Category: Blog

Your blog category

  • विद्यापीठ प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अभाविपचे ‘भोंगा नाद आंदोलन’!

    विद्यापीठ प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अभाविपचे ‘भोंगा नाद आंदोलन’!

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ‘भोंगा नाद आंदोलन’ करण्यात आले. उन्हाळी सत्र परीक्षांतील गोंधळ, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे अचानक वाढवलेले शुल्क आणि विद्यार्थ्यांच्या निकालांमधील त्रुटींविरोधात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात आले.

    जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथून असंख्य विद्यार्थी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

    विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला शुल्क भरून प्रवेश घेतलेला असताना, वर्ष संपताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता सुमारे १००% शुल्क वाढ करण्यात आली आहे. ही कृती पारदर्शकतेच्या तत्त्वाला विरोध करणारी असून, युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचाही भंग करणारी आहे. परीक्षेला उपस्थित असूनही अनेक विद्यार्थ्यांना ‘अनुपस्थित’ दर्शवण्यात आले असून, परिणामी त्यांचे निकाल चुकीचे लागले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने तक्रारींसाठी दिलेले हेल्पलाइन क्रमांकही अनेकदा बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत निवारण होत नाहीत.

    यासंदर्भात अभाविपच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. अभाविपच्या मागण्या स्पष्ट आणि ठोस असून, त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत. शुल्कवाढ ही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस जाहीर केलेल्या दरानुसारच असावी व अचानक वाढवलेली रक्कम मागे घेण्यात यावी. पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ ही नियमानुसार दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. परीक्षेला उपस्थित असूनही जे विद्यार्थी ‘अनुपस्थित’ दर्शवले गेले आहेत, त्यांचा निकाल त्वरित तपासून दोन दिवसांच्या आत सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा. यासोबतच, निकाल गोंधळास कारणीभूत असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.

    फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेतही अनेक त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीची मागणी केल्यानंतर ती ठराविक कालमर्यादेत देण्यात यावी आणि पुनर्मूल्यांकनाचा निकालदेखील नियोजित वेळेतच जाहीर करण्यात यावा. सर्व अभ्यासक्रमांकरिता फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाचे शुल्क एकसारखे असावे व हे शुल्क वाजवी असावे. पेपर तपासणी योग्य तज्ज्ञांकडूनच व्हावी, याची विद्यापीठ प्रशासनाने खातरजमा करावी. मूल्यांकन व्यवस्थित पार पडावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा त्वरीत कराव्यात. अश्या मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या. या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, कुलसचिवांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.

    विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिलेले असले तरी, ते अनेकदा बंद असतात किंवा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठाने तक्रार निवारणासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत व विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात.अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे म्हणाल्या की, “विद्यापीठाला वारंवार निवेदन देऊनही विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे सर्व विद्यार्थी ह्या सर्व समस्यांना त्रासून निघालेले आहेत तरी शुल्कवाढ मागे घेतली नाही आणि परीक्षा प्रक्रिया सुधारली नाही तर विद्यापीठात पुन्हा याहून मोठे आंदोलन उभे करण्यात येईल.”

    या आंदोलनात अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे, प्रदेश सहमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जळगाव महानगर मंत्री सागर बारी, जिल्हा संयोजक तेजस पाटील आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. विद्यार्थीहितासाठी अभाविपने केलेले हे आंदोलन विद्यार्थी हिताचे असून विद्यापीठ प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

  • “देव तारी त्याला कोण मारी!” – कचराकुंडीत सापडलेल्या वासराला गोरक्षकांनी दिले जीवनदान

    “देव तारी त्याला कोण मारी!” – कचराकुंडीत सापडलेल्या वासराला गोरक्षकांनी दिले जीवनदान

    “देव तारी त्याला कोण मारी” या उक्तीप्रमाणे शहरात दोन दिवसांपासून कचराकुंडीत गंभीर जखमी अवस्थेत बेवारस पडलेल्या वासराला नवजीवन मिळाले आहे. ही घटना शिवआज्ञा प्रतिष्ठान व गोसेवक परिवाराच्या तात्काळ मदतीमुळे शक्य झाली.

