊन जातो तेव्हा त्यांचे दरवर्षी निसर्गाकडून निर्माण होणारे खाद्य म्हणजे बांधावरील गवत शेतामधील शेतकऱ्यांनी बांध कमी कमी करत क्षेत्र वाढवले त्याचप्रमाणे बांधावर असलेल्या गवतावर फवारणी करत त्यांचा नायनाट होत आहे.

शेतांमध्ये विश्रामासाठी झाडांची संख्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी विकल्यामुळे कमी झाली डोंगर टेकड्यांवरही तशीच परिस्थिती आहे वनविभागाकडून टेकड्यांवर झाड लावण्यात येतात काही ठिकाणी गवताचा नायनाट करण्यात येतो. या सर्व गोष्टींचा पर्यावरण संतुलावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतातील गवत व झाडे बांध कायम ठेवण्याचे काम करत होते तसेच एकमेकांच्या शेतामध्ये पाणी इकडून तिकडे जात नव्हते टेकड्यांवरील गवत टेकड्यांचा अस्तित्व कायम ठेवून होते गवत जिवंत राहणे हा पर्यावरणाचा मुख्य घटक आहे पर्यावरण मित्र डॉ र सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान उन्हाळ्यामध्ये आपणास गवत दिसत नाही जेव्हा पावसाळा सुरू होतो त्याच्या पहिले जो पाऊस होतो त्या पावसात गवताची निर्मिती होते त्यामुळे गवतांच्या मुळा या पावसाळ्यात माती वाहू देत नाही तसेच गुरांना निसर्गाकडून खाद्य उपलब्ध होते जरी गुरे गवत खात असले तरी मुळे कायम राहतात व पुन्हा पुन्हा गवत त्यावर येत राहते त्यामुळे गवत जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे

आज पोळ्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांनी श्रमदेवतेस साक्षी ठेवून बांध बंधारे टेकडे कायम ठेवून त्यावर कुठलीही फवारणी करणार नाही तसेच विविध प्रकारची फळझाडे शेतामध्ये लावण्याचा संकल्प करूया व निसर्गाने जो समतोल सर्व जीवसृष्टीसाठी ठेवलेला आहे तो कायम ठेऊया. व आपले श्रम कमी करत आपल्या या सर्जा राजाला जिवंतपणी कत्तलखान्यात देणार नाही हे वचन देऊया.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *