Category: Blog

Your blog category

  • तापी आरती व पूजन सोहळा उत्साहात संपन्न

    तापी आरती व पूजन सोहळा उत्साहात संपन्न

    भुसावळ शहरात आज सूर्यकन्या तापी माता जन्मोत्सव निमित्त आयोजित “तापी महाआरती व पूजन” कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

    {स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने, कोणत्याही संस्थेचा, जातीचा, किंवा पक्षाचा झेंडा न लावता फक्त “संस्कृती हाच अजेंडा”} या भावनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध घटकांतील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक महाआरती केली.

    तापी नदीच्या काठावर पार पडलेल्या या पूजनात महिलांचा व तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला. शंखध्वनी, पारंपरिक पद्धतीने आरती सादर करण्यात आली. अनेक श्रद्धाळूंनी दिवे प्रज्वलित करून तापी माता पूजनात सहभाग नोंदविला.

    या उपक्रमाचे सर्व समन्वयक श्री. मंगेश पि. भावे ,श्री.राहुल संगीता रमेश सोनटक्के, श्री. हरीश अनिल लोखंडे सौ. मंगला पाटील, सौ.प्रभावती पाटील, सौ.स्वाती भोळे, सौ.मेघा कुरकुरे, सौ.वैशाली चौधरी,सौ.विजया निकम यांनी सांगितले की, “तापी नदी केवळ पाण्याचा स्रोत नाही, ती आपली संस्कृती आहे. तिचा सन्मान आणि संवर्धन आपल्या कर्तव्याचा भाग आहे. तसेच सकल भुसावळ वासियांन तर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार असून तापी मातेची साप्ताहिक आरती करून नदी पात्र व परिसरातील साफ सफाईचे करण्याचा संकल्प आज सर्वांनी केला आहे.

    ” कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री निलेश लाखोटे, श्री सुधीर मायकल, दीपक तिवारी, यश इंगळे, साई गोसावी व असे अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे योगदान लाभले. उपस्थितांनी भविष्यातही अशा अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सगळ्यांचा सहभाग असेल..!!

  • DRM भुसावळ यांचा पारस स्थानक दौरा – विकासकामांचा घेतला आढावा

    DRM भुसावळ यांचा पारस स्थानक दौरा – विकासकामांचा घेतला आढावा

    भुसावळ रेल्वे विभागाच्या DRM (मंडळ रेल्वे व्यवस्थापक) यांनी आज परस स्थानकाला भेट देत विकासकामांची सविस्तर पाहणी केली.

    दौऱ्यादरम्यान DRM यांनी पॅनल रूम, गुड्स शेड आदी विभागांची प्रगती तपासून घेतली. त्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत रेल्वे सेवा, सुविधा आणि अडचणी याबाबत थेट माहिती घेतली.

    या वेळी अनेक प्रवाशांनी स्थानक स्वच्छता, जलसुविधा आणि तिकीट खिडकी व्यवस्थेवर आपली मते मांडली.DRM यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानकाच्या विकासासाठी सर्व गरजांनुसार कामे गतीने सुरु असून लवकरच प्रवाशांना उत्तम सेवा उपलब्ध होईल.

  • “तापी माई जन्मोत्सव: सूर्यकन्या तापी माईस अर्पण होणार दीपसागर – दीपोत्सवाची जय्यत तयारी

    “तापी माई जन्मोत्सव: सूर्यकन्या तापी माईस अर्पण होणार दीपसागर – दीपोत्सवाची जय्यत तयारी

    भुसावळ शहराच्या श्रद्धेचं प्रतीक असलेली तापी नदी, ही केवळ एक जलवाहिनी नसून शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाची शुद्ध मूर्त प्रतिमा मानली जाते.

    याच सूर्यकन्या तापी माईचा जन्मोत्सव यंदा २ जुलै २०२५, बुधवार रोजी महादेव घाट, तापी नदी किनारी भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

    या विशेष सोहळ्याचं आयोजन समस्त भुसावळकर नागरिकांच्या पुढाकारातून करण्यात आलं आहे. कार्यक्रमात तापी नदी पूजन, महाआरती आणि दीपोत्सवाचे आयोजन असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेलं असेल.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार असून, आयोजकांनी नागरिकांना आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

    कार्यक्रमाचे ठिकाण: तापी माई, महादेव घाट, भुसावळ बुधवार, २ जुलै २०२५वेळ सकाळी ११ वाजल्यापासून

    कार्यक्रमाचे समन्वयक मंगेश पि. भावे (९५९५८४८०४३) व हरीश अ. लोखंडे (९०९६६१९९६४) हे असून, त्यांनी सांगितले की “तापी माई ही आपल्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. तिच्या सन्मानार्थ साजरा होणारा हा सोहळा एक सामाजिक एकतेचं आणि संस्कृतीचं प्रतीक ठरणार आहे.”

  • जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात

    जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात

    जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे दरवर्षी विविध वयोगटात ॲथलेटिक्स खेळात उत्कृष्ठ कामगिरी करणारे खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात त्यात खेळाडूची गत वर्षाची कामगिरी लक्षात घेतली जाते सन २०२४-२०२५ या वर्षाचे जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा आज शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संपन्न झाला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी आप्पासाहेब डॉ.नारायण खडके तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, इकरा एज्युकेशन सोसायटीचे एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांदखान पठाण, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील यांची उपस्थिती होती.

    सन २०२४-२०२५ चे पुरस्कार सिनियर गटातून दिनेश किसन पाटील (पारोळा), महाविद्यालयीन गटातून कुलदिप छोटू पाटील (चोपडा), ज्युनियर गटातून भूमिका सुनिल महाजन (रावेर), शालेय गटातून प्रितेश ईश्वर सोनवणे (जामनेर) तर उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार सत्यनारायण राहुल पवार (जळगाव) यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट भेट देवून गौरविण्यात आले अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी डॉ.नारायण खडके यांनी सदर पुरस्कार हे नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून जिल्ह्यात ॲथलेटिक्स खेळासाठी पोषक निर्मितीसाठी उपयुक्त असे आहे असे विचार व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांची महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच नुकत्याच पुणे येथे झालेल्या राज्य सिनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्याचा खेळाडू कियारसिंग मुवाशा बारेला याने पोल व्हॉल्ट (बांबूउडी) क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविल्याबद्दल सन्मानचिन्ह व ट्रॅकसूट भेट देवून सन्मान करण्यात आला.

    याप्रसंगी मुख्याध्यापक विकास पाटील, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक सचिन महाजन, मुख्याध्यापिका कांचन नारखेडे यांचेसह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील सचिव प्रा.हरीश शेळके जिल्ह्यातील सर्व तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी खेळाडू ,पालक व क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव प्रविण पाटील यांनी केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

  • भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष लवकरच जाहीर होणार; रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर

    भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष लवकरच जाहीर होणार; रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर

    भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर लवकरच नवा नेता विराजमान होणार असून, या शर्यतीत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं.

    सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपकडे देशभरात 14 कोटींपेक्षा अधिक सक्रिय सदस्यसंख्या असून, पक्षसंघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय परिषद निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नियुक्ती पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली आहे.भाजपच्या सूत्रांनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यानंतर, पक्षाने रवींद्र चव्हाण यांना जानेवारी 2025 मध्ये प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. आता त्यांची स्थायी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता प्रबळ आहे.

    रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघाचे चार वेळा आमदार असून, सध्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.बावनकुळे यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2025 मध्ये संपत असल्याने पुढील अध्यक्ष कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • “धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील यांचे प्रेरणादायी मनोगत

    “धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील यांचे प्रेरणादायी मनोगत

    लोखंडाचा गंज हाच लोखंडाला मारत असतो तर चंदन जेवढं घासलं तेवढा तो सुहास प्रदान करतो,त्यामुळे लोखंडासारखं गंजत रहायचं की चंदनासारखं उजळायचं,हे तुम्हीच ठरवा.प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार शाररिक व्यायाम करायलाच हवा, असे प्रतिपादन डॉक्टर तुषार पाटील यांनी आज केले.

    ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, सहसचिव संजीव चौधरी,उपाध्यक्ष भानुदास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.तुषार पाटील उपस्थित होते. जळगाव जिह्यातील एकमेव डॉ. ज्यांनी सलग 4 वेळा साऊथ आफ्रिका मधील सर्वात प्राचीन कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. ही शर्यत विक्रमी वेळात पूर्ण करत पदकांची हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान त्यांना मिळाला असल्याने संघातर्फे शाल,स्मृती चिन्ह देत सत्कार करण्यात आला.

    डॉक्टर म्हणाले की मी खाजगी रुग्णसेवा भुसावळला सुरू केल्यावर जसजसा रुग्णांनाचा प्रतिसाद वाढत गेला तसे शरीराकडे दुर्लक्ष होत गेले . त्यामुळे मला उच्च रक्तदाब, स्थूलपणा,डोकेदुखी आदी विविध आजार वाढत गेले. नुसत्या चालण्याने अपेक्षित असे यश मिळत नव्हते. मग हळू हळू धावायला सुरुवात केली व बघता बघता १०, १५ ते अगदी २१ किलोमीटर धावण्यात यश मिळवले. तो आलेख वाढतच गेला.

    यावेळी जेष्ट नागरिकांच्या विविध आरोग्य समस्या विषयी डॉक्टरांनी चर्चासत्र भरवत सर्व सभासदांचे समाधान केले.