    रात्री खाजगी काम आटपून घरी परतत असताना वरणगाव रोडवरील भोळे पेट्रोल पंपासमोर कचराच्या ढिगात एक वासरू गंभीर जखमी अवस्थेत अभय नरवाडे व धीरज साबळे यांना आढळले. त्यांनी तत्काळ गोरक्षक रोहित महाले यांच्याशी संपर्क केला.

    दुसऱ्या दिवशी गोरक्षकांच्या संयुक्त प्रयत्नाने व जळगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर बोरखेडे यांच्या सहकार्याने वासराचा सडलेला पाय शस्त्रक्रियेद्वारे विभक्त करण्यात आला. त्यामुळे त्याला नवे जीवन मिळाले.

    या पवित्र कार्यात डॉ. बोरखेडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. अभय नरवाडे, धीरज साबळे, बल्लु धायडे, कुणाल शिंदे, ऋषिकेश बाळापुरे, उमंग सुतार, रोहित महाले, दर्शन वरणकर, निखिल जैन, यश नरवाडे, राजू पांडे, प्रथमेश पल्लाजी, सौरव यादव, नितीन यादव यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    शहरातील नागरिकांना आवाहन करताना, रोहित महाले यांनी सांगितले की, “आपल्या परिसरात जर एखादी जखमी गोमाता किंवा मुक प्राणी दिसला, तर गोसेवक परिवाराशी त्वरित संपर्क साधावा.”

  • रायसोनी विद्यालयात जागतिक ऑलिंपिक दिन साजरा

    रायसोनी विद्यालयात जागतिक ऑलिंपिक दिन साजरा

    जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटनांचा महासंघ व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व बी. यू. एन. रायसोनी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यालयात “जागतिक ऑलिंपिक दिन ” साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सॉफ्टबॉल राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पंच किशोर चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख सुवर्णसिंग राजपूत यांची उपस्थिती होती

    राजेश जाधव यांनी ऑलिंपिक खेळाचा इतिहास, स्पर्धेचे महत्व, ऑलिंपिक स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी व ऑलिंपिक दिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक योगेश सोनवणे यांनी तर आभार धनराज भोई यांनी केले कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक,शिक्षकेतर वृंद यांची उपस्थिती होती.

  • राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ वतिने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती तसेच विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त संयुक्त जयंती उत्सव सोहळा कार्यक्रमाचे १२ वे वर्ष व अवनी दत्तक योजना शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाचे ४ थे वर्ष

    राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ वतिने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती तसेच विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त संयुक्त जयंती उत्सव सोहळा कार्यक्रमाचे १२ वे वर्ष व अवनी दत्तक योजना शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाचे ४ थे वर्ष

    राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ संचालित ” अवनी दत्तक योजना” शैक्षणिक उपक्रम अंतर्गत बहुजन समाजातील ज्यांचे आई वडील नाही असे व ज्यांचे आई वडिल हातमजुरी काम करतात अशा कुटुंबातील ई.५ वी ते ई.१० मध्ये शिक्षण घेत असलेल्या बहुजन समाजातील गोरगरिब, होतकरु,गरजु ४० विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वितरण तसेच पोक्सो कायदा बद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    सदर कार्यक्रम दि. १६/६/१०२५ रोजी मोठा हनुमान मंदिर साकरी ता.भुसावळ येथे दुपारी २ वाजता घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद सोनवणे सरपंच साकरी असुन प्रमुख पाहुणे , दिलीप फालक माजी उपसरपंच , रतनसिंग बोदर पोलीस पाटील साकरी, नितिन इंगळे ग्रा.पं.सदस्य, मोहन पाटील ग्रा.पं.सदस्य, नारायण कोळी अध्यक्ष आदिवासी कोळी समाज वधु वर सूचक महा.राज्य, संजयसिंग चौधरी समाजसेवक तसेच पोक्सो कायदा मार्गदर्शन ॲड प्रिया अडकमोल उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आले व मंदिरातील देवस्थानी फुलहार अर्पण करून पुजा करण्यात आली दरम्यान सुत्रसंचलन नारायण कोळी यांनी केले दरम्यान उपस्थित मान्यवरांना फाउंडेशन तर्फे पेन भेट देऊन स्वागत करण्यात आले व निर्मला ट्रेनिंग सेंटर च्या सौ.निर्मला कोळी यांनी फाउंडेशन च्या अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांना सोबत असलेला फोटो भेट देऊन सत्कार केला.

    कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी करतांना दरम्यान फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असलेल्या बद्दल माहिती दिली तसेच फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमी गरजवंताना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करतो सदर फाउंडेशन २०१४ पासुन सामाजिक उपक्रम राबवित असून मागिल अनुभव पाहता अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम ३ जानेवारी २०२० रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सन्मानार्थ सदर योजनेचा शुभारंभ भुसावळ येथे करण्यात आला आहे तसेच दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फाउंडेशन च्या वितीने अभिवादन कार्यक्रम राबविण्यात येतो व सदर अभिवादन कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच नागरिकांना आमंत्रित करण्यात येते व येतांना अभिवादन स्वरुपात शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात येत असल्या बद्दल माहिती दिली.

    अवनी दत्तक योजनेचा उद्देश:- तळागाळातील गरजवंत होतकरु विद्यार्थ्यांनी यांना शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी तसेच कोणीही शिक्षणा पासुन वंचित नसावे त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हे आहे महामानवांच्या विचारांचा आदर्श ठेवून सदर उपक्रम राबविण्यात येत असून नेहमी २० मुलींना साहित्य वितरण करण्यात यायचे परंतु यावर्षी सदर योजनेत बदल करून २० मुलांनाही सहभागी करण्यात आले आहे व आज रोजी गरजवंत ४० विद्यार्थीना जे साहित्य आज वितरण करण्यात येणार हे जमा झालेले साहित्य आहे व पुढेही अशाच नियोजनाची आम्ही शैक्षणिक साहित्य देऊन पुढेही आपल्या जिल्ह्यात गरजवंत विद्यार्थ्यांनीना अवनी दत्तक योजना माध्यमातून मदत करणार आहोत सदर कार्यक्रम या नेहमी एप्रिल महिन्यात घेण्यात येत असतो परंतु यावर्षी आम्ही ठरवले कि शाळा सुरू झालेवरच सदर कार्यक्रम नियोजन करणार येथुन पुढे नेहमी अशाच पध्दतीने कार्यक्रम होणार सांगितले व मागील वर्षात भुसावळ तालुक्यातील शिंदी गाव, कंडारी गाव, ओझरखेडा गाव याठिकाणी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा कार्यक्रम जरी आम्ही राबवत आहोत यात भुसावळ मधिल आपल्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा खारीचा वाटा आहे यातील श्रेय मदत करणा-या सर्व बांधवांचे आहे जे आमच्या फाउंडेशन च्या कार्यावर विश्वास ठेवून आम्हाला मदत करतात अशीच मदत आमच्या फाउंडेशन ला मिळावी जेणेकरुन गरजवंताना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल याबद्दल सांगितले व महात्मा ज्योतिबा फुले व प.पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर पोक्सो कायद्या विषयी मार्गदर्शन करतांना ॲड प्रिया अडकमोल यांनी मार्गदर्शन करतांना Protection of children from sexually offence 2012 हा कायदा भारत सरकारने लहान म्हणजेच 18 वर्षाखालील मुलांसाठी आणला आणि त्याच्यामुळे 2015 पासून सुरुवात करण्यात आली.

