Category: Blog

Your blog category

  • जामनेर रोडपासून गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीची लहर

    जामनेर रोडपासून गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीची लहर

    भुसावळ : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहभाग घेतला.जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलपासून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते, घोषणांनी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा धारण करून देशप्रेमाचे संदेश दिले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागल्याचे पाहायला मिळाले.

  • जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    भुसावळ (प्रतिनिधी):जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिन आणि केंद्रीय क्रीडामंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते थाटात पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भारतीय जनता पार्टी भुसावळ उत्तर विभाग शहर अध्यक्ष संदीप सुरवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष चौधरी यांचा समावेश होता.स्पर्धेत आज गटातील सर्व सामने खेळविण्यात आले असून, उद्या पासून बाद फेरीचे रोमांचक सामने खेळले जाणार आहेत. 11 मे ते 13 मे दरम्यान आयोजित या स्पर्धेत जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू संपूर्ण मेहनत घेत असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

  • वासुदेव जेष्ठ नागरिक संघात संगीत संध्या उत्साहात

    वासुदेव जेष्ठ नागरिक संघात संगीत संध्या उत्साहात

    आयुष्य हे जबाबदारी पार पाडण्यात खर्ची झाले,आता निवृत्त जीवन जगतांना आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे असे प्रतिपादन प्रमोद बोरोले यांनी आज वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत केले.

    रिंग रोड येथील योग केंद्रात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील,धनराज पाटील, भानुदास पाटील, आदी उपस्थित होते.पुढे प्रमोद बोरोले म्हणाले की,वासुदेव जेष्ठ नागरिक संघाने आज आपल्याला आपले कलाकौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.ही एक आपल्या सुवर्ण संधी आहे.

    संगीत संध्याला प्रभाकर झांबरे यांनी शंख ध्वनी करून कार्यक्रमास सुरुवात केली.यानंतर पी.जी. पाटील यांनी भगवद्गीतेतील अध्याय 15 पुरुषोत्तम योग म्हणून झाल्यावर गणेश सरोदे यांनी भजन तर भास्कर खाचणे गवळण सादर केली.प्रभाकर झांबरे मनोगत व हास्ययोग तर आर.एल.चौधरी यांनी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या विविध मुद्रा करून दाखवल्या.प्रमोद बोरोले यांनी भजन सोबत ज्ञानेश्वर पाटील यांनी भक्ती गीत म्हंटले. असे विविध कलाकौशल्य सादर करण्यात आले.संजय चौधरी यांनी आभार मानले.विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी विश्वनाथ वाणी,सुरेश बुलाखी बेलसरे,पुंजू भारंबे ,दिनकर शंकर पाटील, रमण भोगे,प्रमोद बोरोले,आर एल चौधरी, लोटू फिरके,इंदुबाई सपकाळे, खुशाल महाजन, पंडित पाटील ,अशोक ढाके,टीव्ही पाटील ,सौ वैशाली पाटील,यशवंत वारके,सौ यमुनाबाई वारके, श्रीमती रजनी राणे, सोपान नेमाडे,खाचणे सर ,गणेश सरोदे,ज्ञानदेव पाटील,दिलीप चौधरी,दिलीप मराठे, पांडुरंग पाटील, श्रीमती विजया भारंबे,श्रीमती प्रमिला धांडे आदी उपस्थित होते.

  • विश्र्व प्रसिद्ध मूल्यांकन शिक्षण स्पर्धेत कृष्णा तुषार चौधरी यांचे यश व सत्कार

    विश्र्व प्रसिद्ध मूल्यांकन शिक्षण स्पर्धेत कृष्णा तुषार चौधरी यांचे यश व सत्कार

    भुसावळ: येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कृष्णा तुषार चौधरी याने पाच ते सात वयोगटात विश्र्व प्रसिद्ध मूल्यांकन शिक्षण स्पर्धेत यश संपादन केले आहे. ही स्पर्धा ISKCON संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थ्याला विजेतेपद मिळाल्या बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) आणि चांद्रयान-३ मोहिमेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते यांचे हस्ते बंगलोर येथे इलेक्ट्रिक सायकल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्याचे वडील सी ए तुषार चौधरी, भुसावळ येथे प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत तर त्यांची आई ज्योती चौधरी ह्या प्रोप्रायटर ई-टॅक्स सर्विसेस इंडिया ( आर टी ओ सर्विसेस ) आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर म्हणून कार्यरत आहेत. भुसावळ शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    भुसावळ (प्रतिनिधी):जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिन आणि केंद्रीय क्रीडामंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते थाटात पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भारतीय जनता पार्टी भुसावळ उत्तर विभाग शहर अध्यक्ष संदीप सुरवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष चौधरी यांचा समावेश होता.स्पर्धेत आज गटातील सर्व सामने खेळविण्यात आले असून, उद्या पासून बाद फेरीचे रोमांचक सामने खेळले जाणार आहेत. 11 मे ते 13 मे दरम्यान आयोजित या स्पर्धेत जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू संपूर्ण मेहनत घेत असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

  • ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची ठोस कारवाई – दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांचा खात्मा

    ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची ठोस कारवाई – दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांचा खात्मा

    पहलगाम येथे १५ दिवसांपूर्वी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री १:४४ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

    हल्ल्याची ठिकाणे:

    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील: बहावलपूर, अहमदपूर, मुरीदके

    पाकव्याप्त जम्मू व काश्मीरमधील: बाग, मुझफ्फराबाद, कोटली

    संरक्षण मंत्रालयाचे निवेदन:हे हल्ले केंद्रित, तोलूनमोलून केलेले आणि प्रक्षोभक नसलेले होते.कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी ठिकाणावर हल्ला केला नाही.

    लष्कराचे वक्तव्य:भारतीय लष्कराने ट्विटरवर लिहिले – “न्याय झाला आहे. जय हिंद!”तसेच, लष्कराने एक संदेश पोस्ट केला: “प्रहाराय सन्निहिताः, ज्याय प्रशिक्षिता” – अर्थात “हल्ला करण्यास तत्पर, विजयाच्या प्रतिक्षेत.”सीमावर्ती तयारी:भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारत-पाक सीमा भागात सर्व हवाई संरक्षण युनिट्स अलर्ट अवस्थेत आहेत.पाकिस्तानची प्रतिक्रिया:पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे, मात्र त्याची तपशीलवार प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.भारताने या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल आणि देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई करण्यास भारत मागे हटणार नाही.

  • भारताची दहशतवादावर जोरदार कारवाई: अझहर मसूद व हाफिज सईदच्या अड्ड्यांवर हल्ला

    भारताची दहशतवादावर जोरदार कारवाई: अझहर मसूद व हाफिज सईदच्या अड्ड्यांवर हल्ला

    भारताने दहशतवादाच्या विरोधात मोठी आणि ठोस पावले उचलत जैश-ए-मोहंमद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ला केला. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली.हल्ल्याची ठिकाणे व लक्ष्य:पंजाबमधील बहावलपूर येथे जैश-ए-मोहंमदच्या लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.जैशचा प्रमुख अझहर मसूद काही दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सुरक्षित अड्ड्यावर लपून बसल्याची माहिती आहे.यासोबतच पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथे लष्कर-ए-तोयबाच्या अड्ड्यांवरही तडाखेबंद कारवाई झाली.

    हाफिज सईदच्या अड्डाला धक्का:लष्करचा प्रमुख हाफिज मोहमंद (सईद) ISI च्या सेफ हाऊसमध्ये असल्याचे उघड झाले असून, त्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले.

    source https://x.com/ANI

  • दा दे ना भोळे महाविद्यालयाच्या 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100%

    भुसावळ: येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर्षी विज्ञान शाखेने १००% निकालाची घौडदौड कायम ठेवली आहे. याशिवाय कला आणि वाणिज्य शाखांमध्येही घवघवीत यश मिळाले आहे.

    विज्ञान शाखा – १००% निकाल

    प्रथम क्रमांक: कु. पाटील मानसी पंकजकुमार – ५३५ गुण (८९.१७%)द्वितीय क्रमांक: कु. फेगडे दिशा अनिल – ५३२ गुण (८६.६७%)तृतीय क्रमांक: धांडे श्रेयस खिलचंद – ५३१ गुण (८८.५०%)

    कला शाखा – ९०% निकाल प्रथम क्रमांक: वाढे निर्मल विजयकुमार – ४२३ गुण (७०.५०%)द्वितीय क्रमांक: कु. काकडे ममता गोविंदा – ३७० गुण (६१.६७%)तृतीय क्रमांक: कु. गांधेले दिशा दत्तू – ३६५ गुण (६०.८३%)वाणिज्य शाखा – ९०% निकालप्रथम क्रमांक: पाटील यदनेश उल्हास – ३८५ गुण (६४.१७%)द्वितीय क्रमांक: कोलते रुद्रप्रकाश यशवंत – ३८४ गुण (६४%)तृतीय क्रमांक: कु. वारके हेमांगी लक्ष्मण – ३६४ गुण (६०.६७%)

    यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.