Category: Blog

Your blog category

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश.. भुसावळ भाजपाने केला जल्लोष

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश.. भुसावळ भाजपाने केला जल्लोष

    महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. या ऐतिहासिक निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

    सदर बातमी मिळताच भुसावळमध्ये भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भाजपाचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी “जय भवानी जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

    कार्यक्रमास भाजपाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, पिंटू कोठारी, निळकंठ भारंबे, प्रवीण इखणकर, ललित मराठे, पुरुषोत्तम नारखेडे, ॲड. बोधराज चौधरी, राजेंद्र आवटे, अजय नागराणी, देवेंद्र वाणी, नितीन धांडे, अनिरुद्ध कुलकर्णी, सागर चौधरी, राहुल तायडे, चेतन बोरोले, शैलेंद्र ठाकरे, रवी ढगे, शंकर शेळके, राजू खरारे, प्रशांत पाटील, गौरव वाघ, चेतन जैन, प्रेमचंद तायडे, गोपी राजपूत, योगेंद्र हरणे, सचिन बऱ्हाटे, दिनेश राणे, पंकज कोलते, बॉबी डॅनियल, गोलू चौधरी, खिलेश महाजन आदींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • गणेश कॉलनीत आषाढी एकादशीनिमित्त संगीत संध्या भक्तिमय वातावरणात संपन्न

    गणेश कॉलनीत आषाढी एकादशीनिमित्त संगीत संध्या भक्तिमय वातावरणात संपन्न

    ” सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया” या अभंगाने सुरवात करत गणेश कॉलनी येथे संगीत संध्या कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.

    भुसावळ शहरातील नेत्रतज्ञ डॉ.नितु पाटील यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांच्या राहत्या घरी रात्री संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध अभंग, भक्ती गीत, गवळण आदी सादर करत परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध करण्यात आले. सदर कार्यक्रम हा माऊली भजनी मंडळ भुसावळ यांच्यातर्फे करण्यात आला. कार्यक्रम संपत असताना पावसाचे हजेरी झाली तरी कुठलाही भाविक हा जागा सोडण्यास तयार नव्हता.

    अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण होऊन सर्व परिसरातील नागरिक हे हे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ओलीचिंब झाले होते.

    माऊली भजनी मंडळातील सर्वश्री सतीश जंगले, प्रकाश पाटील, मिलिंद कोल्हे ,प्रभाकर उखर्डू झांबरे, सतीश मराठे, प्रमोद बोरोले ,भास्कर खाचणे, सुनील सूर्यवंशी,गणेश सरोदे ,अशोक नेहते ,संजीव चौधरी व प्रमोद चौधरी हे उपस्थित होते.

    यावेळी अनुष्का पाटील,वेदांत पाटील,दुर्वांग पाटील,तारुष ढाके,प्रणव ढाके यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी परिसरात भाविक उपस्थित होते.

  • अभाविप आणि मेडिव्हिजनचा उपक्रम : शेंदुर्णीत आषाढी एकादशी निमित्त आरोग्य शिबिर

    अभाविप आणि मेडिव्हिजनचा उपक्रम : शेंदुर्णीत आषाढी एकादशी निमित्त आरोग्य शिबिर

    शेंदुर्णी – आषाढी एकादशीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) शेंदुर्णी व मेडिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रति पंढरपूर” शेंदुर्णी येथे चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

    या उपक्रमात ६८ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने आणि सेवाभावाने आलेल्या वारकऱ्यांची व भाविकांची मोफत आरोग्य तपासणी केली व आवश्यक मार्गदर्शन दिले.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रेमचंद पंडित (वैद्यकीय अधीक्षक, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय), श्री. नितीन झाल्टे (व्यवस्थापन परिषद सदस्य, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), श्री. सिद्धेश्वर लटपटे (प्रांत संघटन मंत्री, देवगिरी प्रांत), डॉ. श्रावणी अवरगंड (राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, अभाविप), श्री. ललित सोनार (प्रांत सहसंयोजक, मेडिव्हिजन), तसेच श्री. गणेश जाधव (शहर मंत्री, शेंदुर्णी) यांच्या उपस्थितीत पार पडला.

