Category: Blog

Your blog category

  • रक्षाबंधनानिमित्त देवभाऊंसाठी लाडक्या बहिणींकडून राख्यांचे संकलन,बोदवड येथे भारतीय जनता पक्षाचा उपक्रम

    रक्षाबंधनानिमित्त देवभाऊंसाठी लाडक्या बहिणींकडून राख्यांचे संकलन,बोदवड येथे भारतीय जनता पक्षाचा उपक्रम

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने जनतेसाठी, विशेषतः महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर, आज रक्षाबंधन सणानिमित्त बोदवड येथील पदाधिकाऱ्यांसोबत प्रभाग क्र. ८ आणि बूथ क्र. २७८ मधील महिलांनी लाडक्या देवभाऊंसाठी दिलेल्या राख्यांचे संकलन करण्यात आले.

    बहिणीचे रक्षण करणे, तिच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे भावाचे कर्तव्य असते. आज देवभाऊ आमच्यासाठी लाडकी बहीण योजना, अर्धे तिकीट योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे आमची मदत करत आहेत, त्यामुळे आमचे असंख्य आशीर्वाद त्यांना आहेत, असे महिलांनी सांगितले.

    या प्रसंगी प्रत्येकीने एक राखी जमा करून त्याचे पॅकेट भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. सर्व लाडक्या बहिणींनी दिलेल्या या राख्या देवभाऊंपर्यंत पोहोचतील, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.

    या वेळी तालुका अध्यक्ष अमोलदादा देशमुख, प्रभाकरदादा पाटील, मधुकरदादा राणे, भरदअप्पा पाटील, अमोलदादा शिरपुरकर, पवनदादा जैन, संदीपदादा पारधी, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई कुलकर्णी, संजयदादा अग्रवाल, अनिताताई अग्रवाल, उषाताई पाटील, कविताताई जैन, रोहिणीताई पाटील, राजूदादा पाटील, अभिषेकदादा झाबक, रोहितदादा अग्रवाल, राजेंद्रदादा डाबसे, विजयदादा चौधरी, पंकजदादा चांदोरकर, उमेशदादा पाटील, रामदादा आहुजा, धनराजदादा सुतार, भागवतदादा टिकारे, संतोषदादा चौधरी, गजाननदादा शेळके, परमेश्वरदादा टिकारे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • नवीन ३ वंदे भारत एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा

    नवीन ३ वंदे भारत एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमातून नवीन तीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यात नागपूर (अजनी) – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस चा समावेश आहे. भुसावळ स्टेशनवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थित राहून या गाडीचे स्वागत केले व पुणे दिशेने हिरवा झेंडा दाखवला.

    पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार असून अवघ्या १२ तासांत हा प्रवास पूर्ण होईल. सध्या या मार्गावरील सर्वात जलद गाडी हावडा-दुरांतो असून तिला १२ तास ५५ मिनिटे लागतात. वंदे भारत त्यापेक्षा एक तास आधी गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.

    जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकाळच्या मागणीनंतर रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प यशस्वी केला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक पुनित अग्रवाल तसेच महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • भुसावळ भाजप दक्षिणची नवी संघटनात्मक ताकत उभी,मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण

    भुसावळ भाजपच्या स्टार लॉन येथे “संघटन पर्व” कार्यक्रमांतर्गत दक्षिण शहराध्यक्ष किरण भाऊ कोलते यांनी नवीन शहर कार्यकारिणी आणि विविध आघाड्या, मोर्चांच्या शहराध्यक्षांची नावे जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या कार्यकर्त्यांसोबतच काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

    या कार्यकारिणीत २ सरचिटणीस, ६ उपाध्यक्ष, ६ चिटणीस, १ कोषाध्यक्ष अशा एकूण १६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक आणि राजकीय समतोल राखण्यावर भर देण्यात आला आहे. वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजय सावकारे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

    याप्रसंगी मनोज बियाणी, परीक्षित बऱ्हाटे, सतीश सपकाळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    नवीन कार्यकारिणी