    लहान मुलांवर लैंगिक अत्याचार वाढल्यामुळे आज भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि 80 ते 90% लोक हे त्यांच्या ओळखीचे लोक असतात ते घरातील , शाळेतील, गार्डन मधील, घराशेजारील, ओळखीचे काका ओळखीचे दादा ओळखीचे आजोबा हे वयस्कर व्यक्ती असतात त्याच्यामुळे आज आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे जर तुमच्या मुलांवर अन्याय झाला असेल तर तुम्ही नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला हवी , अत्याचार हा मुलींवरच नाही तर मुलांवर सुद्धा होतो यामुळे मुलं मानसिक स्थिती बदलत होते आणि ते चिडचिड करू लागतात लोकांपासून लांब राहतात समोरच्या व्यक्तीला घाबरतात अचानक झोपेत घाबरणे उठून बसणे रडणे कमी जेवण करणे सारखी चिडचिड करणे या गोष्टींकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे शाळेतील लोकांनी सुद्धा मुलं काय करता किंवा काही नाही करत याकडे लक्ष दिले पाहिजे कारण की शिक्षक हे मुलांच्या जवळचे व्यक्ती असतात त्याचप्रमाणे जर मुलांवर अन्याय झाला असेल तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी कडे तपासणी केली जाते जर मुलगी असेल तर महिला वैद्यकीय अधिकारी असते तिचं सगळ्या प्रकारचे चाचणी होते तिची एचआईवी चाचणी होते त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा ती ला गर्भधारणा झाली आहे की नाही या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात त्याचप्रमाणे मुलांचे जबाब घेतले जातात मुलाचे जबाब हे विनावर्तीचे पोलीस त्यांच्या घरी जाऊन घेऊ शकतात तो जबाब मुलं त्यांच्या भाषेत जर ते ग्रामीण भाषेत असेल तरीसुद्धा ज्या भाषेत असेल ते जबाब नोंदवला जातो 90 दिवसाच्या आत चार शीट पोलिसांनी कोर्टात दाखल केली पाहिजे कोर्टात मॅटर चालत असताना ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्याला सरकारी वकील व एनजीओ हे सगळे लोक त्याला मदत करतात मॅटर हे जे जे न्यायालयात सुरू असतं मुलाचे डॉक्टरांना कौन्सलिंग केली जाते जेणेकरून मूल त्या अत्याचारापासून बाहेर आले पाहिजे पालकांनो अशी चूक करू नका मुलांना त्या शाळेतून काढू नका किंवा त्यांच्या शिक्षण बंद करू नका किंवा समाजापासून तोडू नका कारण की ते अजूनच मानसिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते आरोपीला जामीन होत नाही कारण हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे याच्यामध्ये लवकर बेल होणे शक्य नाही मुलाच्या भविष्यासाठी सरकार त्यांना त्यांचा भविष्य पूर्ण उभारण्यासाठी निधी मिळत असते त्याचप्रमाणे मुलगी ही सोळा वर्षाखालील असेल तर वीस वर्षापर्यंत करावास व दंड होतो मूल जर बारा वर्षा आतील असेल तर आजन्म करावाच किंवा मृत्यू दंड होतो याविषयी सांगितले. उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन तर्फे गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत केली जाते हा उपक्रम खुप चांगला राबविण्यात येत असुन असेच चांगले कार्य फाउंडेशन माध्यमातून व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या व यापुढे काही मदत लागल्यास सांगा होईल ती मदत आम्ही पण करू सांगितले असे बोलून मनोगत व्येक्त केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विनोद सोनवणे सरपंच यांनी मनोगत व्यक्त करतांना महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांची हि खरी जयंती साजरी होत असुन फाउंडेशन च्या माध्यमातून अवनी दत्तक योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेला हा शैक्षणिक उपक्रम खरोखर महापुरुषांच्या कार्याचा विचारांना व अभिप्रित असा हा समाजपयोगी उपक्रम असून अशीच जयंती साजरी व्हायला हवी जेणेकरून शिक्षणा पासुन कोणी वंचित राहणार नाही यापुढेही फाउंडेशन ने असेच चांगले उपक्रम राबवावेत असे बोलून उपस्थितांना महात्मा ज्योतिबा फुले व प.पु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुजन समाजातील ४० विद्यार्थ्यांना १ शाळेची बॅग, १२ वह्या-रजिस्टर २०० पेजस, १ कंपास साहित्यानी भरलेली, १ लेटरपॅड, ४ पेन, प्रत्येकी एका विद्यार्थीनीला १२ हातरूमाल, १ कलसबाॅक्स ई. शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद सोनवणे सरपंच यांनी मनोगत व्यक्त करतांना महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांची हि खरी जयंती साजरी झाली असे सांगुन कार्यकम आयोजकांचे कौतुक केले.

