Category: Blog

Your blog category

  • ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे नाभिक समाज मंडळाला संत सेना महाराज यांची प्रतिमा भेट

    ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे नाभिक समाज मंडळाला संत सेना महाराज यांची प्रतिमा भेट

    आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी वरणगाव येथे श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे वरणगाव येथील समस्त नाभिक समाजाला श्री संत सेना महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

    या प्रसंगी वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नितु पाटील, तुकाराम पाटील, वरणगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष कमलेश येवले, उपाध्यक्ष श्रीराम सणांसें, खजिनदार रवी पवार, सचिव संतोष रेलकर, सदस्य रवींद्र शिवरामे, गणेश बोलनारे, सुधाकर शिवरामे, राजेंद्र आंबटकर, जंगो न्हावी, तसेच जय डिजिटलचे संचालक राहुल भाऊ माळी आणि वासुदेव नेत्रालयातील सर्व सहकारी उपस्थित होते.

    कार्यक्रमात संत सेना महाराज यांचा प्रसिद्ध अभंग गाऊन भाविकांना वैराग्य, विवेक आणि सद्विचारांचा संदेश देण्यात आला :

    आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।। चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

    या पुण्यतिथी निमित्ताने संत परंपरेचे स्मरण करत समाजात एकता, सेवाभाव आणि अध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला.

  • मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय क्रीडा महोत्सव

    मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय क्रीडा महोत्सव

    पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय क्रीडा महोत्सव देशभर आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाबाबतची आढावा बैठक केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

    या बैठकीस राज्याचे क्रीडा मंत्री मा. माणिकराव कोकाटे ऑनलाइन मंत्रालयातून सहभागी झाले. बैठकीला विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, विविध राज्यांचे क्रीडा मंत्री, सचिव व अधिकारी उपस्थित होते.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला गती देण्यासाठी क्रीडा क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी या महोत्सवात जिल्हा, विद्यापीठ, महाविद्यालय व स्टेडियम स्तरावर क्रीडा स्पर्धा, वादविवाद, चर्चासत्रे, योग, बुद्धिबळ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    यात तज्ज्ञ व क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा सहभागही राहणार असून, ३१ ऑगस्ट रोजी देशभर सायकलिंग उपक्रमाद्वारे या महोत्सवाचा समारोप होईल. महाराष्ट्र राज्य खेळ व खेळाडूंमध्ये नेहमीच अव्वल स्थान राखेल, असा विश्वास क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केला.

  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भुसावळ शहर कार्यकारिणी जाहीर

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भुसावळ शहर कार्यकारिणी जाहीर

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळ शाखेची शैक्षणिक वर्ष 2025-26 ची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत प्रा. स्मिता बेंडाळे यांची शहराध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली असून, शहरमंत्री पदाची धुरा गायत्री पाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

    या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून देवगिरी प्रदेश सहमंत्री डॉ. वरूनराज नन्नावरे तसेच विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नवीन कार्यकारिणीने व्यक्त केला.

  • अनुलोम संस्थेतर्फे घनश्याम काशीराम विद्यालय आमोदे येथे संविधान मार्गदर्शन

    अनुलोम संस्थेतर्फे घनश्याम काशीराम विद्यालय आमोदे येथे संविधान मार्गदर्शन

    आमोदे तालुका यावल येथे गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५ रोजी घनश्याम काशीराम विद्यालय, आमोदे येथे विद्यार्थ्यांसाठी संविधान विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. समाजातील विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणारी संस्था अनुलोम च्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

    यावेळी, विद्यार्थ्यांना संविधान आणि त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.मार्गदर्शक म्हणून ॲड.गुंजन वाघोदे सर यांनी संविधानाची निर्मिती, त्याची गरज, तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये याविषयी सखोल माहिती दिली. याप्रसंगी सर्वप्रथम ॲड. गुंजन वाघोदे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे व संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले संविधान निर्मितीचा प्रवास दाखवणारी एक व्हिडिओ स्लाइड देखील यावेळी दाखवण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.

    सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी बोठे यांनी संविधानाची माहिती प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

    या कार्यक्रमाला अनुलोम संस्थेचे भाग जनसेवक खेमचंद्र धांडे उपस्थित होते. तसेच, विद्यालयाचे माजी विद्यार्थी निलेश महाजन यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी ॲड. गुंजन वाघोदे यांचा सत्कार इयत्ता दहावीचे विद्यार्थी कु.प्रज्ञा भंगाळे,ऐश्वर्या चौधरी ,जय कोळी, मनोज चिखले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.पी. पिंपरकर सर यांनी केले. या मार्गदर्शन सत्रातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि आपली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  • भोळे महाविद्यालयात अँटी रॅगिंग कायदा साक्षरता सप्ताह साजरा

    भोळे महाविद्यालयात अँटी रॅगिंग कायदा साक्षरता सप्ताह साजरा

     

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास समिती अंतर्गत अँटी रॅगिंग सेल मार्फत अँटी रॅगिंग कायदा साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी जळगांव विभाग प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ राजू फालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राचार्य डॉ राजू फालक – अँटी रॅगिंग कायदा म्हणजे महाविद्यालये, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग (छळ, त्रास देणे, मानसिक/शारीरिक अत्याचार करणे) थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी केलेली नियमावली व शिक्षांचे प्रावधान यावर सविस्तर मार्गदर्शन दिले आहेसुप्रीम कोर्टाचे निर्णय निर्देशानुसार रॅगिंग हा गंभीर गुन्हा मानला जातो.