    शिबिरात रक्तदाब, साखर तपासणी, जनरल चेकअप यासारख्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

    अभाविप व मेडिव्हिजन यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा तेथे देवसेवा या भावनेने हे शिबिर भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

  • उत्तर-पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स कोटात ५४ पदांची भरती; अर्ज १० जुलैपासून सुरू

    उत्तर-पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स कोटात ५४ पदांची भरती; अर्ज १० जुलैपासून सुरू

    उत्तर-पश्चिम रेल्वे (RRC NWR) कडून २०२५ साठी स्पोर्ट्स कोटा अंतर्गत गट ‘C’ आणि गट ‘D’ मध्ये एकूण ५४ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० जुलै २०२५ पासून सुरू होणार असून १० ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत आहे. जयपूर, अजमेर, जोधपूर व बीकानेर विभागातील ही भरती असून, पात्र खेळाडूंना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

    उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असावे आणि शैक्षणिक पात्रता म्हणून १०वी, १२वी, ITI किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे (पदानुसार). अर्जदाराने १ एप्रिल २०२३ नंतर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असावा. निवड प्रक्रिया अर्ज → कागदपत्र पडताळणी → स्पोर्ट्स ट्रायल →

    वेतनमान ७व्या वेतन आयोगानुसार ₹१८,००० ते ₹५६,९०० पर्यंत असून अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी ₹५०० (त्यातील ₹४०० परत), तर SC/ST/EBC/महिला/मायनॉरिटीसाठी ₹२५० (पूर्ण परत) आहे. अर्ज RRC Jaipur च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://rrcjaipur.in) ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

    वैद्यकीय चाचणी अशा टप्प्यांद्वारे होणार आहे.

  • ४२व्या राज्य रिले स्केटींग स्पर्धा विठ्ठ्ल चषक मध्ये  भुसावळचा तीर्थराज पाटील  सुवर्णपदक विजयी

    ४२व्या राज्य रिले स्केटींग स्पर्धा विठ्ठ्ल चषक मध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

    रोलर रिले फेडरेशन ऑफ महाराष्ट्र आयोजित ४२ व्या राज्य रिले स्केटिंग स्पर्धा विठ्ठल चषक दिनांक ६जुलै २०२५ ला संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बारामती, सोलापूर, नागपुर,पुणे,संभाजीनगर, सांगली सह राज्य भरातुन स्केटर यांनी सहभाग घेतला होता

    या राज्य स्थरीय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष वयोगटांतील क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी व सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमी चा स्केटर तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने रिले मॅच मध्ये एक सुवर्णपदक मिळविले व स्पिड रेस मध्ये रजत पदक मिळवून तो विजयी झाला व आर आर एफ एस आय व संभाजीनगर जिल्हा क्रिडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला

    त्याचे कोच पियुश दाभाडे सर दिपेश सोनार सर यांचा सुद्धा आर आर एफ एस आय चे सचिव अंतराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

    या राज्यस्तरीय विठ्ठल चषक विजयी झाल्याबद्दल जळगाव चे आमदार राजुमामा भोळे खासदार स्मिताताई वाघ व भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी फोन वरुन अभिनंदन केले तिर्थराज पाटील च्या या विजयाने भुसावळ मधिल शिवशक्ती हुडको कॉलनी मध्ये जल्लोष साजरा होत आहे

    अतिशय लहान वयात इतकी चांगली कामगिरी करत असल्यामुळे समाजातील सर्व स्तरावरून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • भुसावळ-पंढरपूर आषाढी विशेष गाडीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे , वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा

    भुसावळ-पंढरपूर आषाढी विशेष गाडीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे , वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा

    आज जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील शेकडो वारकरी भुसावळ रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशी निमित्त मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले.

    सदर विशेष गाडी क्रमांक ०११५९ ही केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मंजूर झाली.

    रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून, वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा. संजय सावकारे, रेल्वे भुसावळ मंडळ व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, तसेच भाजप-महायुती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

    ही विशेष गाडी दिनांक ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून प्रस्थान करून, ६ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे.त्यानंतर, ६ जुलै रोजी रात्री ९.०० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल व ७ जुलै रोजी भुसावळ येथे आगमन होईल.

    या गाडीतील सर्व जनरल तिकीटांची स्वखर्चाने खरेदी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली असून ती सेवा पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे.
    गाडीमध्ये चढणाऱ्या वारकऱ्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून, उत्साहात वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

    गाडीतील सर्व भाविकांनी आनंदाने गजर करत प्रवास सुरू केला.गाडीत पुरेशा सुविधा, रेल्वे सुरक्षा कर्मचारी, आणि विशेष सेवक कार्यरत होते.

  • भुसावळ-पंढरपूर आषाढी विशेष गाडीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे , राज्य मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा

    भुसावळ-पंढरपूर आषाढी विशेष गाडीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे , राज्य मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा

    वारकऱ्यांच्या सेवेसाठी भुसावळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या आषाढी विशेष रेल्वे (गाडी क्र. 01159) ला आज भव्य समारंभात केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री सौ. रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

    या समारंभप्रसंगी कपडा मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. संजय सावकारे, भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) आणि जळगावचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भाविक आणि वारकऱ्यांच्या शुभेच्छा घेऊन रेल्वेने पंढरपूरकडे आपला प्रवास सुरू केला.