    कार्यक्रमाचे शेवटी आभार नारायण कोळी यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य फाउंडेशन च्या सचिव निर्मला सुरवाडे, माधुरी सपकाळे,रेखा खरात आदी महिला तसेच जय बजरंग गृप साकरी सर्व पदाधिकारी, निर्मला ट्रेनिंग सेंटर यांनी केले.

  • “पावसाळ्याचे साथीदार – गवती चहा आणि घरगुती रेसिपी”

    “पावसाळ्याचे साथीदार – गवती चहा आणि घरगुती रेसिपी”

    पावसाळ्यात सर्दी, खोकला, अपचन, थकवा असे त्रास सामान्य असतात. अशा वेळी घरात सहज उपलब्ध होणारा गवती चहा आरोग्यासाठी वरदान ठरतो.

    गवती (लेमनग्रास) पानं उकळून तयार होणारा हा चहा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, घशाचा त्रास कमी करतो, आणि पचन सुधारतो. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल घटक सर्दी-तापासारख्या संसर्गांपासून संरक्षण करतात.

    घरगुती उपाय:
    २ गवती चहा पाने २ कप पाण्यात १० मिनिटं उकळा. मध/लिंबू घालून गरम गरम प्या. झोपण्यापूर्वी घेतल्यास तणावही कमी होतो.
    गवती चहाचं तेल डासांपासून संरक्षण करतो व त्वचेसाठीही उपयुक्त आहे. अनेक शेतकरी गवती चहा शेती करून चांगले उत्पन्न कमावत आहेत.

    पावसाळ्याच्या काळात गरम गवती चहा म्हणजे केवळ एक पेय नाही तर एक प्रभावी घरगुती औषध आहे. मात्र, गर्भवती महिला किंवा विशिष्ट आरोग्य समस्या असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानंतरच सेवन करावे.

    गवती चहाचे इतर उपयोग:- डास, मच्छरांपासून संरक्षण गवती चहा हे नैसर्गिक मच्छर repellant म्हणून घरात वापरले जाते.

    सौंदर्यप्रसाधनांत वापर: या वनस्पतीपासून मिळणारे तेल केस, त्वचा, साबण, परफ्युममध्ये वापरले जाते.

  • 28 मार्चला दिलेले निवेदन अद्यापही दुर्लक्षित; शांतीनगर रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर

    28 मार्चला दिलेले निवेदन अद्यापही दुर्लक्षित; शांतीनगर रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर

    शांतीनगर परिसरातील उघड्या गटारी आणि सांडपाण्याच्या समस्यांबाबत २८ मार्च २०२५ रोजी भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे १०२ नागरिकांच्या स्वाक्षरींसह निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत प्रशासनाकडून एकही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही, यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

    महिला कॉलेज पासून यावल रोड सरकारी गोडाऊन ते डॉ फिरके हॉस्पिटल पर्यत व तसेच डॉ शास्त्री पासून परिसर सध्या उघड्या गटारी, सांडपाण्याचा प्रवाह, दुर्गंधी आणि डासांच्या प्रकोपामुळे त्रस्त आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.

    स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया*
    “आम्ही मार्चमध्ये निवेदन दिलं, त्याला ३ महिने पूर्ण होत आहेत. पण प्रशासनाने अद्याप काहीच कार्यवाही केली नाही. ही गंभीर दुर्लक्षवृत्ती आहे.”

    या भागात डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, व्यापारी , शिक्षक तसेच सरकारी व निमसरकारी सेवेत काम करणारे अनेक प्रतिष्ठित नागरिक राहतात, तरीसुद्धा या भागाकडे दूर्लक्ष केले जात असल्याने संताप वाढला आहे.

    नागरिकांनी संकेत दिले आहेत की, जर लवकरच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर नगरपालिका व इतर प्रशासकीय कार्यालयावर आंदोलन असे पुढील टप्प्याचे कृती आराखडे आखले जातील.