    शैक्षणिक संस्था व कॉलेज प्रशासनावर जबाबदारी आहे की रॅगिंग रोखावी, त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात, युजीसी (UGC) नियमावली 2009, भारतीय दंड संहिता (IPC) नुसार लागू होणारे कलम, शिक्षा व परिणाम सांगितले थोडक्यात, अँटी रॅगिंग कायदा हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, मान मर्यादेसाठी व आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणासाठी कठोर उपाययोजना करणारा कायदा आहे यावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले.

    यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ संजय चौधरी, प्रा एस डी चौधरी, रासेयो अधिकारी प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा श्रेया चौधरी, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा संगीता धर्माधिकारी, प्रा एस एस पाटील, सुनील ठोसर हे उपस्थित होते.

  • भोळे महाविद्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ कार्यक्रम संपन्न

    भोळे महाविद्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ कार्यक्रम संपन्न

    भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त प्राचार्य डॉ राजू फालक, समाजसेवक प्रवीणभाऊ भोळे, न्यायाधीश संजय बुंधे, यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्तीची शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

    यावेळी सर्व प्रा डॉ संजय चौधरी, रा से यो अधिकारी प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा श्रेया चौधरी, प्रा एस डी चौधरी, प्रा एस एस पाटील, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा संगीता धर्माधिकारी, प्रा निर्मला वानखेडे, प्रा जागृती सरोदे, प्रा डॉ अंजली पाटील, प्रा गायत्री नेमाडे, प्रा कामिनी चौधरी, प्रा डॉ राजेश ढाके, प्रा डॉ जी पी वाघुळदे, प्रा दीपक जैस्वार, पराग पाटील, युवराज चौधरी, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे, मिलिंद नेमाडे, ललित झोपे प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, सुधाकर चौधरी, विजय पाटील, दीपक महाजन उपस्थित होते

  • एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘गोपाळकाला’ उत्साहात साजरा

    एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘गोपाळकाला’ उत्साहात साजरा

    शारदा नगर येथील एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘गोपाळकाला’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही. पाटील, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सभासद मा. श्री. विकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे व पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होते.

    सर्व मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक दहीहंडी फोडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मान्यवरांनी दहीहंडी फोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

    शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्णांच्या जीवनचरित्राविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शिक्षक धनश्री महाजन, रुही बासीत, तनुजा चौधरी, कीर्ती वाघोदे व नम्रता गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  • अहिल्यादेवी कन्या विद्यालय 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

    अहिल्यादेवी कन्या विद्यालय 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

    भुसावळ येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

    ध्वजारोहण कार्यक्रम संस्थेच्या चिटणीस श्रीमती उषाताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.

    सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तदनंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, झेंडा गीत ,समूह गीत बँडच्या तालावर सादर करण्यात आले त्यानंतर विद्यार्थिनींनी विविध मनोरे व कवायत सादर केल्या.

    नंतर सर्व विद्यार्थिनींनी, पालकांनी शिक्षकांनी तंबाखूमुक्त अभियाना ची शपथ घेतली.. त्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम ,स्वातंत्र्य दिन चिरायू हो वो आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

    ध्वजारोहण समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

  • प्रत्येक शाळांनी पर्यावरण संतुलनासाठी पर्यावरण जनजागृती रॅलीचे आपापल्या गावात आयोजन करणे गरजेचे:- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    प्रत्येक शाळांनी पर्यावरण संतुलनासाठी पर्यावरण जनजागृती रॅलीचे आपापल्या गावात आयोजन करणे गरजेचे:- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपणास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तसेच अनेक स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी जीवावर उदार होत ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते. ज्यांच्यामुळे आपणास स्वातंत्र्य मिळाले या सर्व स्वातंत्र्यवीरांना सॅल्यूट जय हिंद‌ .

    ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशातील साधन खनिज संपत्ती व घनदाट जंगल होते. आपण त्यांचे रक्षण करणे गरजेचे होते परंतु काही कारणास्तव या साधन संपत्ती, खनिज संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जंगल भरपूर प्रमाणात कमी झाले त्यामुळे निसर्गनिर्मित सजीव सृष्टी वरही मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपला पर्यावरण समतोलावर मोठ्या प्रमाणात आघात होऊन आपल्या देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहेत.

    अनेक प्रकारचे जीव घेणारे आजार होत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन गाव शेतं यांच अतोनात नुकसान होत आहे. ठिकठिकाणी चक्रीवादळ होत शेतीचा अतोनात नुकसान होत आहे कमी काळात प्लास्टिकचा वापर करण्याची सवय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचे विघटन होत नसल्यामुळे सर्व जग प्लास्टिक कचऱ्याला कंटाळले आहे.

    सर्व प्लॅस्टिक नद्या नाले मध्ये जाऊन तुडंब भरत आहेत रस्त्यावर घाण पाणी वाहते तसेच थेट समुद्रातही हा कचरा जात आहे त्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी ही धोक्यात आहे. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे सरकारी गाड्या न वापरता आपल्या खाजगी गाड्या वापरतात गरज नसताना कुठेही जाण्यासाठी गाडी शिवाय जात नाही कार्बन डाय-ऑक्साइड मुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे तसेच ध्वनी प्रदूषण ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे कर्कश आवाजामुळे जमीन थरारते शरीरावर अनेक प्रकारचे आजार होत आहेत या सर्व गोष्टीमुळे वातावरणात अमुलाग्र बदल दिसून येत आहे .

    पावसाचे प्रमाण कमी होत असून आला तर ढगफुटी सारखा होत असल्यामुळे जमिनीत पाणी जात नाही आहे त्यामुळे पाण्याची लेवल खूप प्रमाणात खाली गेलेली आहे. म्हणून पाण्याचा वापर कमीत कमी करावा लागत आहे. डॉ सुरेंद्र सिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान आपण सर्वजण धरतीमातेचे लेकरू आहोत आपली कृतज्ञता म्हणून आज पर्यंत कळत नकळत जेही चूक झाली असेल तिला माफी मागून आता धरती मातेच्या ऋण फेडण्याची वेळ आहे आपल्या धरती मातेला वाचवूया धरती मातेचे तरी आपण होणार प्रदूषण कमी होण्यासाठी काय करू शकतो याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यावरण परिवर्तन रॅलीचे आयोजन करणे अत्यावश्यक आहे शालेय स्तरावर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो आणि रॅली काढावी लागली म्हणजे आपल्या देशावर हे मोठे संकट आहे याची चाहूल सर्वांना होईल.व निसर्गाप्रती आदर निर्माण होईल.

    जंगल आहे तर सर्व मंगल आहे वन आहे तर जल आहे . जल आहे तर जीवसृष्टी आहे प्लास्टिकचा वापर टाळा. एक पेड मॉ के लिये अभियान 2 संगोपनासहित झाडे लावा आवश्यक असेल तेथेच गाडी वापरा वायु प्रदूषण टाळा. ध्वनी नियंत्रित ठेवा प्रदूषण टाळा भारत माता की जय

  • अहिल्यादेवी कन्या विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

    अहिल्यादेवी कन्या विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

    भारतीय सणांच्या परंपरेमध्ये रक्षाबंधन चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिण भावाच्या अतूट आणि विश्वासाच्या नात्याला बळकटी प्रदान करण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.. भाऊ जसा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतो अगदी त्याचप्रमाणे पोलीस बांधव देखील माता-भगिनींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात याच संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थिनींनी शहरातील पोलीस बांधवांना रक्षा सूत्र बांधण्यासाठी विद्यालयात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील साहेब दामिनी पथकाचे प्रमुख श्री राजेंद्र सांगळे साहेब, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उमेश महाले, शहर वाहतुक शाखेच Api रवींद्र सांळुके,Api रफिक तडवी Api शिवाजी पाटील Api जमिल शेख हवालदार अजय पाटील गुन्हा अन्वेषण विभागाचे नितिन सपकाळे रविंद्र भावसार दिलीप कोल्हे संदीप घ्यार आदी मान्यवर उपस्थित होते

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन झाले तदनंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि इशस्तवन स्वागत सादर केले. यानंतर विद्यालय प्रशासनातर्फे सर्व उपस्थित पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात उपस्थित राहून उपस्थित सर्व पोलीस बांधवांना रक्षा सूत्र बांधले.

    अतिशय भावनाप्रधान अशा या कार्यक्रमाला विद्यार्थिनींना संबोधित करताना. श्री दामिनी पथकाचे प्रमुख राजूभाऊ सांगळे यांनी विद्यार्थिनींना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थी दशेत तुम्ही कठोर परिश्रम केले तर पुढील काळामध्ये तुम्हाला उत्तम अशा प्रकारचे यश लाभेल त्यामुळे कष्ट करा, अभ्यास करा आणि जीवनात यशस्वी व्हा असा सल्ला दिला.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील साहेबांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पोलीस प्रशासन सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे तुम्ही केव्हाही अडचणीत असाल तर 112 क्रमांक वर कॉल करा काही क्षणातच पोलीस आपल्याजवळ पोहोचतील आणि आपल्याला मदत करतील अशी माहिती दिली त्यानंतर शाळेतील नाना पाटील सर यांनी आपल्या संस्कृती चा रक्षाबंधन सणाचे महत्व बघता त्याचे संवर्धत संगोपन करा कारण पाश्चिमात्याच्या अनुकरणामुळे रक्षाबंधन सणाचे महत्त्वाची जाणिव ठेवूया .

    विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी यांनी बोलताना पोलीस प्रशासनाचे आभार मानले सर्व मान्यवरांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सर्व पोलीस पदाधिकारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.. नाना पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरिता चौधरी यांनी तर आभार सौ योगिता पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.