    अध्यक्ष – किरण भागवत कोलते

    सरचिटणीस – जयंत सुधाकर माहूरकर, अमोल अरविंद महाजन

    उपाध्यक्ष – रविंद्र जगन्नाथ ढगे, चेतन लीलाधर बोरोले, संतोष रमेश खंडाळे, दिनेश वसंत राणे, पल्लवी अरविंद वारके, हर्षा तुषार जोशी

    चिटणीस – विनीत सुधाकर हंबर्डीकर, गोपिसिंग सुरेंद्रमोहन राजपुत, तुषार चिंतामण ठाकूर, रिता निलेश नाईक, ममता जितेंद्र वारके, वंदना प्रविण सोनार

    कोषाध्यक्ष – प्रशांत सुरेश देवकर

    महिला मोर्चा शहराध्यक्ष – सौ. अनिता ताई आंबेकर

    अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – रविंद्र ओंकार दाभाडे

    नियुक्तीपत्र वितरण करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, “भाजप हे कार्यकर्त्यांचे पक्ष आहे. जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव व नव्या चेहऱ्यांची ऊर्जा एकत्र आल्यास कोणतीही निवडणूक जिंकता येते. भुसावळ दक्षिण संघटन मजबूत असून आगामी निवडणुकीत चांगले यश मिळेल असा विश्वास आहे.”

  • अभाविप भुसावळ शाखेकडून पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

    अभाविप भुसावळ शाखेकडून पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

    भुसावळ – दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधनाच्या पावन दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) भुसावळ शाखेच्या वतीने शहरातील पोलिस बांधवांना राखी बांधून सण साजरा करण्यात आला.

    हा उपक्रम भुसावळ पोलिस ठाण्यात पार पडला. समाजातील रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस दलाला सन्मान देण्यासाठी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी राखीचा पवित्र धागा बांधून त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    यावेळी अभाविप भुसावळ शहर मंत्री कु. वैष्णवी कोळी तसेच विद्यार्थिनी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सामाजिक आणि भावनिक संदेश अधिक दृढ झाला.

  • अभाविप भुसावळ शाखेकडून पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

    अभाविप भुसावळ शाखेकडून पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

    भुसावळ – दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधनाच्या पावन दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) भुसावळ शाखेच्या वतीने शहरातील पोलिस बांधवांना राखी बांधून सण साजरा करण्यात आला.

    हा उपक्रम भुसावळ पोलिस ठाण्यात पार पडला. समाजातील रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस दलाला सन्मान देण्यासाठी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी राखीचा पवित्र धागा बांधून त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    यावेळी अभाविप भुसावळ शहर मंत्री कु. वैष्णवी कोळी तसेच विद्यार्थिनी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सामाजिक आणि भावनिक संदेश अधिक दृढ झाला.

  • रक्षाबंधन भाऊ-बहिणीचआपुलकीच नात कायम ठेवणारा सण  त्यासाठी वृक्ष असणे गरजेचे- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    रक्षाबंधन भाऊ-बहिणीचआपुलकीच नात कायम ठेवणारा सण त्यासाठी वृक्ष असणे गरजेचे- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाची पूजा करून राखी बांधत असते त्या राखीला जो दोरा असतो तो बांधून कायमस्वरूपी रक्षा करण्याचं वचन भावाकडून घेत असते. तसेच भाऊ निरोगी राहून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी ईश्वरास विनंती करते. दोघा बहिण भावांना एकमेकांची काळजी असते. हिंदू धर्मात बहीण भावाचं नातं पवित्र असतं.

