रक्षाबंधनानिमित्त देवभाऊंसाठी लाडक्या बहिणींकडून राख्यांचे संकलन,बोदवड येथे भारतीय जनता पक्षाचा उपक्रम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने जनतेसाठी, विशेषतः महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर, आज रक्षाबंधन सणानिमित्त बोदवड येथील पदाधिकाऱ्यांसोबत प्रभाग क्र. ८ आणि बूथ क्र. २७८ मधील महिलांनी लाडक्या देवभाऊंसाठी दिलेल्या राख्यांचे संकलन करण्यात आले.

बहिणीचे रक्षण करणे, तिच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे भावाचे कर्तव्य असते. आज देवभाऊ आमच्यासाठी लाडकी बहीण योजना, अर्धे तिकीट योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे आमची मदत करत आहेत, त्यामुळे आमचे असंख्य आशीर्वाद त्यांना आहेत, असे महिलांनी सांगितले.

या प्रसंगी प्रत्येकीने एक राखी जमा करून त्याचे पॅकेट भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. सर्व लाडक्या बहिणींनी दिलेल्या या राख्या देवभाऊंपर्यंत पोहोचतील, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.

या वेळी तालुका अध्यक्ष अमोलदादा देशमुख, प्रभाकरदादा पाटील, मधुकरदादा राणे, भरदअप्पा पाटील, अमोलदादा शिरपुरकर, पवनदादा जैन, संदीपदादा पारधी, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई कुलकर्णी, संजयदादा अग्रवाल, अनिताताई अग्रवाल, उषाताई पाटील, कविताताई जैन, रोहिणीताई पाटील, राजूदादा पाटील, अभिषेकदादा झाबक, रोहितदादा अग्रवाल, राजेंद्रदादा डाबसे, विजयदादा चौधरी, पंकजदादा चांदोरकर, उमेशदादा पाटील, रामदादा आहुजा, धनराजदादा सुतार, भागवतदादा टिकारे, संतोषदादा चौधरी, गजाननदादा शेळके, परमेश्वरदादा टिकारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *