आज जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील शेकडो वारकरी भुसावळ रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशी निमित्त मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले.
सदर विशेष गाडी क्रमांक ०११५९ ही केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मंजूर झाली.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून, वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा. संजय सावकारे, रेल्वे भुसावळ मंडळ व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, तसेच भाजप-महायुती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
ही विशेष गाडी दिनांक ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून प्रस्थान करून, ६ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे.त्यानंतर, ६ जुलै रोजी रात्री ९.०० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल व ७ जुलै रोजी भुसावळ येथे आगमन होईल.
या गाडीतील सर्व जनरल तिकीटांची स्वखर्चाने खरेदी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली असून ती सेवा पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे.
गाडीमध्ये चढणाऱ्या वारकऱ्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून, उत्साहात वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
गाडीतील सर्व भाविकांनी आनंदाने गजर करत प्रवास सुरू केला.गाडीत पुरेशा सुविधा, रेल्वे सुरक्षा कर्मचारी, आणि विशेष सेवक कार्यरत होते.

Leave a Reply