    यावेळी अशोक ढाके,धनराज पाटील, भानुदास पाटील, नरेंद्र महाजन,पंडित शिरतुरे,सोपान नेमाडे, सुनील सूर्यवंशी,दीपक चौधरी, प्रकाश पाटील, एन.डी माळी, दत्तात्रय चौधरी,एच.डी इंगळे, रजनी राणे,रजनी तळेले, प्रमिला धांडे, छबुबाई झांबरे भास्कर खाचणे आदींचे वाढदिवसानिमित्ताने डॉ. तुषार पाटील यांच्या हस्ते उपरणे आणि बुके देत सत्कार करण्यात आले.

    कार्यक्रमाची प्रस्तावना श्री प्रकाश पाटील, प्रमुख पाहुणे परिचय डॉ.नितु पाटील आणि आभार प्रदर्शन सतीश जंगले यांनी मांडले.कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

  • चेतन जैन यांना उद्योग आणि समाजसेवेतील योगदाना बद्दल गौरव – क्रांतीसूर्य शूरवीर महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समिती भुसावळ व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग यांचा उपक्रम

    चेतन जैन यांना उद्योग आणि समाजसेवेतील योगदाना बद्दल गौरव – क्रांतीसूर्य शूरवीर महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समिती भुसावळ व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग यांचा उपक्रम

    क्रांतीसूर्य शूरवीर महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समिती भुसावळ व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील यशस्वी उद्योजकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

    या सोहळ्यात उद्योजकता क्षेत्रातील भुसावळ येथील, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते चेतन जैन यांची कार्याची दखल घेऊन माननीय श्रीमती शीलाभाभीसा सुखदेवसिंह गोगामेडी(राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्षऻ श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना भारत) यांच्या शुभहस्ते चेतन जैन यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    सर्व शहरवासीयांसाठी हा क्षण गौरव पूर्ण व आनंदाचा होता.सदर कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे,पाचोरा चे विद्यमान आमदार माननीय किशोर अप्पा पाटील साहेब, श्री परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन जी महाराज फैजपूर,श्री योगेंद्र सिंह कटार व राजपूत समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.

    उत्सव समिती, व मित्रपरिवाराकडून चेतन जैन यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

    म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

    भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी.मेढे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी क्रीडा शिक्षक बी. एन. पाटील होते. प्रसंगी शाळेचा सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, डॉ. प्रदीप साखरे, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी,विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पतंजली जेष्ठ नागरिक संघात अभिवादन कार्यक्रम संपन्न

    छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पतंजली जेष्ठ नागरिक संघात अभिवादन कार्यक्रम संपन्न

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भुसावळ येथील पतंजली जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विशेष मासिक सभेचे आयोजन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष श्री. टी. यस. बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

    कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. श्री. प्रकाश विसपुते, श्री. राजेंद्र बावस्कर, श्री. नामदेवराव बोरसे आणि अध्यक्ष बावस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    प्रमुख पाहुणे श्री. वैभव पाटील यांनी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायासाठीचे कार्य, शिक्षण प्रसार आणि बहुजन हिताय घेतलेले निर्णय याबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी शाहू महाराजांचा आदर्श आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

    सभेचे सुरळीत संचालन सतीश अकोले यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. भागवत पाटील यांनी केले. या कार्यक्रमास ७५ ते ८० सभासदांची उपस्थिती होती.संपूर्ण वातावरणात शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि सामाजिक समतेचा संदेश अनुभवता आला.

  • भोळे महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

    भोळे महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संबोधित करीत असताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी सांगितले की राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद, आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला. बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली.

    शाहू महाराजांनी पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केले. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात आले. त्या सोबतच त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा आणि शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या, हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. अशा पद्धतीने शाहू महाराज हे समाजप्रबोधनाचा एक आदर्श मानले जातात. ते विचारवंत समाजसुधारक होते. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले.

    कार्यक्रम प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख प्रा श्रेया चौधरी यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले कीआजच्या काळातील परिस्थती लक्षात घेता आज समाजाला सामाजिक समता, बंधुता आणि समावेश या मूल्यांची आवश्यकता अधिक आहे. म्हणून शाहू महाराजांचा विचार तरुण पिढीने अंगीकारला पाहिजे.

    कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले.

    कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ संजय चौधरी, प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा डॉ गोविंदा वाघुळदे, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा डॉ अंजली पाटील, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा निर्मला वानखेडे, प्रा संगीता धर्माधिकारी, प्रा एस डी चौधरी, प्रा डॉ दयाघन राणे, प्रा एस एस पाटील, प्रा डॉ एस व्ही बाविस्कर प्रा डॉ आर बी ढाके यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अनिल सावळे यांनी केले आभार प्रा डॉ जे बी चव्हाण यांनी मानले.