    बहिण आणि त्यांच्या मुलांना मामाच्या गावाला येण्याची खूप मोठी गोडी असते सद्यस्थितीत वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात गर्मी असते त्यामुळे त्यांना बाहेर मैदानी खेळ खेळता येत नाही तरीसुद्धा काही वेळेस ते आजारी पडतात पूर्वी बहुसंख्य ठिकाणी गावरान आंब्याची झाड होती त्यामुळे उन्हाळ्यात तर मजाच मज्जा होती प्रत्येक गावाबाहेर चिंचेची झाड होती आता त्या झाडांची संख्या नसल्यात जमा आहे ज्याप्रमाणे झाडांना झोके बांधले जात संपूर्ण श्रावण महिना अक्षय तृतीया दिवाळी विविध सणांना झाडांना झोके बांधून सर्वजण झोके खेळत व मनमुराद आनंद लुटत आता सद्यस्थितीत घराबाहेर झोके बंगई नैसर्गिक हवेसाठी बांधलेले असतात

    सद्यस्थितीत काही कारणास्तव दीर्घ काळापासून असलेली मोठ मोठी झाडे काटावी लागत आहे व नवीन झाडे कमी प्रमाणात लागत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल डामा डोल झालेला आहे त्यामुळे वातावरणात खूप गर्मीच वातावरण असल्यामुळे ते झोके धूळ खात पडलेले आहे . प्रत्येकाला आपली बहीण तिच्या मुलांबरोबर आपल्या माहेरी यावी तसेच आपल्या बहिणीला सुद्धा त्यांच्या ननंद व त्यांचे मुलं तिच्या घरी थोडे दिवस थांबण्यासाठी यासाठी विविध प्रकारचे फळ फुलांचे तसेच ऑक्सिजनयुक्त टिकाऊ वृक्ष लावणे गरजेचे आहे. एक पेड माँ के लिये अभियान 2 त्याच्यातही आपला सहभाग दिसेल

    डॉ .सुरेंद्रसिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान तसेच निसर्गासही पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे आहे सर्वांना निरोगीआरोग्यासाठी संगोपणासहित वृक्ष लावणे गरजेचे आहे शक्यतो आपल्या बालपणी म्हणजे लग्नापूर्वी घरातील सर्व सदस्यांनी काही वर्षे आधी जर वृक्ष लावले तर आपणास झाडांना झोके बांधता येतील घरातील वातावरण शुद्ध राहील व निसर्गातील मोकळी हवा सर्वांना मिळेल ज्यांना भाऊ नाही त्यांनी वृक्षदेवतेला आपला भाऊ म्हणून राखी बांधावी वृक्ष देवता सावलीच्या रूपात आपल्याबरोबर राहील सद्यस्थितीत फार मोठ्या प्रमाणात काही कारणास्तव वृक्षांची संख्या कमी होऊन आपणास फार मोठे संकटास सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपण निसर्गाचे काही देणे लागतो वृक्ष लागवडीत लक्ष दिल्याने आपणास कुठलीही उणीव भासणार नाही व अनपेक्षित रित्या काही ना काही प्रमाणात आपली निसर्गास मदत होईल .

  • एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्षाबंधन व संस्कृत दिन उत्साहात साजरा

    एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्षाबंधन व संस्कृत दिन उत्साहात साजरा

    भुसावळ – एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूल, शारदा नगर, भुसावळ येथे आज दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आणि संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

    रक्षाबंधनाचा सण विद्यार्थ्यांमध्ये बंधु-भगिनीच्या नात्याचे महत्व अधोरेखित करणारा असून, यानिमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधत भावनिक आणि सांस्कृतिक नात्याची अनुभूती दिली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले.

    रक्षाबंधनाच्या औचित्याने शाळेत “राखी बनविणे स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या कलागुणांचे सुंदर दर्शन घडवले.

    या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी श्री. पी. व्ही. पाटील, ऑनरेरी जॉईंट सेक्रेटरी श्री. प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, सभासद श्री. विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोल्हे आणि पर्यवेक्षिका सौ. राखी बढे यांची उपस्थिती लाभली होती.

    तद्नंतर शाळेत संस्कृत दिन देखील साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘सुरस सुबोधा’ हे संस्कृत गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. या प्रसंगी संस्कृत शिक्षिका सौ. तनुजा चौधरी यांनी “संस्कृत भाषा : काळाची गरज” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सण आणि संस्कृती यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाती जपण्याचे आणि मातृभाषेचा सन्मान राखण्याचे मूल्य दृढ झाले.

  • पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर,१२ तासांत पुणे ते नागपूरचा प्रवास शक्य

    पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर,१२ तासांत पुणे ते नागपूरचा प्रवास शक्य

    पुणे आणि नागपूर दरम्यान देशातील अत्याधुनिक आणि वेगवान अशी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस १० ऑगस्टपासून धावणार आहे. या नव्या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा मिळाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    या गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे भुसावळ स्टेशनवरील समारंभात उपस्थित राहणार आहेत.

    भुसावळ-जळगाव परिसरातील प्रवाशांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावर ‘वंदे भारत’ सुरू करण्याची मागणी होती. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला असून, ही जलदगती सेवा सुरु होणार आहे

    ही गाडी पुणे-नागपूर (अजनी) हे अंतर फक्त १२ तासांत पूर्ण करणार आहे. सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वात वेगवान गाडी असून, तीच अंतर पूर्ण करण्यासाठी १२ तास ५५ मिनिटे लागतात. मात्र वंदे भारत या तुलनेत एक तास कमी वेळात नागपूरला पोहोचणार आहे.

    वेळापत्रक पुढीलप्रमाणे: पुणे ते नागपूर (26101)पुणे प्रस्थान: सकाळी ६:२५. जळगाव आगमन: १२:३५. भुसावळ आगमन: १:०५. नागपूर (अजनी) आगमन: संध्याकाळी ६:२५

    नागपूर ते पुणे (26102)नागपूर (अजनी) प्रस्थान: सकाळी ९:५०. भुसावळ आगमन: २:५५. जळगाव आगमन: ३:२६. पुणे आगमन: रात्री ९:५०

    या गाडीला दौड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबा असणार आहे.

    या नव्या वंदे भारत सेवेमुळे नागपूर-पुणे प्रवास अधिक आरामदायक, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या सेवेमुळे व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय: १४ ऑगस्टपासून शाळांमध्ये पसायदान अनिवार्य

    मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय: १४ ऑगस्टपासून शाळांमध्ये पसायदान अनिवार्य

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून रोज सकाळी पसायदानाचे सामूहिक पठण अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ३१ जुलै रोजी सर्व शाळांना आदेश दिले असून, उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाला पत्र पाठवले आहे. अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद व संस्थात्मक शाळांनाही हे पठण बंधनकारक असेल.

    गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त झेंडावंदन, प्रभातफेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला समाजातील सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आधीच अनेक शाळांनी तयारी सुरू केली आहे. काही शाळांनी आदेश मिळताच पसायदानाचे पठण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय जीवनापासूनच संस्कार घडावेत, अध्यात्मिक मूल्ये रुजावीत आणि राष्ट्रभक्तीची भावना वाढावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

  • वकिली, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील यशाबद्दल ॲड. अभिजीत मेने यांचा सत्कार “समाजाची थाप प्रेरणा देणारी” – ॲड. अभिजीत मेने

    वकिली, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील यशाबद्दल ॲड. अभिजीत मेने यांचा सत्कार “समाजाची थाप प्रेरणा देणारी” – ॲड. अभिजीत मेने

    ब्राह्मण संघ भुसावळतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात वकिली, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे ॲड. अभिजीत अजय मेने यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम दि. 5 ऑगस्ट रोजी ब्राह्मण संघ सभागृहात पार पडला

    या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुषमा खानापूरकर होत्या. व्यासपीठावर ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, उपाध्यक्ष गजानन जोशी, सचिव महेंद्र गोडबोले, सहसचिव सुनील पाठक, कोषाध्यक्ष आमोद टेंभुर्णीकर व अंतर्गत हिशेब तपासणीस भालचंद्र जोशी उपस्थित होते. समाज बांधव, भगिनी व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

    ॲड. मेने यांचा डॉ. खानापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ॲड. मेने म्हणाले, “समाजाने दिलेली ही कौतुकाची थाप माझ्या खांद्यावर सकारात्मक प्रेरणा देणारी आहे. मी अजून जोमाने व मेहनतीने वकिली, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत राहील.”

    ब्राह्मण संघाने गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या समाजातील व्यक्तींचा या कार्यक्रमात गौरव केला.