    यावर्षी हजारो भाविक या सुविधेचा लाभ घेऊन पंढरपूर वारीसाठी रवाना झाले आहेत. दि. ६ जुलै रोजी रेल्वे पंढरपूरला पोहोचेल आणि रात्री परतीच्या प्रवासासाठी रवाना होईल

  • एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी – शाळेत विठ्ठल-रुक्मिणीची पालखी, टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांचा सहभाग

    एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी – शाळेत विठ्ठल-रुक्मिणीची पालखी, टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांचा सहभाग

    एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल, शारदा नगर, भुसावळ या शाळेत शनिवार दि.05/07/2024 या दिवशी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

    याप्रसंगी संस्थेचे सेंकेटरी पी.व्ही. पाटील, ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे,संस्थेचे सभासद विकास पाचपांडे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे,पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.

    संस्थेचे ऑनररी जॉईंट सेंक्रेटरी मा.श्री.प्रमोद नेमाडे यांच्या हस्ते शाळेत विठठल रुक्मिणी पालखीचे पुजन करण्यात आले. शालेय परीसरातील आवारात दिडी सोहळा काढण्यात आला या दिडी सोहळयोचे ठिकठिकाणी स्वागत व पुजन करुन सर्वांनी पालखीचे दर्शन घेतले.

    शाळेतील विद्याथ्यांनी पारंपारिक वेशभुषा केली होती.विदयार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल, रुक्मिणी यांची वेशभुषा केली होती. विदयार्थ्यांनी टाळांच्या घोषात विठ्ठल नामाचा गजर केला. विदयार्थ्यांनी विठठलावर आधारीत भक्तीगीते गायली तसेच आषाढी एकादशी निमित्त माहिती सांगितली शाळेचे आणि शाळेच्या परीसरातील वातावरण भक्तीमय व उल्हासित दिसत होते. इयत्ता नर्सरी ते ५ वी पर्यतच्या विदयार्थ्यांनी दिंडित सहभाग घेतला.

    शाळेत व शाळेच्या परीसरात जणू काय पंढरपुरच अवतरले असे वाटत होते. शाळेतील शिक्षिका तनुजा चौधरी यानी विठठलाचे अभंग म्हणून वातावरण उत्साहित केलेसंस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे,तसेच संस्थेतील सर्व सभासदातर्फे आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या.

    सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

  • भुसावळहून पंढरपूरसाठी मोफत विशेष रेल्वे; आषाढी एकादशीनिमित्त केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा पुढाकार

    भुसावळहून पंढरपूरसाठी मोफत विशेष रेल्वे; आषाढी एकादशीनिमित्त केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा पुढाकार

    भुसावळ – आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासह जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांसाठी भुसावळहून पंढरपूरकडे मोफत विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे.

    या विशेष ‘अनारक्षित’ रेल्वे गाडीची व्यवस्था केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने करण्यात आली असून, गाडीतील सर्व तिकिटांचा खर्चही त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

    ही विशेष गाडी दि. ५ जुलै २०२५ रोजी भुसावळ येथून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना होणार असून, दि. ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

    वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पंढरपूर वारीचा प्रवास सुखकर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • भारत-घाना संबंधांना नवे वळण, पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान

    भारत-घाना संबंधांना नवे वळण, पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक घाना दौर्‍यामुळे भारत-घाना संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. तीन दशकांनंतर घानाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. अकरा येथील ‘जुबिली हाऊस’मध्ये मोदी आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रमानी महामा यांच्यात द्विपक्षीय उच्चस्तरीय चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांनी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, कृषी, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला.

    या दौऱ्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, पारंपरिक वैद्यकशास्त्र, मानकीकरण आणि परराष्ट्र मंत्रालयांमधील संयुक्त आयोग यांसारख्या चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामुळे दोन्ही देशांतील संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. भारताने डिजिटल पेमेंट (UPI), जन औषधि योजनेचा अनुभव, कौशल्यविकास व लसीकरण क्षेत्रातील सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

    या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना घानाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने – “ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना” सन्मानित करण्यात आले. त्यांनी हा गौरव भारतातील 1.4 अब्ज नागरिकांना, विशेषतः तरुणांच्या आकांक्षांना अर्पण केला आणि असे नमूद केले की हा सन्मान दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्याची जबाबदारी वाढवतो.

    संयुक्त निवेदनात मोदींनी ‘फीड घाना’ योजनेचे कौतुक करताना भारताच्या सहकार्याचे आश्वासन दिले. भारत आयटीईसी आणि आयसीसीआर शिष्यवृत्तीची संख्या दुप्पट करणार असून, घानात कौशल्यविकास केंद्र स्थापन केले जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात सायबर सुरक्षा, नौदल प्रशिक्षण आणि सागरी सहकार्य वाढवण्याचे ठरले आहे.