  • प्रिसिजन स्पोर्ट्स & अकॅडमी येथे योग सप्ताहाची शानदार सुरुवात २१ ते ३० जून – योग, ध्यान आणि आरोग्य यांचा उत्सव

    प्रिसिजन स्पोर्ट्स & अकॅडमी येथे योग सप्ताहाची शानदार सुरुवात २१ ते ३० जून – योग, ध्यान आणि आरोग्य यांचा उत्सव

    जागतिक योग दिनानिमित्त प्रिसिजन स्पोर्ट्स & अकॅडमी येथे योगगुरू वसंत बळेल यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहे

    शिबिरामध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार, विविध आसने, ध्यानधारणा तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत असते . प्रशिक्षकांनी योगाचे शास्त्रीय महत्त्व, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत माहिती दिली जात आहे.

    या शिबिराचे आयोजन प्रिसिजन स्पोर्ट्स & अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

    या यशस्वी शिबिरासाठी प्रिसिजन स्पोर्ट्स & अकॅडमी चे अध्यक्ष डॉ. किशोर अजनाडकर प्रकल्प प्रमुख सुमित यावलकर तसेच सदस्य प्रवीण शेवाळे व तेजस गजेश्वर यांनी मेहनत घेतली.

  • चैतन्य आयुर्वेद रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    चैतन्य आयुर्वेद रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    चैतन्य आयुर्वेद धर्मदाय रुग्णालय जामनेर रोड भुसावळ येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांतर्फे योगासने करून योग दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात डॉ सीमा पाटील. योगा प्रशिक्षक यांनी योगासने करून घेतली, या कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व कर्मचारी व निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्या. भावना खरे उपस्थित होत्या.

  • ओम पार्क कॉलनीत ‘श्री श्री योगा सेंटर’ चे उद्घाटन; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग व सत्संगाचे आयोजन

    ओम पार्क कॉलनीत ‘श्री श्री योगा सेंटर’ चे उद्घाटन; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग व सत्संगाचे आयोजन

    आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ओम पार्क कॉलनी, गजानन महाराज मंदिर येथे ‘श्री श्री योगा सेंटर’ चे भव्य उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र महामृत्युंजय मंत्र पठणाने झाली, त्यानंतर गुरूपूजेचे आयोजन करण्यात आले.

    गुरूपूजेनंतर योगाभ्यास सत्र पार पडले, ज्यामध्ये विविध योगासने आणि श्वसन क्रियांचा सराव करण्यात आला. त्यानंतर उपस्थित साधकांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी योगाभ्यास व आध्यात्मिक शुद्धतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

    कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगसाधक उपस्थित होते. श्री श्री योगा सेंटरचे संचालक श्री राजेंद्र राणे यांनी या प्रसंगी उपस्थितांना योगाचे महत्त्व, त्याचे फायदे व दैनंदिन जीवनातील भूमिका यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

  • गायत्री परिवार, भारत विकास परिषद आणि फालक शाळेचा संयुक्त उपक्रम योगशिक्षक कुणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा योगाभ्यास

    गायत्री परिवार, भारत विकास परिषद आणि फालक शाळेचा संयुक्त उपक्रम योगशिक्षक कुणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा योगाभ्यास

    जागतिक योग दिनानिमित्त सुशिलाबाई नामदेव फालक प्राथमिक विद्यालय, भुसावळ येथे फालक शाळा, गायत्री परिवार ट्रस्ट व भारत विकास परिषद भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    या कार्यक्रमात योगशिक्षक कुणाल महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगत विविध योगासने आणि श्वसन तंत्र शिकवले. योगाभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य कसे वृद्धिंगत होते, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

    कार्यक्रम प्रसंगी गायत्री परिवार ट्रस्टचे सचिव श्री. किरण फालक, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री. सतीश खडायते, श्री. रमाकांत भालेराव, श्री. गौरव हिंगवे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरीश कोल्हे, तसेच परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    योग दिनानिमित्त उपस्थितांनी सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्याच्या दिशेने पाऊल टाकत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.